मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 करिंथकरांस ८:४सुमारे इ.स. ५९

    तर आता, मूर्तीना अर्पण केलेले अन्न यासंबंधी आपल्याला माहीत आहे, “या जगातील मूर्तीमध्ये परमेश्वराचे अस्तित्व नाही” आणि “एका परमेश्वराशिवाय दुसरा परमेश्वर नाही.”

  2. 1 करिंथकरांस ८:५सुमारे इ.स. ५९

    कारण स्वर्गात आणि पृथ्वीवरही जरी तथाकथित परमेश्वर आणि अनेक “देवता” आणि अनेक “प्रभू” आहेत,

  3. 1 करिंथकरांस ८:६सुमारे इ.स. ५९

    तरी आपल्याला एकच परमेश्वर, पिता ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि त्यांच्यासाठी आम्ही जगतो; आणि एकच प्रभू, येशू ख्रिस्त ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि ज्यांच्याद्वारे आपण जगतो.

  4. 1 करिंथकरांस ८:७सुमारे इ.स. ५९

    तरी हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही; कित्येक लोकांवर मूर्तीचा प्रभाव अजूनही असल्यामुळे जेव्हा ते मूर्तीला अर्पिलेले अन्न सेवन करतात, तेव्हा ते परमेश्वराला अर्पिलेले आहे असे समजून खातात, त्यांचा विवेक दुर्बल असल्यामुळे विटाळतो.

  5. 1 करिंथकरांस ८:८सुमारे इ.स. ५९

    परंतु अन्न आपल्याला परमेश्वराच्या जवळ नेत नाही; जर आपण खात नाही तर आपली हानी होत नाही आणि जर खातो तर काही अधिक चांगले होत नाही.

  6. 1 करिंथकरांस ८:९सुमारे इ.स. ५९

    तरी तुमच्या या अधिकाराचा उपयोग करीत असताना जे दुर्बल आहेत त्यांना अडखळण होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगा.

  7. 1 करिंथकरांस ८:१०सुमारे इ.स. ५९

    कारण एखाद्या दुबळ्या विवेकबुद्धीच्या मनुष्याने तुमच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला मूर्तीच्या मंदिरामध्ये अन्न खातांना पाहिले तर ते मूर्तीला वाहिलेले खाण्याचे त्याला धैर्य प्राप्त होणार नाही का?

  8. 1 करिंथकरांस ८:११सुमारे इ.स. ५९

    म्हणून आपले अशक्त बंधू व भगिनी ज्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावले, अशांचा तुमच्या ज्ञानामुळे नाश होऊ नये.

  9. 1 करिंथकरांस ८:१२सुमारे इ.स. ५९

    जेव्हा तुम्ही अशाप्रकारे त्यांच्याविरुद्ध पाप करता व त्यांच्या दुबळ्या विवेकबुद्धीला इजा पोहोचविल्याने तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.

  10. 1 करिंथकरांस ८:१३सुमारे इ.स. ५९

    यामुळे जे मी खातो त्यामुळे माझ्या बंधू व भगिनींना पापाचे कारण होत असेल, तर मी मांस कधीच खाणार नाही, म्हणजे मी त्यांच्या अधःपतनास कारणीभूत होणार नाही.

  11. 1 करिंथकरांस ९:१सुमारे इ.स. ५९

    मी स्वतंत्र नाही का? मी प्रेषित नाही का? मी आपल्या प्रभू येशूंना पाहिले नाही का? प्रभूमध्ये तुम्ही माझ्या श्रमाचे फळ नाही का?

  12. 1 करिंथकरांस ९:२सुमारे इ.स. ५९

    कदाचित मी दुसर्‍यांसाठी प्रेषित नसेल, पण तुमच्यासाठी नक्कीच आहे! कारण माझ्या प्रेषितपणाचा तुम्ही प्रभूमध्ये शिक्का आहात.

