Skip to content

Righteousness बद्दल बायबलमधील वचने

480 वचने · 132 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दोघेही परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान असून प्रभूच्या आज्ञा व नियम पालन करण्यामध्ये निर्दोष होते.

  2. पवित्रपणाने आणि नीतिमत्त्वाने आमचे सर्व दिवस त्यांच्यासमोर घालवावेत.

  3. यावर समुदायाने त्याला विचारले, “तर मग आम्ही काय करावे?”

  4. यावर योहानाने उत्तर दिले, “तुमच्याजवळ दोन अंगरखे असतील, तर ज्याच्याजवळ एकही नाही त्याला द्यावा, तुमच्याजवळ अन्न असेल, तर त्यांनीही तसेच करावे.”

  5. जकातदारही बाप्तिस्मा घेण्यासाठी आले आणि त्यांनी त्याला विचारले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”

  6. योहानाने उत्तर दिले, “जे जमा करावयाचे आहे, त्यापेक्षा अधिक घेऊ नका.”

  7. काही शिपायांनी विचारले, “आम्ही काय करावे?” योहानाने उत्तर दिले. “धमक्या देऊन किंवा खोटे आरोप रचून पैसा उकळू नका आणि आपल्या वेतनात संतुष्ट राहा.”

  8. काही बी उत्तम जमिनीत पडते, ते प्रामाणिक व चांगल्या अंतःकरणाच्या लोकांचे प्रतीक आहे, जे परमेश्वराचे वचन ऐकतात व धरून राहतात आणि धीराने पीक देतात.

  9. तर परमेश्वराचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्यांना विनवण्या करतात, त्या लोकांना ते न्याय देणार नाहीत काय? ते त्यांच्यासंबंधी उशीर करतील काय?

  10. आपण नीतिमान आहोत याचे समर्थन करून इतर सर्वांना तुच्छ मानत होते अशा लोकांसाठी त्यांनी हा दाखला सांगितला:

  11. परंतु जो सत्याने जीवन जगतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की जे काही त्यांनी केले ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहे, हे स्पष्ट दिसून यावे.

  12. जे कोणी त्यांची साक्ष स्वीकारतात, त्यांनी असे प्रमाणित केले की परमेश्वर सत्य आहे.

  13. जो कोणी परमेश्वरापासून आहे तो परमेश्वराचे शब्द ऐकतो. तुम्ही त्यांचे ऐकत नाही, याचे कारण हेच की तुम्ही परमेश्वराचे नाही.”

  14. येशू म्हणाला, “मला भूत लागलेले नाही, कारण मी माझ्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता.

  15. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्वजण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”

  16. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच मजवर प्रीती करतो. जो मजवर प्रीती करतो त्यावर माझे पिताही प्रीती करतील आणि मी देखील त्याजवर प्रीती करेन व स्वतः त्यांना प्रकट होईन.”

  17. नंतर यहूदाह (यहूदाह इस्कर्योत नव्हे) म्हणाला, “पण प्रभूजी, आपण फक्त आम्हाला प्रकट होणार पण जगाला का प्रकट होणार नाही?”

  18. येशूंनी उत्तर दिले, “कारण जो कोणी मजवर प्रीती करतो तो माझे शिक्षण आचरणात आणेल. माझे पितादेखील त्यांच्यावर प्रीती करतील आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ व त्यांच्याबरोबर वस्ती करू.

  19. जो कोणी माझ्यावर प्रीती करीत नाही, तो माझे शिक्षण पाळीत नाही. माझी जी वचने तुम्ही ऐकत आहात ती माझी स्वतःची नाहीत; तर ज्याने मला पाठविले त्या पित्याची आहेत.

  20. म्हणून मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही.

  21. “मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही.

  22. तुम्ही मुबलक फळ देता तेव्हा हे दाखविता की तुम्ही माझे शिष्य आहात, हे माझ्या पित्याच्या गौरवासाठी आहे.

  23. माझी आज्ञा ही आहे: मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.

  24. आता योप्पामध्ये टबीथा या नावाची शिष्या राहत होती, ग्रीक भाषेमध्ये तिचे नाव दुर्कस असे होते; ती सदैव गरिबांची मदत व चांगली कृत्ये करीत असे.

  25. परंतु प्रत्येक राष्ट्रांमध्ये जे त्यांचे भय धरतात व योग्य तेच करतात त्या सर्वांना ते स्वीकारतात.