- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 1 करिंथकरांस ३:२१सुमारे इ.स. ५९
तेव्हा मानवी नेत्यांची बढाई मारू नका! कारण सर्वकाही तुमचे आहे.
- 1 करिंथकरांस ३:२२सुमारे इ.स. ५९
मग तो पौल, अपुल्लोस किंवा केफा किंवा जग, जीवन आणि मरण किंवा सांप्रत काळ किंवा भविष्यकाळ हे सर्व तुमचे आहेत.
- 1 करिंथकरांस ३:२३सुमारे इ.स. ५९
पण तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त परमेश्वराचे आहेत.
- 1 करिंथकरांस ४:१सुमारे इ.स. ५९
ख्रिस्ताचे सेवक आणि परमेश्वराने जे गुप्त रहस्य प्रकट केले आहे त्याचे कारभारी असे आम्हाला समजावे.
- 1 करिंथकरांस ४:२सुमारे इ.स. ५९
आता ज्यांना कारभार सोपवून दिला आहे, त्यांनी स्वतःला विश्वासू असे प्रमाणित करावे.
- 1 करिंथकरांस ४:३सुमारे इ.स. ५९
तुम्ही माझा न्याय केला किंवा कोणत्याही मानवी न्यायालयाने केला; तर मी त्याची जास्त काळजी करत नाही, निश्चित, मी स्वतःचाही न्याय करीत नाही.
- 1 करिंथकरांस ४:४सुमारे इ.स. ५९
कारण माझा विवेक शुद्ध असला, तरी मी निर्दोष ठरत नाही. प्रभू माझा न्याय करेल.
- 1 करिंथकरांस ४:५सुमारे इ.स. ५९
यास्तव निवडलेल्या समयापूर्वी व प्रभूच्या आगमनापूर्वी कशाचाही न्याय करू नका. त्यावेळी ते अंधकारात लपलेले सत्य प्रकाशात आणतील व आपल्या अंतःकरणातील उद्देश उघड करेल आणि मग त्यावेळी प्रत्येकाला परमेश्वराकडून प्रशंसा मिळेल.
- 1 करिंथकरांस ४:६सुमारे इ.स. ५९
आता, बंधूंनो व भगिनींनो, या गोष्टी मी तुमच्या हिताकरिता स्वतःला व अपुल्लोसला लागू केल्या आहेत यासाठी की, “जे लिहिलेले वचन आहे त्यापलीकडे जाऊ नका.” या म्हणीचा अर्थ तुम्ही आम्हाकडून शिकावा. आमच्यापैकी एकाचा अनुयायी म्हणून फुगून जाऊन दुसर्याला कमी लेखू नये.
- 1 करिंथकरांस ४:७सुमारे इ.स. ५९
तुम्हाला इतरांपासून वेगळे कोणी केले? तुमच्याजवळ असे काय आहे की जे तुम्हाला मिळालेले नाही? ज्याअर्थी तुम्हाला सर्व मिळाले आहे, तर तुम्हाला मिळाले नाही अशी बढाई का मारता?
- 1 करिंथकरांस ४:८सुमारे इ.स. ५९
इतक्यातच तुम्हाला जे हवे ते मिळाले आहे, इतक्यात धनवान झाला आहात, आम्हाला सोडून राज्य करीत आहात; तुम्ही राजे बनला असताच तर ठीक झाले असते, कारण आम्हीही तुम्हाबरोबर राजे झालो असतो.
- 1 करिंथकरांस ४:९सुमारे इ.स. ५९
मला असे वाटते की परमेश्वराने आम्हा प्रेषितांना विजय यात्रेमध्ये, सर्वात शेवटच्या ठिकाणी मृत्युदंड नेमलेल्यांसारखे ठेवले आहे. आम्ही सर्व सृष्टी, मानव आणि देवदूतांपुढे एक मौज म्हणून झालो आहे.
- 1 करिंथकरांस ४:१०सुमारे इ.स. ५९
आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख आहोत, ख्रिस्तामध्ये तुम्ही सर्व सुज्ञ आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही सशक्त आहात! आम्ही अप्रतिष्ठित आहोत, तुम्ही तर प्रतिष्ठित आहात!
- 1 करिंथकरांस ४:११सुमारे इ.स. ५९
या घटकेपर्यंत आम्ही भुकेले व तहानलेले, घाणेरडी वस्त्रे घातलेले व अतिशय कठोर वागणूक मिळालेले व बेघर असे आहोत.
- 1 करिंथकरांस ४:१२सुमारे इ.स. ५९
आम्ही आमच्या हाताने काबाडकष्ट करतो, जेव्हा आम्हाला शाप देतात, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो; आमचा छळ केला जातो, तेव्हा आम्ही सहन करतो;
- 1 करिंथकरांस ४:१३सुमारे इ.स. ५९
आमची निंदा होत असता, आम्ही ममतेने उत्तर देतो. तरीही या क्षणापर्यंत आम्ही जगाचा गाळ व केरकचरा असे झालो आहोत.
- 1 करिंथकरांस ४:१४सुमारे इ.स. ५९
तुम्हाला लाजवावे म्हणून नव्हे तर तुम्हाला सावध करावे या उद्देशाने मी तुम्हाला या गोष्टी, माझी प्रिय मुले या नात्याने लिहित आहे.
- 1 करिंथकरांस ४:१५सुमारे इ.स. ५९
ख्रिस्तामध्ये तुम्हाला हजारो शिक्षक असले, पण पुष्कळ वडील नाहीत. कारण ख्रिस्त येशूंमध्ये शुभवार्तेद्वारे मी तुमचा पिता झालो आहे.
- 1 करिंथकरांस ४:१६सुमारे इ.स. ५९
म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.
- 1 करिंथकरांस ४:१७सुमारे इ.स. ५९
या कारणाकरिता मी तीमथ्याला तुम्हाकडे पाठवित आहे. तो प्रभूमध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. तो प्रत्येक ठिकाणी मंडळ्यांमध्ये जाऊन मी जे शिक्षण देत असे, त्याप्रमाणे ख्रिस्त येशूंमध्ये माझ्या शिकवणीची तुम्हाला आठवण करून देईल.
- 1 करिंथकरांस ४:१८सुमारे इ.स. ५९
मी तुमच्याकडे येणार नाही असे समजून तुमच्यातील काहीजण अहंकारी झाले आहेत.
- 1 करिंथकरांस ४:१९सुमारे इ.स. ५९
परंतु प्रभूची इच्छा असली तर मी तुम्हाकडे लवकरच येईन आणि त्यावेळी गर्विष्ठांच्या बोलण्याकडेच नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे देखील पाहीन.
- 1 करिंथकरांस ४:२०सुमारे इ.स. ५९
परमेश्वराचे राज्य बोलण्यात नव्हे परंतु सामर्थ्यात आहे.
- 1 करिंथकरांस ४:२१सुमारे इ.स. ५९
तुम्हाला काय आवडेल, मी तुम्हाकडे शिस्तीची काठी घेऊन, की प्रेम भावाने आणि सौम्य आत्म्याने यावे?
- 1 करिंथकरांस ५:१सुमारे इ.स. ५९
मला असा अहवाल मिळाला आहे की तुमच्यामध्ये लैंगिक अनैतिकता आहे, की जी गैरयहूदीही खपवून घेणार नाहीत; कोणाएका मनुष्याने आपल्या वडिलांच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले आहेत.