मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 करिंथकरांस २:७सुमारे इ.स. ६०

    याउलट, त्याला आता क्षमा करण्याची व त्याचे सांत्वन करण्याची वेळ आहे, नाही तर तो अतिशय दुःखामध्ये बुडून जाण्याची शक्यता आहे.

  2. 2 करिंथकरांस २:८सुमारे इ.स. ६०

    आता मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्याच्यावर प्रीती करता याची त्याला खात्री द्या.

  3. 2 करिंथकरांस २:९सुमारे इ.स. ६०

    हे पत्र लिहिण्याचे दुसरे कारण आहे की तुम्ही परीक्षेत स्थिर आहात व प्रत्येक गोष्टीत आज्ञा पाळता हे अजमावून पाहावे.

  4. 2 करिंथकरांस २:१०सुमारे इ.स. ६०

    तुम्ही एखाद्याला क्षमा करता, त्याला मीही क्षमा करतो. ज्याची मी क्षमा केली आहे आणि जर क्षमा करण्याचे बाकी आहे तर ती ख्रिस्ताच्या समक्ष तुमच्या हितासाठी केली आहे.

  5. 2 करिंथकरांस २:११सुमारे इ.स. ६०

    यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये; कारण त्याचे डाव आपल्याला कळत नाहीत असे नाही.

  6. 2 करिंथकरांस २:१२सुमारे इ.स. ६०

    मी त्रोवास शहरात ख्रिस्ताच्या शुभवार्तेचा प्रचार करण्यास आल्यावर, प्रभूंनी माझ्यासाठी द्वार उघडल्याचे मला आढळून आले.

  7. 2 करिंथकरांस २:१३सुमारे इ.स. ६०

    परंतु माझा बंधू तीत, तिथे मला भेटला नाही, त्यामुळे माझ्या मनाला शांती नव्हती. म्हणून मी तेथील लोकांचा निरोप घेतला व तडक मासेदोनियाकडे गेलो.

  8. 2 करिंथकरांस २:१४सुमारे इ.स. ६०

    परंतु परमेश्वराची स्तुती असो! कारण ते आम्हाला ख्रिस्ताच्या विजयोत्सवात आमचे नेत्रृत्व करण्यास आमच्यापुढे चालतात व आम्ही त्यांचे दास असून त्यांच्यामागे चालतो आणि प्रभूंच्या ज्ञानाविषयीचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी ते आमचा उपयोग करून घेतात.

  9. 2 करिंथकरांस २:१५सुमारे इ.स. ६०

    ज्यांचे तारण होत आहे व ज्यांचा नाश होत आहे त्या सर्वांसाठी आम्ही परमेश्वरासाठी ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत

  10. 2 करिंथकरांस २:१६सुमारे इ.स. ६०

    एकाला आम्ही असा सुगंध आहोत की ज्यामुळे मरण येते व दुसर्‍याला असा सुगंध आहोत की ज्यामुळे जीवन मिळेल. आणि अशा कामासाठी कोण योग्य आहे?

  11. 2 करिंथकरांस २:१७सुमारे इ.स. ६०

    आम्ही अशा अनेक लोकांसारखे नाही की जे परमेश्वराचे वचन सांगून लाभ मिळवितात. उलट ख्रिस्तामध्ये आम्ही परमेश्वरासमोर प्रामाणिकपणाने आणि परमेश्वराने पाठविलेल्या माणसाप्रमाणे बोलत असतो.

  12. 2 करिंथकरांस ३:१सुमारे इ.स. ६०

    आम्ही पुन्हा स्वतःची प्रशंसा करण्यास प्रांरभ केला आहे काय? आणि इतर काही लोकांसारखे शिफारसपत्र तुम्हासाठी व तुम्हापासून घेण्याची गरज आहे का?

  13. 2 करिंथकरांस ३:२सुमारे इ.स. ६०

    आमच्या हृदयांवर लिहिलेले, सर्वांना माहीत असलेले व वाचले जाणारे असे तुम्ही स्वतः आमचे पत्र आहात.

  14. 2 करिंथकरांस ३:३सुमारे इ.स. ६०

    तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आमच्या सेवेचा परिणाम, जे शाईने लिहिलेले नाही परंतु जिवंत परमेश्वराच्या आत्म्याने, दगडी पाटीवर नसून, मानवी हृदयाच्या पाटीवर कोरलेले आहे हे दाखवा.

  15. 2 करिंथकरांस ३:४सुमारे इ.स. ६०

    असा आमचा भरवसा ख्रिस्ताद्वारे परमेश्वरावर आहे.

  16. 2 करिंथकरांस ३:५सुमारे इ.स. ६०

    आम्ही आमच्यामध्ये कार्यक्षम आहोत असे नाही किंवा आम्ही काही दावा करू शकतो असे आम्हाला वाटत नाही; कारण आमची कार्यक्षमता परमेश्वरापासून आहे.

  17. 2 करिंथकरांस ३:६सुमारे इ.स. ६०

    नव्या कराराची सेवा करणारे म्हणून त्यांनी आम्हाला योग्य केले आहे. हा करार लेखी नव्हे तर आत्म्यापासून आहे; लेख मृत करतो, परंतु पवित्र आत्मा जीवन देतो.

  18. 2 करिंथकरांस ३:७सुमारे इ.स. ६०

    आता जे अक्षर दगडावर कोरलेले असून ज्याचा परिणाम मरण होता, ती सेवा एवढी गौरवी होती, की जरी कमी होणार्‍या तेजामुळे इस्राएली लोकांना मोशेच्या चेहर्‍याकडे स्थिर पाहत राहणे अशक्य झाले होते, पण हळूहळू ते तेज कमी होत गेले.

  19. 2 करिंथकरांस ३:८सुमारे इ.स. ६०

    पवित्र आत्म्याची सेवा त्याहूनही खूपच अधिक वैभवशाली नव्हे काय?

  20. 2 करिंथकरांस ३:९सुमारे इ.स. ६०

    दंडाज्ञा करणारी सेवा जर एवढी तेजस्वी होती, तर नीतिमत्वाची सेवा त्याहून कितीतरी अधिक तेजस्वी असेल!

  21. 2 करिंथकरांस ३:१०सुमारे इ.स. ६०

    खरे म्हणजे जे तेजस्वी होते ते तेज नसून त्याची तुलना करता, पहिल्या तेजाचे मोल काहीच नाही.

  22. 2 करिंथकरांस ३:११सुमारे इ.स. ६०

    आणि जर लोप पावत चाललेले तेजोमय होते, तर जे अनंतकालिक आहे त्याचे तेज निश्चितच अधिक आहे.

  23. 2 करिंथकरांस ३:१२सुमारे इ.स. ६०

    आम्हाला अशी आशा आहे म्हणून आम्हाला मोठे धैर्यही आहे.

  24. 2 करिंथकरांस ३:१३सुमारे इ.स. ६०

    आम्ही मोशेसारखे नाही, ज्याने लोप पावत चाललेले वैभव इस्राएली लोकांनी पाहू नये म्हणून आपल्या मुखावर आच्छादन घातले.

  25. 2 करिंथकरांस ३:१४सुमारे इ.स. ६०

    परंतु त्यांची मने आता मंद झाली व जुना करार वाचला जात असताना आजही तेच आच्छादन आहे. ते फक्त ख्रिस्तामध्येच दूर केले जाईल.