Skip to content

Righteousness बद्दल बायबलमधील वचने

480 वचने · 132 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझ्या लोकांची घरे शांतीने भरलेली आणि सुरक्षित असतील, त्यांची शांतिभंग न होता ते विश्रांती घेतील.

  2. जे नीतीने चालतात आणि जे योग्य तेच बोलतात, जे पिळवणूक करून मिळविलेला लाभ नाकारतात आणि लाच घेण्यापासून त्यांचे हात लांब ठेवतात, खुनाच्या कारस्थानाबाबत जे त्यांचे कान बंद ठेवतात दुष्टतेचा बेत करण्याबाबत त्यांचे डोळे बंद करतात—

  3. ज्यांचा आश्रय पर्वतावरील गड असेल, तेच उच्चस्थानी वास करतील. त्यांच्या भाकरीचा पुरवठा केला जाईल, आणि त्यांना पाण्याची कमतरता पडणार नाही.

  4. तुमची दृष्टी राजाला त्यांच्या सौंदर्यात पाहतील आणि फार दूरवर पसरत असलेला देश पाहतील.

  5. “अहो वरील आकाशांनो, माझ्या नीतिमत्तेचा पाऊस पडू द्या; मेघ त्यांचा वर्षाव करोत, पृथ्वी पूर्ण रुंदीने उघडून जावो, तारण उसळून वर येवो त्यासह नीतिमत्वाचीही भरभराट होवो; मी, याहवेहने हे निर्माण केले आहे.

  6. ते माझ्याबद्दल म्हणतील, ‘केवळ याहवेहमध्येच आमची सुटका व सामर्थ्य आहे.’ ” जेव्हा त्यांच्यावर संतापलेले सर्वजण त्यांच्याकडे येतील, तेव्हा ते लज्जित होतील.

  7. अहो हट्टी अंतःकरणाच्या लोकांनो, तुम्ही, जे आता माझ्या नीतिमत्वापासून फार दूर गेलेले आहात, माझे ऐका.

  8. “याकोबाच्या वंशजांनो, हे ऐका तुम्ही जे इस्राएल या नावाने ओळखले जाता, आणि यहूदाह वंशावळीतून येता, तुम्ही जे याहवेहच्या नावाने शपथ घेता आणि इस्राएलाच्या परमेश्वराचा धावा करता— परंतु सत्यतेत किंवा नीतिमत्तेत नव्हे—

  9. “तुम्ही, ज्यांनी नीतिमत्तेचा ध्यास घेतला आहे व जे याहवेहचा शोध घेता, ते सर्वजण, माझे ऐका: ज्या खडकातून तुम्हाला कापून काढले, आणि ज्या खाणीतून तुम्हाला खोदून काढले, त्याकडे बघा;

  10. “हे, नीतिमत्ता जाणणार्‍या लोकांनो, माझ्या नियमांवर अंतःकरणापासून भाव ठेवणार्‍यांनो माझे ऐका: मर्त्य मानवाच्या उपहासाने भयभीत होऊ नका किंवा त्यांनी केलेल्या निंदेला घाबरू नका.

  11. तुमच्याविरुद्ध घडविलेले कोणतेही शस्त्र कधीच सफल होणार नाही आणि तुमच्यावर आरोप करणारी प्रत्येक जीभ खोटी ठरविली जाईल. याहवेहच्या सेवकांचा हा वारसा आहे, हाच न्याय मी तुम्हाला दिला आहे,” अशी याहवेह घोषणा करतात.

  12. तुम्ही आनंदाने प्रस्थान कराल व शांतीने मार्गदर्शित व्हाल; पर्वते आणि टेकड्या, तुमच्यापुढे उचंबळून गीते गातील, आणि रानातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील.

  13. काटेरी झुडपांच्या ऐवजी तिथे, सुरूचे वृक्ष वाढतील, आणि तिथे रिंगणीच्या जागी मेंदीची झाडे वाढतील. हे याहवेहच्या नामाच्या थोरवीकरिता असेल जे अनंतकाळपर्यंत टिकेल, असे ते सर्वकाळचे चिन्ह होईल.”

