Skip to content

Righteousness बद्दल बायबलमधील वचने

480 वचने · 132 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.

  2. मी याहवेहमध्ये अत्यानंदित होतो; माझा आत्मा माझ्या परमेश्वरात हर्षोल्हासित होतो. जसे वराचे मस्तक याजकाप्रमाणे विभूषित केले जाते, किंवा वधू दागिन्यांनी स्वतःला अलंकृत करते, तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत आणि नीतिमत्वाच्या अंगरख्याने मला आच्छादले आहे.

  3. जशी माती अंकुराला उगविते आणि बाग बीज वाढविते तसे सार्वभौम याहवेह नीतिमत्व आणि प्रशंसा सर्व राष्ट्रासमोर अंकुरित करतील.

  4. सीयोनचा निर्दोषपणा सूर्योदयासारखा उजळून, मी निःशब्द राहणार नाही, व यरुशलेमचे तारण जळत्या मशालीसारखे सिद्ध होईपर्यंत, मी शांत राहणार नाही.

  5. आम्ही सर्वच अशुद्ध व्यक्तीसारखे झालो आहोत. आणि आमच्या नीतीची कृत्ये घाणेरड्या चिंध्या आहेत; आम्ही सर्व पानांप्रमाणे कोमेजतो, वाऱ्याने उडवून न्यावे, तशी आमची पापे आम्हाला दूर वाहून नेतात.

  6. तेव्हा यहूदीयाचे रक्षण होईल आणि इस्राएल सुरक्षिततेने जगेल. याहवेह आमचे नीतिमान तारणकर्ता या नावाने त्यांना संबोधित करण्यात येईल.

  7. “समजा एक नीतिमान मनुष्य आहे जो न्याय्य व योग्य आहे तेच करतो जे.

  8. तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही. तो आपल्या शेजार्‍याच्या पत्नीला भ्रष्ट करीत नाही किंवा मासिक पाळीच्या वेळी स्त्रीबरोबर लैंगिक संबंध करीत नाही.

  9. तो कोणावर अत्याचार करीत नाही, तर उसने देताना घेतलेले गहाण परत करतो. जो लुटत नाही तर आपले अन्न भुकेल्यांस देतो आणि वस्त्रहीनांना कपडे पुरवितो.

  10. व्याजावर कोणाला उसने देत नाही त्यांच्याकडून आपला नफा करून घेत नाही. वाईट करण्यापासून आपला हात आवरतो आणि दोन गटांमधील न्याय सत्याने करतो.

  11. तो माझे विधी पाळतो आणि विश्वासूपणे माझे नियम राखतो. तो मनुष्य न्यायी आहे; तो निश्चित जगेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  12. गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांनी जर परत केल्या, चोरून घेतलेले परत केले, जीवन देणारे नियम पाळले आणि काही वाईट केले नाही; तो व्यक्ती खचित जगेल; ते मरणार नाहीत.

  13. नदीच्या दोन्ही बाजूंना सर्वप्रकारच्या फळांची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत, ना त्यांची फळे संपतील. प्रत्येक महिन्यात ते फळे देतील, कारण त्यांच्याकडे पवित्रस्थानातून पाणी वाहते. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यांची पाने आरोग्यासाठी वापरली जातील.”

  14. म्हणून महाराज, आनंदाने माझा सल्ला स्वीकारा: चांगले ते करून आपली पापे सोडा आणि वाईट सोडून पीडितांवर दया करा. मग तुमची समृद्धी होत राहील.”

  15. “तुमचे लोक आणि तुमचे पवित्र शहर यासाठी सत्तर ‘सप्तके’ निर्धारित केली गेली आहे की त्यांनी अपराधाचा अंत करावा आणि पापाचा शेवट करावा आणि दुष्टतेसाठी पश्चात्ताप करावा, सनातन नीतिमत्व आणावे, दृष्टान्त आणि संदेश यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि परमपवित्रस्थानाला अभिषेक करण्यात यावा.

  16. जे सुज्ञ आहेत ते आकाशातील प्रकाशासारखे प्रज्वलित होतील. तसेच अनेकांना नीतिमार्गाकडे वळवणारे सदासर्वकाळ तार्‍यांप्रमाणे चकाकतील.

  17. तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा, न बदलणार्‍या प्रीतीचे फळ घ्या, आणि पडीक जमीन नांगरून टाका; जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत, याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे.

  18. असे लोक आहेत जे न्यायाला कडूपणात बदलतात आणि नीतिमत्ता धुळीस मिळवितात.

  19. या देशातील नम्रजन हो, याहवेहचा ध्यास करा, तुम्ही जे त्यांच्या आज्ञा पाळता. धार्मिकतेचा ध्यास करा, नम्रतेचा ध्यास करा; याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी कदाचित तुम्हाला आश्रयस्थान मिळेल.

  20. रुपे शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल; तो लेवींना सोने व रुप्याप्रमाणे शुद्ध करेल. मग याहवेहकडे नीतिमत्तेने अर्पणे वाहणारे पुरुष असतील,

  21. परंतु तुम्ही जे माझे नाव सन्माननीय मानता, त्या तुम्हासाठी नीतिमत्वाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या किरणात आरोग्य असेल. मग तुम्ही बाहेर जाल व धष्टपुष्ट वासरांप्रमाणे बागडाल.

  22. येशू त्याला म्हणाले, “आता असेच होऊ दे, कारण सर्व नीतिमत्व अशाप्रकारे पूर्ण करणे आपल्याला योग्य आहे.” तेव्हा योहानाने त्यांचा बाप्तिस्मा केला.

  23. धन्य आहेत ते, ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे, कारण ते तृप्त केले जातील.

  24. धन्य आहेत ते, ज्यांचा नीतिमत्वासाठी छळ करण्यात येतो, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

  25. कारण मी तुम्हाला सांगतो की, परूशी आणि इतर नियमशास्त्र शिक्षक यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक असल्याशिवाय, तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात कधीही प्रवेश मिळणार नाही.