मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 करिंथकरांस १०:१४सुमारे इ.स. ५९

    यास्तव, माझ्या प्रिय मित्रांनो, मूर्तिपूजेपासून दूर पळा.

  2. 1 करिंथकरांस १०:१५सुमारे इ.स. ५९

    मी बुद्धिमान लोकांबरोबर बोलतो; मी जे तुम्हाला सांगत आहे त्याची पारख तुम्हीच करा.

  3. 1 करिंथकरांस १०:१६सुमारे इ.स. ५९

    उपकारस्तुतीचा प्याला ज्याबद्दल आपण उपकारस्तुती करतो ती ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सहभागिता नाही का? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराशी सहभागिता नाही का?

  4. 1 करिंथकरांस १०:१७सुमारे इ.स. ५९

    कारण भाकर एक आहे, आम्ही पुष्कळजण असलो तरी एक शरीर आहोत, आपण सर्वजण एकाच भाकरीचे सहभागी आहोत.

  5. 1 करिंथकरांस १०:१८सुमारे इ.स. ५९

    इस्राएली लोकांचा विचार करा: वेदीवर अर्पण केलेले यज्ञबली जे खातात, ते वेदीशी सहभागी होतात की नाही?

  6. 1 करिंथकरांस १०:१९सुमारे इ.स. ५९

    मूर्तींना अर्पिलेल्या अन्नास काही महत्त्व आहे किंवा मूर्तीला काही महत्त्व आहे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे काय?

  7. 1 करिंथकरांस १०:२०सुमारे इ.स. ५९

    नाही! गैरयहूदी लोक परमेश्वराला यज्ञ अर्पण करीत नसून भुतांना अर्पण करतात आणि भुतांशी तुम्ही सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही.

  8. 1 करिंथकरांस १०:२१सुमारे इ.स. ५९

    तुम्ही प्रभूचा प्याला आणि भुतांचा प्याला यातून एकाच वेळी पिऊ शकणार नाही. तसेच प्रभूचा मेज आणि भुतांचा मेज या दोन्हीमध्ये तुम्हाला एकाच वेळी सहभागी होता येत नाही.

  9. 1 करिंथकरांस १०:२२सुमारे इ.स. ५९

    प्रभूला ईर्षेस पेटवावे असा प्रयत्न आपण करतो काय? आपण त्यांच्यापेक्षा शक्तिमान आहोत काय?

  10. 1 करिंथकरांस १०:२३सुमारे इ.स. ५९

    “मला प्रत्येक गोष्ट करण्याची मुभा आहे,” असे तुम्ही म्हणता तरी प्रत्येक गोष्ट हितकारक असतेच असे नाही, “मला प्रत्येक गोष्ट करण्याची मुभा असली,” तरी सर्वगोष्टी वृद्धी करीत नाहीत.

  11. 1 करिंथकरांस १०:२४सुमारे इ.स. ५९

    कोणी स्वतःचे हित पाहू नये, तर दुसर्‍याचेही पाहावे.

  12. 1 करिंथकरांस १०:२५सुमारे इ.स. ५९

    बाजारात विकत मिळणारे मांस विवेकभावाकरिता प्रश्न न विचारता खा.

  13. 1 करिंथकरांस १०:२६सुमारे इ.स. ५९

    कारण, “पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही प्रभूचे आहे.”

  14. 1 करिंथकरांस १०:२७सुमारे इ.स. ५९

    एखाद्या गैरविश्वासू व्यक्तीने तुम्हाला भोजनाचे आमंत्रण दिले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर तुमच्यापुढे जे वाढले असेल, ते सदसद्विवेकबुद्धीने प्रश्न न विचारता खावे.

  15. 1 करिंथकरांस १०:२८सुमारे इ.स. ५९

    पण समजा, “हे यज्ञात वाहिलेले आहे” असे तुम्हाला कोणी सांगितले, तर ज्याने ही सूचना दिली त्याच्यासाठी व सदसद्विवेकबुद्धीसाठी तुम्ही ते खाऊ नये.

  16. 1 करिंथकरांस १०:२९सुमारे इ.स. ५९

    अशा प्रसंगी तुम्ही त्या माणसाची सदसद्विवेकबुद्धीने लक्षात घ्यावी, तुमची नव्हे. माझ्या स्वातंत्र्याचा न्याय दुसर्‍यांच्या विवेकभावाला अनुसरून का व्हावा?

  17. 1 करिंथकरांस १०:३०सुमारे इ.स. ५९

    किंवा जर मी त्या भोजनामध्ये परमेश्वराचे आभार मानून सहभागी झालो, तर ज्यासाठी मी धन्यवाद दिला त्याबद्दल मला दोष का देण्यात यावा?

  18. 1 करिंथकरांस १०:३१सुमारे इ.स. ५९

    तुम्ही जे खाता किंवा पिता किंवा जे काही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठीच करावे.

  19. 1 करिंथकरांस १०:३२सुमारे इ.स. ५९

    यहूदी असोत की गैरयहूदी असोत किंवा परमेश्वराची मंडळी असो, कोणालाही तुमच्यामुळे अडखळण होऊ नये.

  20. 1 करिंथकरांस १०:३३सुमारे इ.स. ५९

    मी सर्वप्रकारे सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतःचे भले पाहत नाही परंतु अनेकांचे भले पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.

  21. 1 करिंथकरांस ११:१सुमारे इ.स. ५९

    मी ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुसरण करतो, तसे तुम्हीही माझे अनुसरण करा.

  22. 1 करिंथकरांस ११:२सुमारे इ.स. ५९

    सर्व गोष्टीत तुम्ही माझी आठवण करता म्हणून मी तुमची प्रशंसा करतो व ज्या रूढी मी तुम्हाला सोपवून दिल्या, त्या तुम्ही घट्ट धरून ठेवल्या आहेत.

  23. 1 करिंथकरांस ११:३सुमारे इ.स. ५९

    परंतु एक गोष्ट तुम्हाला समजावी अशी माझी इच्छा आहे, प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे आणि प्रत्येक स्त्रीचे मस्तक तिचा पती आहे, ख्रिस्ताचा मस्तक परमेश्वर आहे.

  24. 1 करिंथकरांस ११:४सुमारे इ.स. ५९

    जो प्रत्येक पुरुष प्रार्थना करताना किंवा संदेश सांगताना आपल्या डोक्यावर आच्छादन ठेवतो, तो त्याच्या मस्तकाचा अनादर करतो.

  25. 1 करिंथकरांस ११:५सुमारे इ.स. ५९

    तसेच जी स्त्री डोक्यावर आच्छादन न घेता प्रार्थना करते किंवा संदेश सांगते, ती आपल्या पतीचा अनादर करते. तसे करणे म्हणजे जणू काय तिने आपल्या डोक्याचे मुंडण केल्यासारखे आहे.