  14. “मी निवडलेला उपास याप्रकारचा नाही का: अन्यायाची बंधने तुटली जावी आणि जोखडाचे बंद सोडावे, पीडितांना मुक्त करावे आणि प्रत्येक जोखड तोडून टाकला जावा?

  15. भुकेल्यांना तुमच्या अन्नात तुम्ही वाटेकरी करू नये काय व निराश्रितांना आश्रय द्यावा— जेव्हा तुम्ही निर्वस्त्राला बघाल, त्याला पांघरूण घाला, आणि आपल्या रक्त व मांसाच्या बाधवांना दूर लोटावे का?

  16. मग तुमचा प्रकाश सूर्योदयाप्रमाणे उजाडेल, आणि तुमचे आरोग्य लगेच तुम्हाला प्राप्त होईल; तुमची धार्मिकता तुमच्यापुढे चालेल, आणि याहवेहचे गौरव तुमची पाठराखण करेल.

  17. मग तुम्ही हाक माराल आणि याहवेह त्यास उत्तर देतील; तुम्ही मदतीसाठी धावा कराल व ते म्हणतील: हा मी येथे आहे. “जर तुम्ही पीडितांना जोखडातून मुक्त कराल, एखाद्याकडे बोट रोखून आरोप लादण्याचे आणि द्वेषयुक्त बोलणे थांबवाल,

  18. भुकेल्यांना खाऊ घालण्यासाठी स्वतःचे जीवन खर्ची घालाल, पीडितांच्या गरजांचा पुरवठा कराल, तर तुमचा प्रकाश अंधारातून झळकेल आणि तुमची रात्र मध्यान्हासारखी उजळेल.

  19. याहवेह तुम्हाला सतत मार्गदर्शन करतील; सूर्याच्या उष्णतेने शुष्क भूमीत राहूनही ते तुमच्या गरजा भागवतील व तुमच्या हाडांना बळकट करतील. मग तुम्ही भरपूर पाणी पाजलेल्या बागेप्रमाणे, कधीही पाणी न आटणाऱ्या झर्‍याप्रमाणे व्हाल.

  20. तुमचे लोक पुरातन भग्नावशेषांची पुनर्बांधणी करतील आणि प्राचीन पाये पुन्हा उभारतील; भग्न झालेली तटबंदी दुरुस्त करणारे, बांधकाम व रस्ते पूर्वस्थितीत आणणारे असे तुम्ही म्हणविले जाल.

  21. “जर तुम्ही शब्बाथदिन अशुद्ध करण्यापासून तुमची पावले दूर ठेवाल आणि माझ्या पवित्र दिवशी आपलीच मनमानी करणे सोडून द्याल, जर तुम्ही शब्बाथदिनास आनंदाचा दिवस मानाल आणि तो याहवेहचा पवित्र दिवस आहे म्हणून त्याचा सन्मान कराल, आणि त्या दिवसाचा आदर करून स्वतःच्या इच्छा बाजूला साराल आणि मनमानेल असे न वागता व निरर्थक गोष्टींची चर्चा करणार नाही,

  22. तर याहवेहमध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होईल, आणि मी तुम्हाला या भूतलाच्या उच्चस्थानी विजयाने चालवेन आणि तुमचा पिता याकोबाच्या वतनातील उपजावर मेजवानी देईन.” ही याहवेहच्या मुखातील वचने आहेत.

  23. त्यांनी बघितले की कोणीही नाही, कोणीच मध्यस्थी करणारा नाही, हे पाहून ते अस्वस्थ झाले; म्हणून स्वतःच्या भुजेने त्यांनी त्यांच्याप्रीत्यर्थ तारण निर्माण केले, आणि स्वतःच्या नीतिमत्वाने त्यांना आधार दिला.

  24. त्यांनी नीतिमत्वास त्यांचे चिलखत म्हणून चढविले आणि त्यांच्या मस्तकावर तारणाचे शिरस्त्राण घातले; सूडरूपी वस्त्र परिधान केला आवेश हा अंगरखा म्हणून स्वतःला पांघरले.

  25. मग तुझे सर्व लोक नीतिमान होतील आणि ते त्यांच्या भूमीचे सर्वकाळचे मालक बनतील. कारण ते मी रोपलेली फांदी आहेत, माझा गौरव प्रकट करण्यासाठी माझी हस्तकृती आहेत.