Skip to content

Righteousness बद्दल बायबलमधील वचने

480 वचने · 132 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो, परंतु दुष्ट लोकांचा मार्ग त्यांनाच बहकवितो.

  2. नीतिमानाचा मार्ग जीवनाकडे जातो, व त्याच मार्गामधून अमरत्व मिळते.

  3. नीतिमत्ता प्रामाणिक मनुष्याचे रक्षण करते, परंतु दुष्टता पापी मनुष्याचा संपूर्ण विनाश करते.

  4. नीतिमान मनुष्य जिवाचे समाधान होईपर्यंत खातो, परंतु दुर्जनाचे पोट रिकामेच राहते.

  5. नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते. पण पाप कोणत्याही लोकास निंदनीय ठरविते.

  6. नीतिमानाच्या घरात विपुल समृद्धी असते, परंतु दुष्टांची मिळकत विनाश आणते.

  7. दुष्टांच्या मार्गाचा याहवेह तिरस्कार करतात, पण जे नीतिमत्तेचा माग धरतात, त्यांच्यावर ते प्रीती करतात.

  8. याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात, पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात.

  9. राजांना वाईट कृत्त्यांचा तिरस्कार वाटतो; कारण न्यायीपणावरच सिंहासन स्थिर राहते.

  10. पांढरे केस गौरवी मुकुट आहे; नीतिमत्तेच्या मार्गात चालल्याने तो लाभतो.

  11. अर्पणापेक्षा मनुष्याच्या न्याय्य व रास्त वागण्याने याहवेहला अधिक संतोष होतो.

  12. जो कोणी नीतिमत्व आणि प्रीती मिळविण्याचा प्रयत्न करतो, त्याला जीवन, समृद्धी व सन्मान यांचा लाभ होतो.

  13. राजाच्या दरबारातील भ्रष्ट अधिकारी काढून टाका आणि मग त्याचे राज्य न्यायीपणामुळे स्थिर राहील.

  14. कोणीही पाठलाग करीत नाही, तरी दुष्ट माणसे पळत असतात; पण नीतिमान सिंहासारखे निर्भय असतात.

  15. नीतिमानाला गरिबांच्या हक्कांची काळजी असते, पण दुष्ट अशा गोष्टीची पर्वा करीत नाही.

  16. परंतु नीतिमानास सांगा त्यांना सुस्थिती येईल. त्यांच्या सत्कृत्यांचे त्यांना प्रतिफळ मिळेल.

  17. इस्राएल राष्ट्र सर्वसमर्थ याहवेहचा द्राक्षमळा आहे, आणि यहूदीयाचे लोक, त्यांना प्रसन्न करणाऱ्या द्राक्षलता आहेत, ज्यामध्ये त्यांना आनंद होतो. आणि त्यांनी न्यायाची अपेक्षा केली, परंतु त्यांना रक्तपातच दिसून आला; नीतिमत्वाची अपेक्षा केली, परंतु पीडेचे रुदन ऐकू आले.

  18. परंतु ते नीतिमत्त्वाने गरजवंत लोकांचा न्याय करतील, न्यायाने ते पृथ्वीवरील गरिबांसाठी निर्णय देतील. ते त्यांच्या मुखाच्या काठीने पृथ्वीवर हल्ला करतील; ते त्यांच्या ओठांच्या श्वासाने दुष्टांचा वध करतील.

  19. धार्मिकता त्यांचा कटिबंध असेल आणि विश्वासूपणा त्यांचा कंबरपट्टा असेल.

  20. रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो; सकाळी माझा आत्मा तुमच्यासाठी आसुसलेला असतो. जेव्हा तुमचे न्याय पृथ्वीवर येतात, तेव्हा जगातील लोक धार्मिकता शिकतात.

  21. परंतु जेव्हा दुष्टांवर कृपा दाखविली जाते, तेव्हा ते धार्मिकता शिकत नाहीत. प्रामाणिकपणा असलेल्या देशामध्येही ते दुष्कृत्ये करीत राहतात आणि याहवेहच्या प्रतिष्ठेची ते पर्वा करीत नाहीत.

  22. मी न्यायाला मापनदोरी आणि नीतिमत्वाला ओळंबा असे करेन. गारांनी तुमचा खोटेपणा, तुमचे आश्रयस्थान झाडून काढला जाईल, आणि पाणी तुमच्या लपण्याच्या जागेवर भरून वाहील.

  23. पाहा, एक राजा धार्मिकतेने राज्य करेल आणि राज्यकर्ते न्यायाने सत्ता चालवितील.

  24. याहवेहचा न्याय वाळवंटातही वास्तव्य करेल, व त्यांची नीतिमत्ता सुपीक भूमीत नांदेल.

  25. शांती नीतिमत्तेचे फळ असेल; नीतिमत्तेचे कार्य तर सार्वकालिक शांतता आणि धैर्य आहे.