  13. 1 करिंथकरांस ९:३सुमारे इ.स. ५९

    माझा न्याय करणार्‍यांना हे माझे बचावाचे उत्तर आहे.

  14. 1 करिंथकरांस ९:४सुमारे इ.स. ५९

    आम्हाला खाण्याचा पिण्याचा अधिकार नाही काय?

  15. 1 करिंथकरांस ९:५सुमारे इ.स. ५९

    इतर प्रेषित, प्रभूचे बंधू आणि केफा यांच्याप्रमाणे विश्वासू पत्नी करून तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय?

  16. 1 करिंथकरांस ९:६सुमारे इ.स. ५९

    फक्त मला आणि बर्णबाला स्वतःच्या उपजीविकेसाठी काम न करण्याचा अधिकार नाही काय?

  17. 1 करिंथकरांस ९:७सुमारे इ.स. ५९

    स्वतःच्या खर्चाने कोणता सैनिक सेवा करतो? द्राक्षमळा लावतो, पण द्राक्ष खात नाही असा कोणी आहे का? मेंढराचा कळप पाळून दूध पिणार नाही असा कोणी आहे का?

  18. 1 करिंथकरांस ९:८सुमारे इ.स. ५९

    मी हे मानवी अधिकाराने म्हणतो काय? पण कायदाही तेच सांगतो की नाही?

  19. 1 करिंथकरांस ९:९सुमारे इ.स. ५९

    कारण मोशेने नियमशास्त्रात लिहिले आहे: “बैल धान्याची मळणी करीत असताना त्याच्या तोंडाला मुसके बांधू नको.” आता परमेश्वराला बैलाची काळजी आहे एवढाच त्याचा अर्थ आहे काय?

  20. 1 करिंथकरांस ९:१०सुमारे इ.स. ५९

    हे खात्रीने त्यांनी आपल्यासाठी म्हटले नाही का? होय, हे आमच्यासाठी लिहिण्यात आले आहे, कारण जो कोणी नांगरतो आणि मळणी करतो, त्यांनी हंगामाच्या पिकात वाटा मिळेल या आशेने करावी.

  21. 1 करिंथकरांस ९:११सुमारे इ.स. ५९

    जर आम्ही तुमच्यामध्ये आध्यात्मिक गोष्टीचे बीज पेरले आणि त्याबद्दल केवळ भौतिक गोष्टींच्या हंगामाची अपेक्षा केली, तर त्यात काय मोठे झाले?

  22. 1 करिंथकरांस ९:१२सुमारे इ.स. ५९

    जर इतरांना तुमच्याकडून या गोष्टी मिळण्याचा हक्क आहे, तर आम्हालाही तुमच्याकडून मिळण्याचा अधिक हक्क नाही काय? परंतु आम्ही त्या अधिकाराचा उपयोग केला नाही. याउलट, ख्रिस्ताच्या शुभवार्तेमध्ये अडखळण येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही गोष्टी सहन करण्यास तयार आहोत.

  23. 1 करिंथकरांस ९:१३सुमारे इ.स. ५९

    जे मंदिरात सेवा करणारे आहेत त्यांना मंदिरातून अन्न मिळते आणि वेदीवर सेवा करणारे, वेदीवर अर्पण केलेल्या अर्पणाचा वाटा घेतात हे तुम्हाला माहीत नाही काय?

  24. 1 करिंथकरांस ९:१४सुमारे इ.स. ५९

    याचप्रमाणे, प्रभूने आज्ञा दिली आहे की जे शुभवार्तेचा प्रचार करतात त्यांचे पोषण शुभवार्तेद्वारे झाले पाहिजे.

  25. 1 करिंथकरांस ९:१५सुमारे इ.स. ५९

    परंतु मी यापैकी एकाही अधिकाराचा उपयोग केला नाही किंवा हे तुम्ही माझ्यासाठी करावे या उद्देशानेही मी तुम्हाला लिहित नाही. माझा स्वाभिमान कोणी हिरावून घेण्यापेक्षा मी मरण पत्करेन.