Righteousness बद्दल बायबलमधील वचने: Promised to the Church
Promised to the Church बद्दल वचने
याहवेहचा न्याय वाळवंटातही वास्तव्य करेल, व त्यांची नीतिमत्ता सुपीक भूमीत नांदेल.
“अहो वरील आकाशांनो, माझ्या नीतिमत्तेचा पाऊस पडू द्या; मेघ त्यांचा वर्षाव करोत, पृथ्वी पूर्ण रुंदीने उघडून जावो, तारण उसळून वर येवो त्यासह नीतिमत्वाचीही भरभराट होवो; मी, याहवेहने हे निर्माण केले आहे.
जशी माती अंकुराला उगविते आणि बाग बीज वाढविते तसे सार्वभौम याहवेह नीतिमत्व आणि प्रशंसा सर्व राष्ट्रासमोर अंकुरित करतील.
सीयोनचा निर्दोषपणा सूर्योदयासारखा उजळून, मी निःशब्द राहणार नाही, व यरुशलेमचे तारण जळत्या मशालीसारखे सिद्ध होईपर्यंत, मी शांत राहणार नाही.