Skip to content

Righteousness बद्दल बायबलमधील वचने

480 वचने · 132 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्‍या माणसांपासून दूर ठेवील.

  2. ज्यांनी अंधाराच्या मार्गाने जाण्यासाठी सरळपणाच्या वाटा सोडून दिल्या आहेत,

  3. ज्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो आणि दुष्टांच्या कुटिलपणात जे उल्हासतात,

  4. ज्यांचे मार्ग विकृत आहेत आणि ज्यांच्या वाटा विपरीत आहेत!

  5. सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्‍या स्त्रीपासून,

  6. जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे, आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे.

  7. निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात.

  8. तिच्याकडे जाणारा परत येत नाही किंवा जीवनाच्या मार्गावर येत नाही.

  9. यासाठी तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालशील, आणि नीतिमानांच्या मार्गांचे अवलंबन करशील.

  10. कारण याहवेहना कुटिलपणाबद्दल घृणा वाटते, परंतु जो नीतिमान आहे त्याला ते विश्वासपात्र मानतात.

  11. दुष्टाईने मिळविलेल्या संपत्तीस कायमचे मूल्य नसते परंतु धार्मिकता मृत्यूपासून सोडविते.

  12. याहवेह नीतिमान मनुष्याची उपासमार होऊ देत नाहीत, परंतु दुष्टांची लालसा ते विफल करतात.

  13. नीतिमान मनुष्याचे वेतन जीवन आहे, परंतु दुष्ट मनुष्याचे कमाई पाप आणि मृत्यू हेच आहेत.

  14. दुष्ट ज्याला भितो, तेच त्याच्यावर येईल; नीतिमान मनुष्याच्या इच्छा फलद्रूप होतील.

  15. नीतिमान लोक कधीही उपटून टाकले जाणार नाहीत, परंतु दुष्ट लोक भूमीवर राहणार नाहीत.

  16. निर्दोष मनुष्यांची नीतिमत्ता त्यांचे मार्ग सरळ ठेवते, परंतु दुष्ट लोक स्वतःच्या वाईट कृत्यांमुळे पतन पावतात.

  17. नीतिमानाची नीतिमत्ता त्यांची सुटका करते, परंतु विश्वासघातकी त्यांच्या वाईट इच्छांच्या सापळ्यात अडकतात.

  18. नीतिमान मनुष्याची संकटातून सुटका होते, आणि त्याऐवजी दुष्ट मनुष्य संकटात पडतो.

  19. दुष्ट मनुष्याला मिळणारे वेतन फसवे असते; परंतु जो नीतिमत्तेचे बीज पेरतो त्याला निश्चितच बक्षीस मिळते.

  20. खरोखरच नीतिमानाला जीवन प्राप्त होते, परंतु दुष्कर्मांच्या मागे लागणारा मृत्यू ओढवून घेतो.

  21. नीतिमानाच्या इच्छेचा परिणाम चांगलाच असतो, परंतु दुष्टाची आशा केवळ प्रक्रोपच आणते.

  22. जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, तो नाश पावतील, परंतु नीतिमान मनुष्य हिरव्या पानाप्रमाणे बहरेल.

  23. नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो सुज्ञ आहे तो आत्मे जिंकतो.

  24. दुष्टाईने मनुष्य जीवनात स्थिर होत नाही, परंतु नीतिमानाचे मूळ कधीही उखडले जाऊ शकत नाही.

  25. नीतिमान मनुष्याची योजना न्याय्य असते, परंतु दुष्टाचा सल्ला कपटी असतो.