मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इफिसकरांस १:१सुमारे इ.स. ६४

    परमेश्वराच्या इच्छेने झालेला ख्रिस्त येशूंचा प्रेषित पौल याजकडून,

  2. इफिसकरांस १:२सुमारे इ.स. ६४

    परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.

  3. इफिसकरांस १:३सुमारे इ.स. ६४

    परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो, ज्यांनी आपल्याला स्वर्गामधील सर्व आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे.

  4. इफिसकरांस १:४सुमारे इ.स. ६४

    आम्ही त्यांच्या दृष्टीने पवित्र आणि निष्कलंक असावे म्हणून त्यांनी जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये प्रीतीमुळेच निवडले.

  5. इफिसकरांस १:५सुमारे इ.स. ६४

    त्यांच्या आनंदास आणि इच्छेस अनुसरून येशू ख्रिस्ताद्वारे आपण दत्तकपुत्र व्हावे, ही त्यांची पूर्व योजना होती;

  6. इफिसकरांस १:६सुमारे इ.स. ६४

    त्यांच्या प्रिय पुत्राद्वारे आपल्याला मुक्तपणे दिलेल्या गौरवयुक्त कृपेची स्तुती व्हावी.

  7. इफिसकरांस १:७सुमारे इ.स. ६४

    त्यांच्यामध्ये परमेश्वराच्या विपुल कृपेद्वारे व त्यांच्या रक्ताद्वारे खंडणी म्हणून आपल्याला पापांची क्षमा देऊन

  8. इफिसकरांस १:८सुमारे इ.स. ६४

    आपल्यावर कृपेची वृष्टी केली आहे. सर्व ज्ञान व बुद्धीने,

  9. इफिसकरांस १:९सुमारे इ.स. ६४

    त्यांनी ख्रिस्तामध्ये त्यांच्या इच्छेचे रहस्य त्यांच्या उद्देशानुसार आपल्याला कळविले आहे.

  10. इफिसकरांस १:१०सुमारे इ.स. ६४

    ही योजना काळाच्या पूर्णतेची होती, यासाठी की स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र व्हाव्या.

  11. इफिसकरांस १:११सुमारे इ.स. ६४

    कारण ज्यांच्या इच्छेनुसार व उद्देशानुसार जे सर्वकाही चालवितात, त्यांच्या पूर्व योजनेनुसार आपण त्यांच्यामध्ये निवडलेले होतो.

  12. इफिसकरांस १:१२सुमारे इ.स. ६४

    यात उद्देश असा होता की, आपण ज्यांनी ख्रिस्तावर प्रथम आशा ठेवली होती, त्यांनी त्यांच्या गौरवाच्या स्तुतीचे साधन व्हावे.

  13. इफिसकरांस १:१३सुमारे इ.स. ६४

    जेव्हा तुम्ही सत्याचा संदेश ऐकला, आणि तारणाच्या शुभवार्तेवर विश्वास ठेवला, तेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये समावेश झाला व तुम्हावरही वचनदत्त पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेला,

  14. इफिसकरांस १:१४सुमारे इ.स. ६४

    आणि हा आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी खंडणी व आपल्याला वतनाचा विसार म्हणून त्यांच्या गौरवाच्या स्तुतीसाठी दिला आहे.

  15. इफिसकरांस १:१५सुमारे इ.स. ६४

    या कारणासाठी, प्रभू येशूंवरील तुमच्या विश्वासाबद्दल आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले, तेव्हापासून

  16. इफिसकरांस १:१६सुमारे इ.स. ६४

    माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण ठेवून तुम्हासाठी आभार मानण्याचे मी थांबविले नाही.

  17. इफिसकरांस १:१७सुमारे इ.स. ६४

    माझे हे मागणे आहे, की तुम्ही त्यांना अधिक चांगल्या रीतीने ओळखावे म्हणून परमेश्वर, जे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरवशाली पिता, यांनी तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा.

  18. इफिसकरांस १:१८सुमारे इ.स. ६४

    मी प्रार्थना करतो की तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित केले जावेत, आणि पवित्र जनांमध्ये असलेल्या गौरवशाली वतनाच्या संपत्तीच्या आशेसाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, हे तुम्ही ओळखून घ्यावे.

  19. इफिसकरांस १:१९सुमारे इ.स. ६४

    जे विश्वास ठेवतात, त्यांना अमर्याद सामर्थ्य आहे. हे तेच महापराक्रमी सामर्थ्य आहे

  20. इफिसकरांस १:२०सुमारे इ.स. ६४

    ज्याच्यायोगे त्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले आणि स्वर्गात परमेश्वराच्या उजवीकडे बसविले,

  21. इफिसकरांस १:२१सुमारे इ.स. ६४

    जे स्थान सर्व शासन आणि अधिकार, सामर्थ्य आणि प्रभुत्व व सध्याच्या युगात व येणार्‍या युगातील कोणत्याही नावांपेक्षाही सर्वोच्च आहे,

  22. इफिसकरांस १:२२सुमारे इ.स. ६४

    आणि परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या पायाखाली ठेवले आणि मंडळीसाठी प्रत्येक गोष्टींमध्ये मस्तक म्हणून नियुक्त केले.

  23. इफिसकरांस १:२३सुमारे इ.स. ६४

    मंडळी जे त्यांचे शरीर, तिला त्यांच्या परिपूर्णतेने सर्वकाही सर्वप्रकारे पुरवितात.

  24. इफिसकरांस २:१सुमारे इ.स. ६४

    तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता.

  25. इफिसकरांस २:२सुमारे इ.स. ६४

    त्यामध्ये तुम्ही जगाच्या रीतीप्रमाणे वागत होता व आकाशमंडळातील शासक आत्मा जो प्रत्यक्ष या क्षणीही आज्ञा न पाळणार्‍यांमध्ये कार्य करीत आहे, त्याच्यामागे चालणारे होता.