मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 तीमथ्य १:१सुमारे इ.स. ६५

    परमेश्वर आपले तारणकर्ता व ख्रिस्त येशू आपली आशा, यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूंचे प्रेषित म्हणून नेमलेला पौल याजकडून,

  2. 1 तीमथ्य १:२सुमारे इ.स. ६५

    विश्वासातील माझा खरोखरचा पुत्र तीमथ्य यास,

  3. 1 तीमथ्य १:३सुमारे इ.स. ६५

    मासेदोनियास जाताना मी तुला सांगितल्याप्रमाणे, विनंती करतो इफिस येथेच राहा आणि चुकीचे शिक्षण देणार्‍यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न कर आणि ज्यांच्याकडून विश्वासातील परमेश्वरासंबंधी रचना न होता, वाद मात्र तयार होतात, अशा गोष्टींवर आणि अखंडित वंशावळ्यांवर चित्त त्यांनी ठेवू नये.

  4. 1 तीमथ्य १:४सुमारे इ.स. ६५

    Neither give heed to fables and endless genealogies, which minister questions, rather than godly edifying which is in faith: so do.

  5. 1 तीमथ्य १:५सुमारे इ.स. ६५

    आज्ञेचा उद्देश हा आहे की, शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून आणि निष्कपट विश्वासातून येणारी प्रीती तुम्हामध्ये असावी.

  6. 1 तीमथ्य १:६सुमारे इ.स. ६५

    या गोष्टी सोडून अनेकजण निरर्थक बोलण्याकडे वळले आहेत.

  7. 1 तीमथ्य १:७सुमारे इ.स. ६५

    ते नियमशास्त्राचे शिक्षक होण्यास अभिलाषी आहेत, परंतु ज्या गोष्टींबद्दल ते मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात आणि सांगतात त्या गोष्टी त्यांनाच समजत नाहीत.

  8. 1 तीमथ्य १:८सुमारे इ.स. ६५

    आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र चांगले आहे—जर त्याचा योग्य रीतीने उपयोग करण्यात आला तर.

  9. 1 तीमथ्य १:९सुमारे इ.स. ६५

    नीतिमानांसाठी नियमशास्त्र तयार करण्यात आलेले नाही; तर आज्ञा मोडणारे, विद्रोही, भक्तिहीन व पापी, अपवित्र आणि अधर्मी, आईवडीलांवर हल्ला करणारे, आणि खून करणारे

  10. 1 तीमथ्य १:१०सुमारे इ.स. ६५

    जारकर्मी, समलैंगिक, दासांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी—आणि इतर जे काही शुद्ध शिक्षणाविरुद्ध आहे.

  11. 1 तीमथ्य १:११सुमारे इ.स. ६५

    जे धन्यवादित परमेश्वराच्या गौरवाशी संबंधित शुभवार्तेला सुसंगत आहे, ते माझ्याकडे सोपविण्यात आले आहे.

  12. 1 तीमथ्य १:१२सुमारे इ.स. ६५

    मी आपल्या प्रभू ख्रिस्त येशूंचा आभारी आहे, ज्यांनी मला सामर्थ्य दिले आणि त्यांनी मला विश्वासयोग्य मानून त्यांच्या सेवेसाठी निवडले.

  13. 1 तीमथ्य १:१३सुमारे इ.स. ६५

    मी पूर्वी परमेश्वराची निंदा करणारा, छळ करणारा आणि जुलमी होतो, तरी देखील मजवर दया झाली, यासाठी की जे काही मी करीत होतो ते अज्ञानामुळे आणि अविश्वासामुळे केले.

  14. 1 तीमथ्य १:१४सुमारे इ.स. ६५

    ख्रिस्त येशू आपले प्रभू यांची कृपा माझ्यावर विश्वास आणि प्रीतीद्वारे विपुलतेने ओतण्यात आली आहे.

  15. 1 तीमथ्य १:१५सुमारे इ.स. ६५

    ही गोष्ट विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे, की ख्रिस्त येशू पाप्यांना तारावयास जगात आले आणि त्या पातक्यांमध्ये सर्वात मोठा मीच आहे.

  16. 1 तीमथ्य १:१६सुमारे इ.स. ६५

    परंतु माझ्यावर दया झाली की, ख्रिस्त येशूंनी माझा उदाहरणादाखल उपयोग करावा आणि माझ्यासारख्या मोठ्या पातक्यांबाबतही परमेश्वराने किती सहनशीलता दाखविली, म्हणजे इतरांनाही विश्वासाने सार्वकालिक जीवन मिळू शकते.

  17. 1 तीमथ्य १:१७सुमारे इ.स. ६५

    जे सर्वकाळचे राजा, अविनाशी व अदृश्य असे एकच परमेश्वर यांना सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव असो. आमेन.

  18. 1 तीमथ्य १:१८सुमारे इ.स. ६५

    माझ्या मुला, तीमथ्या, माझी तुला ही आज्ञा आहे: संदेष्ट्यांच्याद्वारे तुझ्याविषयी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे, तू त्यांच्याद्वारे उत्तम युद्ध करावे.

  19. 1 तीमथ्य १:१९सुमारे इ.स. ६५

    आणि विश्वास व चांगल्या विवेकशीलतेस घट्ट बिलगून राहा, ज्यांनी त्याचा नकार केला त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले.

  20. 1 तीमथ्य १:२०सुमारे इ.स. ६५

    हुमनाय व आलेक्सांद्र हे त्यांच्यामध्ये आहेत; त्यांनी ईश्वराची निंदा करू नये हे शिकावे, म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे.

  21. 1 तीमथ्य २:१सुमारे इ.स. ६५

    तर सर्वात प्रथम मी विनंती करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करावी.

  22. 1 तीमथ्य २:२सुमारे इ.स. ६५

    अशाच प्रकारे राजांसाठी आणि अधिकार्‍यांसाठी करावी, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करावे.

  23. 1 तीमथ्य २:३सुमारे इ.स. ६५

    असे करणे चांगले आहे आणि यामुळे परमेश्वर आपल्या तारणार्‍याला संतोष होतो.

  24. 1 तीमथ्य २:४सुमारे इ.स. ६५

    कारण सर्वांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्याचे ज्ञान समजावे अशी त्यांची इच्छा आहे:

  25. 1 तीमथ्य २:५सुमारे इ.स. ६५

    कारण एकच परमेश्वर आहे आणि परमेश्वर व मनुष्य यामध्ये मनुष्य ख्रिस्त येशू हेच एकमेव मध्यस्थ आहे.