Skip to content

Righteousness बद्दल बायबलमधील वचने: Fruits of

298 वचने · 132 पैलू

Fruits of बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि जर आपण याहवेह आपल्या परमेश्वरासमोर दिलेल्या आज्ञेप्रमाणे या सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन केले, तर ते आपले नीतिमत्व असेल.”

  2. मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासने रऊबेन, गाद आणि मनश्शेहला उत्तर दिले, “आज आमची खात्री झाली आहे की, याहवेह आमच्याबरोबर आहेत, कारण तुम्ही वेदी बांधण्याबाबतीत याहवेहशी अविश्वासू राहिला नाहीत. तुम्ही इस्राएली लोकांना याहवेहच्या हातातून वाचविले आहे.”

  3. ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्‍या जलप्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.

  4. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?

  5. ज्याचे चालणे निर्दोष आहे, जो धार्मिकतेचे आचरण करतो, जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो;

  6. जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही, जो आपल्या शेजार्‍यांचे वाईट करीत नाही, आणि इतरांना काळिमा लावत नाही;

  7. जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो, याहवेहचे भय धरणार्‍यांचा सन्मान करतो, आणि जो स्वतःचे नुकसान होत असले तरी दिलेले वचन पाळतो;

  8. जो व्याज न आकारता पैसे उसने देतो; जो निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही, जो कोणी या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.

  9. याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल? त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील?

  10. ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही.

  11. त्यांना याहवेहपासून आशीर्वाद लाभेल. त्यांचा तारणकर्ता परमेश्वर त्यांना नीतिमान ठरवेल.

  12. मी कुठल्याच अनुचित वस्तूकडे नजर टाकणार नाही. मला विश्वासहीन लोकांच्या व्यवहारांचा तिरस्कार आहे. त्यांच्यापासून मी अलिप्त राहीन.

  13. कुटिल हृदय माझ्यापासून दूर राहील; अनीतीच्या कुठल्याच गोष्टीशी मी संबंध ठेवणार नाही.

  14. जे इतरांशी न्यायाने वागतात, आणि नेहमीच नीतीने आचरण करतात, ते आशीर्वादित असतात.

  15. सात्विकासाठी अंधकारातही प्रकाश उदय पावतो; ते कृपावान, दयाळू व नीतिमान असतात.

  16. ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते, जे आपला व्यवहार न्यायाने करतात.

  17. निश्चितच, नीतिमान कधीही पथभ्रष्ट होणार नाही; त्यांना सर्वकाळ स्मरणात ठेवले जाईल.

  18. वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.

  19. यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत; शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील.

  20. तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.

  21. कारण याहवेह सुज्ञान देतात; त्यांच्या मुखातून ज्ञान आणि शहाणपण येते.

  22. नीतिमानांसाठी ते यश साठवून ठेवतात, जे निर्दोषपणाने वागतात त्यांच्यासाठी ते ढाल आहेत.

  23. कारण ते न्यायींच्या मार्गाचे रक्षण करतात आणि त्यांच्या भक्तांचे मार्ग सुरक्षित ठेवतात.

  24. तेव्हा कोणते योग्य व कायदेशीर, आणि निष्पक्ष आहे—प्रत्येक सन्मार्ग तुला समजेल.

  25. सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल, आणि ज्ञान तुझ्या जीवाला सुखदायक वाटेल,