Skip to content

Righteousness बद्दल बायबलमधील वचने

480 वचने · 132 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तू आपला भार याहवेहवर टाक आणि ते तुला आधार देतील; नीतिमानाला ते कधीही विचलित होऊ देणार नाही.

  2. पण नीतिमान लोक याहवेहमध्ये आनंद करतील व त्यांचा आश्रय घेतील, सरळ हृदयाचे त्यांचे स्तवन करतील!

  3. तो तुमच्या लोकांचा नीतीने न्याय करो, तुमच्या पीडितांचा न्यायनिवाडा न्यायीपणाने करो.

  4. राजा सामर्थ्यशाली आहेत, त्यांना न्याय प्रिय आहे— तुम्ही याकोबात निष्पक्षपात प्रस्थापित केला; जो न्यायसंगत व रास्त आहे.

  5. मी कुठल्याच अनुचित वस्तूकडे नजर टाकणार नाही. मला विश्वासहीन लोकांच्या व्यवहारांचा तिरस्कार आहे. त्यांच्यापासून मी अलिप्त राहीन.

  6. कुटिल हृदय माझ्यापासून दूर राहील; अनीतीच्या कुठल्याच गोष्टीशी मी संबंध ठेवणार नाही.

  7. जे इतरांशी न्यायाने वागतात, आणि नेहमीच नीतीने आचरण करतात, ते आशीर्वादित असतात.

  8. बरेचदा परमेश्वराने त्यांना सोडविले, तरी त्यांच्याविरुद्ध ते बंडखोरी करीत राहिले आणि शेवटी त्यांच्याच पापामुळे ते नाश पावले.

  9. संपत्ती व समृद्धी त्यांच्या घरात वास करतील, आणि त्यांची धार्मिकता चिरकाल टिकून राहील.

  10. सात्विकासाठी अंधकारातही प्रकाश उदय पावतो; ते कृपावान, दयाळू व नीतिमान असतात.

  11. ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते, जे आपला व्यवहार न्यायाने करतात.

  12. निश्चितच, नीतिमान कधीही पथभ्रष्ट होणार नाही; त्यांना सर्वकाळ स्मरणात ठेवले जाईल.

  13. वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.

  14. यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत; शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील.

  15. गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात, त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते; गौरवाने त्यांचे शिंग उंचावले जाईल.

  16. माझ्याविरुद्ध कारस्थान करणारे निकट आले आहेत, पण ते तुमच्या नियमशास्त्रापासून दूर आहेत.

  17. तुमचे याजक धार्मिकतेची वस्त्रे परिधान करोत; तुमचे भक्त आनंदघोष करोत.’ ”

  18. ते आंधळ्यास दृष्टी प्रदान करतात, याहवेह ओझ्याखाली वाकलेल्यास उचलून उभे करतात, परमेश्वराला नीतिमान प्रिय आहेत.

  19. तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.

  20. कारण याहवेह सुज्ञान देतात; त्यांच्या मुखातून ज्ञान आणि शहाणपण येते.

  21. नीतिमानांसाठी ते यश साठवून ठेवतात, जे निर्दोषपणाने वागतात त्यांच्यासाठी ते ढाल आहेत.

  22. कारण ते न्यायींच्या मार्गाचे रक्षण करतात आणि त्यांच्या भक्तांचे मार्ग सुरक्षित ठेवतात.

  23. तेव्हा कोणते योग्य व कायदेशीर, आणि निष्पक्ष आहे—प्रत्येक सन्मार्ग तुला समजेल.

  24. सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल, आणि ज्ञान तुझ्या जीवाला सुखदायक वाटेल,

  25. तेव्हा विवेक तुझे रक्षण करेल, आणि सुज्ञता तुझे राखण करेल.