- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 1 करिंथकरांस ११:३१सुमारे इ.स. ५९
परंतु जर तुम्ही स्वतःला पडताळून पाहिले असते, तर तुमचा असा न्याय झाला नसता.
- 1 करिंथकरांस ११:३२सुमारे इ.स. ५९
जरी आपला न्याय प्रभूने अशा रीतीने केला, तरी तुम्हाला शिस्त लागावी, यासाठी की शेवटी जगाबरोबर आपणही दोषी ठरविले जाऊ नये.
- 1 करिंथकरांस ११:३३सुमारे इ.स. ५९
म्हणूनच, प्रिय बंधूंनो व भगिनींनो, तुम्ही भोजनासाठी एकत्र येता, तेव्हा सर्वजण एकमेकांसाठी थांबून एकत्रित भोजन करा.
- 1 करिंथकरांस ११:३४सुमारे इ.स. ५९
तुमच्यापैकी कोणी भुकेला असला तर त्याने घरीच काहीतरी खाऊन यावे, यासाठी की जेव्हा तुम्ही एकत्रित जेवता त्यावेळी दंडपात्र होऊ नये. इतर बाबींसंबंधी मी तिकडे आल्यावर पुढील मार्गदर्शन करेन.
- 1 करिंथकरांस १२:१सुमारे इ.स. ५९
आता, बंधूंनो आणि भगिनींनो, आत्मिक दानांसंदर्भात तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही.
- 1 करिंथकरांस १२:२सुमारे इ.स. ५९
तुम्हाला आठवतच असेल की तुम्ही गैरयहूदी होता, तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारे का होईना मुक्या मूर्तींच्या प्रभावाखाली भटकले गेला होता.
- 1 करिंथकरांस १२:३सुमारे इ.स. ५९
याच कारणासाठी तुम्हाला हे समजावे की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा कोणीही “येशू शापित असो” असे म्हणणार नाही आणि कोणी मनुष्य पवित्र आत्म्याशिवाय, “येशू प्रभू आहे” असेही म्हणणार नाही.
- 1 करिंथकरांस १२:४सुमारे इ.स. ५९
निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे.
- 1 करिंथकरांस १२:५सुमारे इ.स. ५९
सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे.
- 1 करिंथकरांस १२:६सुमारे इ.स. ५९
कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत.
- 1 करिंथकरांस १२:७सुमारे इ.स. ५९
आता प्रत्येकाला आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक कल्याणासाठी होते.
- 1 करिंथकरांस १२:८सुमारे इ.स. ५९
एकाला आत्म्याद्वारे ज्ञानाचा संदेश, तर तोच दुसर्याला बुद्धीचा संदेश एकाच आत्म्याद्वारे देतो.
- 1 करिंथकरांस १२:९सुमारे इ.स. ५९
त्याच आत्म्याद्वारे एकाला विश्वास, तर त्या एका आत्म्याद्वारे दुसर्याला रोग बरे करण्याची दाने मिळतात.
- 1 करिंथकरांस १२:१०सुमारे इ.स. ५९
तोच आत्मा काही जणांना चमत्कार करण्याचे सामर्थ्य देतो, तर इतर काही जणांना संकल्प सांगण्याचे, तर कित्येकांना आत्मे ओळखण्याचे सामर्थ्य देतो. आणखी काहींना तो अन्य भाषा बोलण्याचे ज्ञान देतो; आणि त्याचप्रमाणे इतरांना अन्य भाषेचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता देतो.
- 1 करिंथकरांस १२:११सुमारे इ.स. ५९
ही सर्व कार्ये एक आणि एकच आत्मा करतो आणि आपल्या निर्धारानुसार प्रत्येकाला वाटून देतो.
- 1 करिंथकरांस १२:१२सुमारे इ.स. ५९
जसे शरीर एक असून, अनेक अवयव आहेत, तरी हे सर्व अवयव मिळून एकच शरीर होते, तसेच ख्रिस्ताविषयीही आहे.
- 1 करिंथकरांस १२:१३सुमारे इ.स. ५९
काही यहूदी किंवा गैरयहूदी, काही गुलाम किंवा स्वतंत्र, आपण सर्व एकाच आत्म्याद्वारे एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा पावलेलो आहोत आणि आपल्या प्रत्येकाला एक आत्मा प्यावयास दिला आहे.
- 1 करिंथकरांस १२:१४सुमारे इ.स. ५९
आता शरीर एकच अवयव नाही, तर ते अनेक अवयवांनी मिळून बनलेले आहे.
- 1 करिंथकरांस १२:१५सुमारे इ.स. ५९
समजा पाय म्हणाला, “मी हात नाही म्हणून शरीराचा अवयव नाही,” तरी त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही.
- 1 करिंथकरांस १२:१६सुमारे इ.स. ५९
तसेच कानाने म्हटले, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा भाग नाही,” तर त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही.
- 1 करिंथकरांस १२:१७सुमारे इ.स. ५९
सर्व शरीर केवळ डोळा असते, तर ऐकावयास कसे आले असते? किंवा जर संपूर्ण शरीर केवळ कानच असते, तर वास कसा घेता आला असता?
- 1 करिंथकरांस १२:१८सुमारे इ.स. ५९
परंतु परमेश्वराने आपल्या योजनेप्रमाणे सर्व अवयवांना एकाच शरीरामध्ये त्याला पाहिजे तशी रचना केली आहे.
- 1 करिंथकरांस १२:१९सुमारे इ.स. ५९
ते केवळ एकच भाग असते, तर शरीर कुठे असते?
- 1 करिंथकरांस १२:२०सुमारे इ.स. ५९
तर मग अनेक अवयव आहेत, परंतु शरीर मात्र एकच आहे.
- 1 करिंथकरांस १२:२१सुमारे इ.स. ५९
डोळा हातास म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तकही पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.”