मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 करिंथकरांस १५:३८सुमारे इ.स. ५९

    मग परमेश्वर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला शरीर देतो आणि प्रत्येक प्रकारच्या बीजाला ते त्याचे स्वतःचेच शरीर देतात.

  2. 1 करिंथकरांस १५:३९सुमारे इ.स. ५९

    सर्व देह एकसारखे नसतात: मानवाचा देह एकप्रकारचा, पशूंचा दुसर्‍या प्रकारचा, पक्षांचा एक आणि मत्स्याचा एक.

  3. 1 करिंथकरांस १५:४०सुमारे इ.स. ५९

    त्याचप्रमाणे स्वर्गीय शरीरे आणि दैहिक शरीरेही आहेत. परंतु स्वर्गीय शरीराचे सौंदर्य एका प्रकारचे आणि भौतिक शरीराचे सौंदर्य दुसर्‍या प्रकारचे आहे.

  4. 1 करिंथकरांस १५:४१सुमारे इ.स. ५९

    सूर्याला एका विशिष्ट प्रकारचे तेज असते, चंद्राला दुसर्‍या प्रकारचे आणि तार्‍यांना वेगळ्या प्रकारचे तेज आहे. शिवाय सर्व तार्‍यांचेही तेज वेगवेगळे असते.

  5. 1 करिंथकरांस १५:४२सुमारे इ.स. ५९

    अशाप्रकारे ज्यांचे मरणातून पुनरुत्थान झाले त्यांचे होईल. नाशवंत असे शरीर पेरले जाते, अविनाशी असे उठविले जाते.

  6. 1 करिंथकरांस १५:४३सुमारे इ.स. ५९

    अपमानात पेरले जाते पण गौरवात उठविले जाते आणि अशक्तपणात पेरले जाते पण शक्तीत उठविले जाते.

  7. 1 करिंथकरांस १५:४४सुमारे इ.स. ५९

    नैसर्गिक शरीर पेरले जाते, आत्मिक शरीर उठविले जाते. जर नैसर्गिक शरीर आहे तर आत्मिक शरीरही आहे.

  8. 1 करिंथकरांस १५:४५सुमारे इ.स. ५९

    असे लिहिले आहे: “पहिला मानव आदाम जिवंत प्राणी झाला.” शेवटचा आदाम जीवन देणारा आत्मा आहे.

  9. 1 करिंथकरांस १५:४६सुमारे इ.स. ५९

    प्रथम आत्मिक आले नाही तर शारीरिक, त्यानंतर आत्मिक आहे.

  10. 1 करिंथकरांस १५:४७सुमारे इ.स. ५९

    पहिला मानव भूमीच्या धुळीतून आला; दुसरा मानव स्वर्गापासून होता.

  11. 1 करिंथकरांस १५:४८सुमारे इ.स. ५९

    जसा मानव मातीचा होता, बाकीचेही त्याच्यासारखे मातीचे आहेत आणि जो स्वर्गातील मनुष्य जसा आहे, तसेच जे स्वर्गातील तेही आहेत.

  12. 1 करिंथकरांस १५:४९सुमारे इ.स. ५९

    आणि आता ज्याप्रमाणे आपण शारीरिक मनुष्याचे प्रतिरूप धारण केले आहे, तसेच आपण स्वर्गीय मनुष्याचे प्रतिरूप धारण करू.

  13. 1 करिंथकरांस १५:५०सुमारे इ.स. ५९

    माझ्या बंधू व भगिनींनो मी तुम्हाला जाहीर करतो की रक्त व मांस यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे नाशवंताला अविनाशी वतन मिळू शकत नाही.

  14. 1 करिंथकरांस १५:५१सुमारे इ.स. ५९

    ऐका, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो: आपण सर्वच मरणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ.

  15. 1 करिंथकरांस १५:५२सुमारे इ.स. ५९

    हे सर्व क्षणार्धात, डोळ्याची उघडझाप होते न होते तोच, शेवटचे रणशिंग वाजल्याबरोबर घडून येईल. कारण तुतारीचा नाद होईल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठविले जातील, आणि आपण बदलले जाऊ.

  16. 1 करिंथकरांस १५:५३सुमारे इ.स. ५९

    कारण नाशवंताने अविनाशीपणाला धारण केले पाहिजे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केलेच पाहिजे.

  17. 1 करिंथकरांस १५:५४सुमारे इ.स. ५९

    जेव्हा जे नाशवंत आहे ते अविनाशीपण परिधान करेल, आणि जे मर्त्य आहे ते अमरत्व, तेव्हा हे शास्त्रलेखातील वचन सत्य होईल: “विजयाने मृत्यूला गिळून टाकले आहे.”

  18. 1 करिंथकरांस १५:५५सुमारे इ.स. ५९

    “अरे मरणा, तुझा विजय कुठे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे?”

  19. 1 करिंथकरांस १५:५६सुमारे इ.स. ५९

    कारण मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे.

  20. 1 करिंथकरांस १५:५७सुमारे इ.स. ५९

    परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.

  21. 1 करिंथकरांस १५:५८सुमारे इ.स. ५९

    यास्तव, माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, खंबीर व्हा आणि कशानेही विचलित होऊ नका. आपल्या स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या कार्यात वाहून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीही व्यर्थ होणार नाही.

  22. 1 करिंथकरांस १६:१सुमारे इ.स. ५९

    आता प्रभूच्या लोकांना आर्थिक मदत करण्याबद्दल: गलातीया येथील मंडळ्यांना मी जे करावयास सांगितले ते तुम्हीही करा.

  23. 1 करिंथकरांस १६:२सुमारे इ.स. ५९

    प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी, तुम्हातील प्रत्येकाने मिळालेल्या उत्पन्नातून काही रक्कम बाजूला काढून, साठवून ठेवावी, म्हणजे मी तिथे आल्यानंतर वर्गण्या गोळा कराव्या लागणार नाहीत.

  24. 1 करिंथकरांस १६:३सुमारे इ.स. ५९

    मग, मी तिकडे आल्यावर, तुम्ही स्वतः निवडलेले लोक व ओळख करून देणारी माझी पत्रे आणि तुमची प्रेमाची देणगी घेऊन मी त्यांना यरुशलेमला पाठवेन.

  25. 1 करिंथकरांस १६:४सुमारे इ.स. ५९

    मीही जाणे उचित होईल असे वाटले, तर आम्ही सोबतीने प्रवास करू.