Righteousness बद्दल बायबलमधील वचने: Have, in Christ
Have, in Christ बद्दल वचने
ते माझ्याबद्दल म्हणतील, ‘केवळ याहवेहमध्येच आमची सुटका व सामर्थ्य आहे.’ ” जेव्हा त्यांच्यावर संतापलेले सर्वजण त्यांच्याकडे येतील, तेव्हा ते लज्जित होतील.
तुमच्याविरुद्ध घडविलेले कोणतेही शस्त्र कधीच सफल होणार नाही आणि तुमच्यावर आरोप करणारी प्रत्येक जीभ खोटी ठरविली जाईल. याहवेहच्या सेवकांचा हा वारसा आहे, हाच न्याय मी तुम्हाला दिला आहे,” अशी याहवेह घोषणा करतात.
ज्यांच्या ठायी पाप नव्हते, त्यांना आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे त्यांच्याशी आपण संयुक्त होऊन, परमेश्वराचे नीतिमत्व व्हावे.