- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 1 करिंथकरांस १४:२८सुमारे इ.स. ५९
पण अर्थ सांगणारा उपस्थित नसला, तर अन्य भाषा बोलणार्यांनी मंडळीत शांत राहवे. त्याने स्वतःशी व परमेश्वराशी बोलावे.
- 1 करिंथकरांस १४:२९सुमारे इ.स. ५९
संदेश देणार्यांपैकी दोघांनी किंवा तिघांनीच बोलावे आणि इतरांनी संदेशाची काळजीपूर्वक पारख करावी.
- 1 करिंथकरांस १४:३०सुमारे इ.स. ५९
बसलेल्यांपैकी एखाद्याला काही प्रकटीकरण झाले, तर पहिल्या संदेश देणार्यांनी शांत व्हावे.
- 1 करिंथकरांस १४:३१सुमारे इ.स. ५९
ते एकामागून एक संदेश देतील म्हणजे प्रत्येकाला बोध मिळून त्यांना उत्तेजन मिळेल.
- 1 करिंथकरांस १४:३२सुमारे इ.स. ५९
संदेश देणार्याचे आत्मे संदेश देणार्यांच्या नियंत्रणात असतात.
- 1 करिंथकरांस १४:३३सुमारे इ.स. ५९
कारण परमेश्वर हे अव्यवस्था व गोंधळ यांचे परमेश्वर नसून शांततेचे आहेत—हे प्रभूच्या सर्व मंडळ्यांमध्ये दिसले पाहिजे.
- 1 करिंथकरांस १४:३४सुमारे इ.स. ५९
स्त्रियांनी मंडळीमध्ये शांत राहवे. स्त्रियांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी अधीन राहवे.
- 1 करिंथकरांस १४:३५सुमारे इ.स. ५९
त्यांना काही गोष्टींची चौकशी करावयाची असल्यास, त्यांनी आपल्या पतीला घरी विचारावे. कारण एखाद्या स्त्रीने मंडळीला प्रवचन देणे ही लज्जास्पद बाब आहे.
- 1 करिंथकरांस १४:३६सुमारे इ.स. ५९
परमेश्वराच्या वचनाचा प्रारंभ तुम्हापासूनच झाला काय? आणि हे वचन फक्त तुम्हा लोकांपर्यंतच पोहोचले काय?
- 1 करिंथकरांस १४:३७सुमारे इ.स. ५९
आपल्याला पवित्र आत्म्याकडून संदेश देण्याचे किंवा दुसरे दान मिळाले आहे, असे वाटणार्यांनी हे ओळखावे, की मी जे लिहित आहे ती प्रभूची आज्ञा आहे.
- 1 करिंथकरांस १४:३८सुमारे इ.स. ५९
जर कोणी याकडे दुर्लक्ष करेल, तर त्यांच्याकडेही दुर्लक्ष केल्या जाईल.
- 1 करिंथकरांस १४:३९सुमारे इ.स. ५९
यास्तव, माझ्या बंधूंनो व भगिनींनो, संदेश देण्याची उत्कट इच्छा धरा आणि अन्य भाषेतून जे बोलतात त्यांना मना करू नका.
- 1 करिंथकरांस १४:४०सुमारे इ.स. ५९
तरीपण प्रत्येक गोष्ट सुव्यवस्थित आणि योग्यरीतिने केली जावी.
- 1 करिंथकरांस १५:१सुमारे इ.स. ५९
आता माझ्या बंधूंनो व भगिनींनो, ज्या शुभवार्तेचा मी तुम्हाला प्रचार केला होता, त्याची तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते, तिचा तुम्ही स्वीकार केला आणि तिच्यामध्ये तुम्ही खंबीरपणे उभे आहात.
- 1 करिंथकरांस १५:२सुमारे इ.स. ५९
या शुभवार्तेद्वारे तुमचे तारण झाले, ज्या वचनांचा मी तुम्हाला प्रचार केला त्यावर जर तुम्ही दृढविश्वास ठेवला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे.
- 1 करिंथकरांस १५:३सुमारे इ.स. ५९
प्रथम महत्त्वाचे म्हणजे जे मी स्वीकारले तेच तुम्हाला सांगत आलो आहे आणि ते म्हणजे वचनांनुसार: ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावले.
- 1 करिंथकरांस १५:४सुमारे इ.स. ५९
त्यांना पुरण्यात आले आणि तीन दिवसानंतर त्यांना शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे कबरेतून पुन्हा उठविण्यात आले,
- 1 करिंथकरांस १५:५सुमारे इ.स. ५९
आणि केफाला त्यांचे पहिल्यांदा दर्शन घडले, आणि नंतर बारा शिष्यांना.
- 1 करिंथकरांस १५:६सुमारे इ.स. ५९
त्यानंतर पाचशेपेक्षा अधिक बंधू व भगिनींना एकाच वेळी त्यांचे दर्शन घडले, त्यातील बहुतेक आजही जिवंत असले, तरी काहीजण मरण पावले आहेत.
- 1 करिंथकरांस १५:७सुमारे इ.स. ५९
याकोबाला आणि नंतर सर्व प्रेषितांना त्यांचे दर्शन झाले.
- 1 करिंथकरांस १५:८सुमारे इ.स. ५९
सर्वात शेवटी, एखाद्या अवेळी जन्मलेल्यासारखे मला त्यांचे दर्शन झाले.
- 1 करिंथकरांस १५:९सुमारे इ.स. ५९
कारण सर्व प्रेषितांपेक्षा मी सर्वात कनिष्ठ आहे आणि प्रेषित म्हणून घेण्याच्या किंचितही लायकीचा नाही, कारण मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला.
- 1 करिंथकरांस १५:१०सुमारे इ.स. ५९
आता मी जो काही आहे, तो परमेश्वराच्या कृपेमुळेच आहे; आणि त्यांची माझ्यावरील कृपा व्यर्थ गेली नाही. कारण इतर सर्वांपेक्षा मी अधिक कष्ट केले; परंतु मी नाही तर परमेश्वराची कृपा माझ्यावर असल्यामुळे हे झाले.
- 1 करिंथकरांस १५:११सुमारे इ.स. ५९
प्रचार मी किंवा त्यांनी केला, परंतु संदेश तोच आहे आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवला.
- 1 करिंथकरांस १५:१२सुमारे इ.स. ५९
परंतु जर ख्रिस्त मरणातून पुन्हा उठविले गेले असा आम्ही प्रचार करतो, तर मग मेलेल्यांचे पुनरुत्थान होणार नाही, असे तुमच्यापैकी काहीजण का म्हणतात?