Skip to content

Righteousness बद्दल बायबलमधील वचने

480 वचने · 132 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अब्रामाने याहवेहवर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.

  2. ही गोष्ट तुमच्यापासून दूर असो—की तुम्ही दुष्टांच्या बरोबर नीतिमान लोकांनाही मारून टाकावे, नीतिमान आणि दुष्टांना सारखेच लेखावे हे तुमच्यापासून दूर असो! सर्व पृथ्वीचे न्यायाधीश, जे योग्य ते करणार नाहीत का?”

  3. आणि जेव्हा तुम्ही मला दिलेले वेतन तपासाल तेव्हा भविष्यात माझा प्रामाणिकपणा माझ्यासाठी साक्ष देईल. म्हणजे माझ्या कळपात तुम्हाला एखादा डाग व ठिपके नसलेला बोकड किंवा मेंढा आढळला, तर मी तो तुमच्या कळपातून चोरून घेतला आहे, हे तुम्हाला समजेल.”

  4. “ ‘न्याय देताना अन्याय करू नका; तुम्ही गरिबांमध्ये भेदभाव करू नये, उच्च लोकांच्या आदराचा तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ नये, तर तुम्ही तुमच्या शेजार्‍याचा योग्य न्याय करावा.

  5. याकोबाची धूळ कोण मोजू शकेल, किंवा इस्राएलच्या चौथ्या भागाची तरी मोजणी कोण करणार? मला नीतिमानाचे मरण मरू दे, आणि माझा शेवट त्यांच्याप्रमाणे असो!”

  6. आणि जर आपण याहवेह आपल्या परमेश्वरासमोर दिलेल्या आज्ञेप्रमाणे या सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन केले, तर ते आपले नीतिमत्व असेल.”

  7. तुम्ही नीतिमान आणि सरळ मनाचे लोक आहात म्हणून याहवेह तुम्हाला त्यांचा देश ताब्यात देतील असे मुळीच नाही; मी पुन्हा सांगतो की याहवेह तुमचे परमेश्वर हे केवळ त्या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच व त्यांनी तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना जी शपथ दिली होती, ती पूर्ण करण्यासाठीच ते त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून देतील.

  8. मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासने रऊबेन, गाद आणि मनश्शेहला उत्तर दिले, “आज आमची खात्री झाली आहे की, याहवेह आमच्याबरोबर आहेत, कारण तुम्ही वेदी बांधण्याबाबतीत याहवेहशी अविश्वासू राहिला नाहीत. तुम्ही इस्राएली लोकांना याहवेहच्या हातातून वाचविले आहे.”

  9. “याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार माझ्याशी व्यवहार केला आहे; माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार त्यांनी मला प्रतिफळ दिले आहे.

  10. शलोमोनने उत्तर दिले, “आपला सेवक, माझे पिता दावीदाला आपण अपार दया दाखविली होती, कारण ते आपल्याशी विश्वासू होते, व हृदयाने नीतिमान व सरळ होते. आपण त्यांच्यावरील ही अपार दया पुढे चालू ठेवून आज त्यांच्या राजासनावर बसण्यासाठी त्यांना एक पुत्र दिला.

  11. “मनुष्यप्राणी काय आहेत की ते शुद्ध असावेत, किंवा स्त्रीपासून जन्मलेले नीतिमान असावेत?

  12. तरीही, नीतिमान आपल्या मार्गात स्थिर राहतील, आणि शुद्ध हृदयाचे लोक अधिक बलवान होत जातील.

  13. नीतिमत्वाला मी पांघरले होते; न्याय हाच माझा झगा व मुकुट असे.

  14. मग तो व्यक्ती प्रार्थना करेल आणि परमेश्वराचा अनुग्रह त्याच्यावर होईल, ते परमेश्वराचे मुख पाहतील आणि आनंदाचा गजर करतील; आणि परमेश्वर त्यांना सुयश देऊन, त्यांची पुनर्स्थापना करतील.

  15. न्यायी मनुष्यावरून त्यांची नजर सरकत नाही; राजांबरोबर त्यांना ते राजासनावर बसवितात आणि सर्वकाळासाठी त्यांना थोर बनवितात.

  16. पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.

  17. ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्‍या जलप्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.

  18. म्हणून दुष्ट न्यायसभेत, किंवा पापी लोक नीतिमानांच्या सभेमध्ये उभे राहणार नाहीत.

  19. कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात, परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.

  20. त्यांना नीतियुक्त यज्ञार्पणे करा. आणि याहवेहवर विश्वास ठेवा.

  21. याहवेह, नीतिमानांना तुम्ही निश्चितच आशीर्वादित करता; तुमची कृपा एखाद्या ढालीप्रमाणे त्यांना वेढलेली असते.

  22. याहवेह नीतिमानाला पारखतात; परंतु दुष्ट, ज्यांना हिंसा प्रिय आहे, अशांचा याहवेह आवेशाने द्वेष करतात.

  23. कारण याहवेह नीतिमान आहेत, न्यायीपण त्यांना प्रिय आहे; जे नीतिमान आहेत, त्यांना त्यांचे दर्शन होईल.

  24. प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.

  25. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?