मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 करिंथकरांस ६:१४सुमारे इ.स. ५९

    ज्याप्रमाणे प्रभूला परमेश्वराने आपल्या शक्तीने मरणातून उठविले, त्याप्रमाणेच तो आपल्यालाही उठवेल.

  2. 1 करिंथकरांस ६:१५सुमारे इ.स. ५९

    तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तेव्हा मी ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव घेऊन तो वेश्येशी एक करावा काय? कधीच नाही!

  3. 1 करिंथकरांस ६:१६सुमारे इ.स. ५९

    जर कोणी वेश्येबरोबर जोडला जातो, तेव्हा ती त्याच्या शरीराचा भाग होते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? कारण शास्त्रलेख सांगतो, “ती दोघे एकदेह होतील.”

  4. 1 करिंथकरांस ६:१७सुमारे इ.स. ५९

    परंतु जो कोणी प्रभूशी जडला आहे तो आत्म्याने त्यांच्याशी एक झाला आहे.

  5. 1 करिंथकरांस ६:१८सुमारे इ.स. ५९

    व्यभिचाराच्या पापापासून दूर पळा, कारण दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते शरीराबाहेर करतो, परंतु जो कोणी व्यभिचार करतो, तेव्हा तो स्वतःच्याच शरीराविरुद्ध पाप करतो.

  6. 1 करिंथकरांस ६:१९सुमारे इ.स. ५९

    तुमचे शरीर परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि ते तुमच्यामध्ये राहतात, हे तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही स्वतःचे नाही;

  7. 1 करिंथकरांस ६:२०सुमारे इ.स. ५९

    कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेतले आहे, म्हणून तुमच्या शरीराने परमेश्वराचे गौरव करा.

  8. 1 करिंथकरांस ७:१सुमारे इ.स. ५९

    आता ज्या गोष्टींविषयी तुम्ही मला लिहिले होते: “मनुष्याने स्त्रीशी लैंगिक संबंध न ठेवलेले बरे.”

  9. 1 करिंथकरांस ७:२सुमारे इ.स. ५९

    तरी जारकर्म वाढले आहे म्हणून प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीशी संबंध ठेवावे आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पतीशी.

  10. 1 करिंथकरांस ७:३सुमारे इ.स. ५९

    विवाहित स्त्री म्हणून असलेले सर्व हक्क पुरुषाने आपल्या पत्नीला द्यावेत, आणि पत्नीनेही आपल्या पतीसाठी तसेच करावे.

  11. 1 करिंथकरांस ७:४सुमारे इ.स. ५९

    पत्नीच्या शरीरावर तिचा स्वतःचा अधिकार नाही तर, पतीचा असतो. त्याचप्रमाणे पतीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो तर तो त्याच्या पत्नीला असतो.

  12. 1 करिंथकरांस ७:५सुमारे इ.स. ५९

    एकमेकांची वंचना करू नका, पण प्रार्थनेला वेळ मिळावा म्हणून एकमेकांच्या संमतीने काही काळ अलिप्त राहा. पण तुम्ही पुन्हा एकत्र यावे म्हणजे आत्मसंयमनाच्या अभावी सैतान तुम्हाला मोहात पाडणार नाही.

  13. 1 करिंथकरांस ७:६सुमारे इ.स. ५९

    मी हे आज्ञारूपाने म्हणत नाही परंतु अनुमती म्हणून सांगतो.

  14. 1 करिंथकरांस ७:७सुमारे इ.स. ५९

    माझी इच्छा अशी आहे की, जसा मी आहे तसे तुम्ही सर्वांनी असावे. परंतु प्रत्येकाला परमेश्वराकडून देणगी मिळालेली आहे; एकास एक देणगी तर दुसर्‍यास दुसरी देणगी.

  15. 1 करिंथकरांस ७:८सुमारे इ.स. ५९

    म्हणून जे अविवाहित आहेत आणि ज्या विधवा आहेत, त्यांना मी सांगतो तुम्हीही जसा मी आहे तसे राहावे.

  16. 1 करिंथकरांस ७:९सुमारे इ.स. ५९

    पण तुम्हाला संयम राखता येत नसेल, तर विवाह केलेला बरा. वासनेने जळण्यापेक्षा विवाह करणे उत्तम.

  17. 1 करिंथकरांस ७:१०सुमारे इ.स. ५९

    आता जे विवाहित आहेत, त्यांच्यासाठी मी एक आज्ञा देतो (मी नाही, पण प्रभू देतात) पत्नीने पतीपासून विभक्त होऊ नये.

  18. 1 करिंथकरांस ७:११सुमारे इ.स. ५९

    पण पत्नी विभक्त झाली असेल, तर तिने दुसरा विवाह करू नये किंवा आपल्या पतीशी समेट करावा. पतीनेही आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ नये.

  19. 1 करिंथकरांस ७:१२सुमारे इ.स. ५९

    इतरांना मी हे सांगतो (प्रभू नव्हे, पण मी): एखाद्या भावाची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल आणि ती त्याच्या जवळच राहण्यास तयार असेल, तर त्याने तिला घटस्फोट देऊ नये.

  20. 1 करिंथकरांस ७:१३सुमारे इ.स. ५९

    त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीचा पती अविश्वासी असेल आणि तिच्याबरोबर राहण्यास तयार असेल, तर तिनेही त्याला घटस्फोट देऊ नये.

  21. 1 करिंथकरांस ७:१४सुमारे इ.स. ५९

    कारण अविश्वासी पती, विश्वासणाऱ्या पत्नीद्वारे पवित्र होऊ शकेल आणि अविश्वासी पत्नी, विश्वासणाऱ्या पतीद्वारे पवित्र होऊ शकेल. नाही तर तुमची लेकरे अशुद्ध असती, परंतु ती आता पवित्र आहेत.

  22. 1 करिंथकरांस ७:१५सुमारे इ.स. ५९

    परंतु जर अविश्वासी व्यक्ती वेगळी होऊ इच्छित असेल तर तसे होऊ द्या. अशा परिस्थितीत भाऊ किंवा बहीण बांधलेले नाही; कारण परमेश्वराने आपल्याला पाचारण केले आहे ते यासाठी की आपण शांतीने राहावे.

  23. 1 करिंथकरांस ७:१६सुमारे इ.स. ५९

    अहो पत्नींनो, तुमच्या पतींचे तारण तुमच्याद्वारे होईल किंवा नाही हे कसे समजावे? किंवा पतींनो तुमच्या पत्नीचे तारण तुमच्याद्वारे होईल किंवा नाही हे कसे समजावे?

  24. 1 करिंथकरांस ७:१७सुमारे इ.स. ५९

    प्रत्येकाने विश्वासू व्यक्तीसारखे प्रभूने तुम्हाला ज्या स्थितीत ठेवले आहे व परमेश्वराने जसे पाचारण केले आहे तसे राहावे. सर्व मंडळ्यांसाठी माझा हाच नियम आहे.

  25. 1 करिंथकरांस ७:१८सुमारे इ.स. ५९

    सुंता झालेल्या एखाद्या व्यक्तीस पाचारण झाले आहे काय? तर तुम्ही असुंती होऊ नये. तसेच सुंता न होण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीस पाचारण झाले आहे का? तर त्याने सुंता करून घेऊ नये.