- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 1 करिंथकरांस ९:१६सुमारे इ.स. ५९
कारण जर मी शुभवार्तेचा प्रचार करतो, तर मला प्रौढी मिरविण्याची गरज नाही, प्रचार करणे हे आवश्यक आहे, जर मी शुभवार्तेचा प्रचार करीत नाही तर माझा धिक्कार असो.
- 1 करिंथकरांस ९:१७सुमारे इ.स. ५९
मी प्रचार केला, तर मला त्याचे प्रतिफळ मिळेल; आणि स्वतःहून केला नाही तरी ती पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे.
- 1 करिंथकरांस ९:१८सुमारे इ.स. ५९
माझा मोबदला काय आहे? तो हा की: शुभवार्तेचा प्रचार करताना तो मोफत करावा आणि शुभवार्तेचा प्रचारक म्हणून आपला अधिकार पूर्णपणे गाजवू नये.
- 1 करिंथकरांस ९:१९सुमारे इ.स. ५९
मी स्वतंत्र आहे, कोणाच्याही अधीन नाही आणि तरीही जितक्यांना शक्य आहे तितक्यांना जिंकता यावे म्हणून मी स्वतःला सर्वांचा दास करून घेतले आहे.
- 1 करिंथकरांस ९:२०सुमारे इ.स. ५९
यहूदीयांना जिंकण्यासाठी मी यहूदीयांसारखा झालो. नियमशास्त्राधीन असणार्यांसाठी मीही नियमशास्त्राधीन झालो. वास्तविक मी नियमशास्त्राधीन नाही.
- 1 करिंथकरांस ९:२१सुमारे इ.स. ५९
ज्यांना नियमशास्त्र नाही, त्यांना जिंकून घेता यावे म्हणून मीही त्यांच्यासाठी नियमशास्त्र नसल्यासारखा झालो. परमेश्वराच्या नियमांपासून मी बंधमुक्त नाही परंतु ख्रिस्ताच्या नियमांनी बांधला गेलो आहे.
- 1 करिंथकरांस ९:२२सुमारे इ.स. ५९
जे अशक्त आहेत त्यांना जिंकण्यासाठी मी अशक्त झालो. मी सर्व लोकांसाठी सर्वकाही झालो आहे, यासाठी की मी कसेही करून काहींचे तारण साधावे
- 1 करिंथकरांस ९:२३सुमारे इ.स. ५९
मी हे सर्व शुभवार्तेसाठी करतो यासाठी की मिळणार्या आशीर्वादात मलाही वाटेकरी होता यावे.
- 1 करिंथकरांस ९:२४सुमारे इ.स. ५९
शर्यतीत प्रत्येकजण धावतो, परंतु फक्त एकाच व्यक्तीला बक्षीस मिळते हे तुम्हाला माहीत नाही का? अशा रीतीने धावा की ते बक्षीस तुम्हाला मिळेल.
- 1 करिंथकरांस ९:२५सुमारे इ.स. ५९
जो कोणी क्रीडास्पर्धेत भाग घेतो, त्या प्रत्येकाला कडक रीतीने प्रशिक्षण घ्यावे लागते. ते विनाशी मुकुट मिळविण्यासाठी करतात, परंतु आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी तसे करतो.
- 1 करिंथकरांस ९:२६सुमारे इ.स. ५९
म्हणून मी ध्येय नसलेल्या कोणा मनुष्यासारखा धावत नाही; मी केवळ मुष्टियुद्ध करीत नाही, म्हणजे हवेत मुष्टिप्रहार करत नाही.
- 1 करिंथकरांस ९:२७सुमारे इ.स. ५९
मी एखाद्या क्रीडापटूप्रमाणे माझ्या शरीरावर ताबा मिळवितो व परिश्रम करून त्याला दास करून ठेवतो, जेणेकरून इतरांना उपदेश केल्यानंतर मी स्वतःच बक्षिसास अपात्र ठरणार नाही.
- 1 करिंथकरांस १०:१सुमारे इ.स. ५९
बंधू व भगिनींनो, आपल्या पूर्वजांनी मेघाखाली कूच केली. ते सर्वजण समुद्रातूनही पार गेले, याबद्दल आपण अज्ञानी असू नये.
- 1 करिंथकरांस १०:२सुमारे इ.स. ५९
मेघात आणि समुद्रात त्यांचा व मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला.
- 1 करिंथकरांस १०:३सुमारे इ.स. ५९
त्या सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न खाल्ले. ते सर्वजण तेच आध्यात्मिक पाणी प्याले. त्यांच्याबरोबर चाललेल्या आत्मिक खडकातून ते पाणी प्याले आणि हा खडक तर ख्रिस्त होते.
- 1 करिंथकरांस १०:४सुमारे इ.स. ५९
And did all drink the same spiritual drink: for they drank of that spiritual Rock that followed them: and that Rock was Christ.
- 1 करिंथकरांस १०:५सुमारे इ.स. ५९
हे सर्व असूनही, परमेश्वर त्या बहुतेकांविषयी संतुष्ट नव्हते; त्यामुळे त्यांची शरीरे अरण्यात विखुरली गेली.
- 1 करिंथकरांस १०:६सुमारे इ.स. ५९
आता ज्यागोष्टी घडल्या, त्या आपल्याला उदाहरणादाखल आणि आपण त्यांच्याप्रकारे आपली हृदये वाईट गोष्टींवर केंद्रित करू नयेत म्हणून घडल्या.
- 1 करिंथकरांस १०:७सुमारे इ.स. ५९
त्यांच्यातील काही मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. असे लिहिले आहे: “लोकांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले.”
- 1 करिंथकरांस १०:८सुमारे इ.स. ५९
त्याचप्रमाणे त्यांच्यातील काही लोकांनी लैंगिक अनीतीला वाव दिला, तसे आपण करू नये आणि एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले.
- 1 करिंथकरांस १०:९सुमारे इ.स. ५९
आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये, जशी त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली आणि ते सर्पदंशाद्वारे मरण पावले.
- 1 करिंथकरांस १०:१०सुमारे इ.स. ५९
आणि कुरकुर करू नका, जशी त्यांच्यापैकी काहींनी केली आणि ते नाश करणार्या दूताच्या हातून मरण पावले.
- 1 करिंथकरांस १०:११सुमारे इ.स. ५९
आता या गोष्टी त्यांच्यासाठी उदाहरणादाखल झाल्या आणि ज्या आपणावर युगाचा शेवट येऊन ठेपला आहे, त्या आपल्याला इशारा म्हणून लिहून ठेवण्यात आल्या आहेत.
- 1 करिंथकरांस १०:१२सुमारे इ.स. ५९
म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्थिर उभे आहात, तर आपण पडू नये म्हणून खबरदारी घ्या.
- 1 करिंथकरांस १०:१३सुमारे इ.स. ५९
मनुष्यमात्रावर येणार्या सर्वसाधारण परीक्षेपेक्षा वेगळी परीक्षा तुम्हावर आलेली नाही आणि परमेश्वर विश्वासू आहेत; ते तुमच्या सहनशक्तीपलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाहीत. तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे म्हणून परीक्षा आली असताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सिद्ध करतील.