- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 1 करिंथकरांस १:१८सुमारे इ.स. ५९
क्रूसाचा संदेश नाश पावत असलेल्यांना मूर्खपणाचा वाटतो, तरी तारणाची प्राप्ती होत आहे अशा आपल्यासाठी तो परमेश्वराचे सामर्थ्य असा आहे.
- 1 करिंथकरांस १:१९सुमारे इ.स. ५९
कारण असे लिहिले आहे: “ज्ञानी लोकांचे ज्ञान मी नष्ट करेन. बुद्धिमानाची बुद्धी मी निष्फळ करेन.”
- 1 करिंथकरांस १:२०सुमारे इ.स. ५९
मग ज्ञानी लोक कुठे आहेत? नियमशास्त्र शिक्षक कुठे आहेत? या युगाचे तत्वज्ञानी कुठे आहेत? जे मूर्ख आहेत त्यांना परमेश्वराने जगाचे ज्ञान असे केले नाही का?
- 1 करिंथकरांस १:२१सुमारे इ.स. ५९
कारण परमेश्वराच्या ज्ञानामध्ये असतानाही जगाला त्याच्या ज्ञानाद्वारे परमेश्वराला ओळखता आले नाही, जो प्रचार मुर्खपणाद्वारे केला होता त्यावर विश्वास ठेवणार्या सर्वांचे परमेश्वराने आनंदाने तारण केले.
- 1 करिंथकरांस १:२२सुमारे इ.स. ५९
यहूदी लोक चिन्हाची मागणी करतात; आणि ग्रीक लोक ज्ञान शोधतात.
- 1 करिंथकरांस १:२३सुमारे इ.स. ५९
पण आम्ही क्रूसावर खिळलेल्या ख्रिस्ताला गाजवितो: जो यहूदीयांना अडखळण आणि गैरयहूदीयांना मूर्खपणा असा आहे,
- 1 करिंथकरांस १:२४सुमारे इ.स. ५९
परंतु परमेश्वराने ज्यांना बोलाविले आहे, त्या यहूदी आणि ग्रीक, या दोघांनाही ख्रिस्त हे परमेश्वराचे सामर्थ्य आणि ज्ञान आहे.
- 1 करिंथकरांस १:२५सुमारे इ.स. ५९
परमेश्वराची मूर्खता मानवी शहाणपणापेक्षा अधिक सुज्ञपणाची आहे, आणि परमेश्वराचा अशक्तपणा मनुष्याच्या सामर्थ्यापेक्षा बलवान आहे.
- 1 करिंथकरांस १:२६सुमारे इ.स. ५९
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ज्यावेळी तुम्हाला पाचारण करण्यात आले त्यावेळी तुम्ही कोण होता याचा विचार करा. तुम्ही अनेकजण तर मनुष्यांच्या दृष्टीने शहाणे; किंवा प्रभावी किंवा कुलीन कुळात जन्मलेले नव्हता.
- 1 करिंथकरांस १:२७सुमारे इ.स. ५९
तरी जगाच्या दृष्टीने जे सुज्ञ आहेत अशांना लाजविण्याकरिता परमेश्वराने मूर्खपणाच्या गोष्टी निवडल्या; आणि सशक्तांना लाजविण्याकरिता त्यांनी जगातील दुर्बल गोष्टी निवडल्या.
- 1 करिंथकरांस १:२८सुमारे इ.स. ५९
परमेश्वराने जगातील धिक्कारलेले, अकुलीन यांना निवडले, जेणे करून त्यांना शून्यवत करावे.
- 1 करिंथकरांस १:२९सुमारे इ.स. ५९
आणि म्हणूनच परमेश्वरासमोर कोणत्याही मनुष्याने बढाई मारू नये.
- 1 करिंथकरांस १:३०सुमारे इ.स. ५९
कारण त्यामुळेच तुम्ही ख्रिस्त येशूंमध्ये आहात, ते परमेश्वरापासून आपले ज्ञान व नीतिमत्व, पवित्रता आणि खंडणी असे झाले आहेत.
- 1 करिंथकरांस १:३१सुमारे इ.स. ५९
यास्तव शास्त्रलेखात लिहिले आहे: “जो प्रौढी मिरवतो त्याने प्रभूमध्ये प्रौढी मिरवावी.”
- 1 करिंथकरांस २:१सुमारे इ.स. ५९
बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्याबाबतीत तसेच झाले, जेव्हा मी तुम्हाकडे आलो, तेव्हा परमेश्वराची साक्ष तुम्हाला सांगण्यासाठी मानवी ज्ञान आणि वक्तृत्व घेऊन आलो नाही.
- 1 करिंथकरांस २:२सुमारे इ.स. ५९
कारण मी असा निश्चय केला होता की तुम्हामध्ये असताना फक्त क्रूसावर खिळलेला येशू ख्रिस्त याव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी जाणून घेऊ नये.
- 1 करिंथकरांस २:३सुमारे इ.स. ५९
मी तुमच्याकडे अशक्त, अतिशय भीतभीत व कापत आलो.
- 1 करिंथकरांस २:४सुमारे इ.स. ५९
माझे संदेश व उपदेश ज्ञान किंवा शहाणपणाच्या शब्दाचे नव्हते, तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रमाण देणारे होते.
- 1 करिंथकरांस २:५सुमारे इ.स. ५९
यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानांवर आधारलेला असू नये, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर असावा.
- 1 करिंथकरांस २:६सुमारे इ.स. ५९
तरी देखील, आम्ही परिपक्व झालेल्यांना ज्ञानाचा संदेश सांगतो, परंतु हे ज्ञान या युगाचे नव्हे किंवा या युगाचे शासक, ज्यांचे अधःपतन होणार आहे त्यांचेही नव्हे.
- 1 करिंथकरांस २:७सुमारे इ.स. ५९
आम्ही परमेश्वराचे ज्ञान आणि रहस्य जे गुप्त होते, ते जाहीर करतो आणि ते रहस्य परमेश्वराने युगानुयुगा पूर्वी आपल्या गौरवासाठी सिद्ध केले आहे.
- 1 करिंथकरांस २:८सुमारे इ.स. ५९
तरी या युगाच्या अधिकार्यांना ही योजना समजलीच नाही, त्यांना ती समजली असती, तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला क्रूसावर कधीच खिळले नसते.
- 1 करिंथकरांस २:९सुमारे इ.स. ५९
तरी शास्त्रलेखानुसार: “जे डोळ्यांनी पाहिले नाही, जे कोणत्याही कानावर पडले नाही, माणसाच्या मनात आले नाही,”— त्या सर्वगोष्टी परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांसाठी त्यांनी सिद्ध केल्या आहेत—
- 1 करिंथकरांस २:१०सुमारे इ.स. ५९
परमेश्वराने आपल्याला त्यांच्या आत्म्याद्वारे या गोष्टी प्रकट केल्या आहेत. कारण परमेश्वराचा आत्मा हा सर्व गोष्टींचा, परमेश्वराच्या अत्यंत गहन गोष्टींचा देखील शोध घेतो.
- 1 करिंथकरांस २:११सुमारे इ.स. ५९
एखाद्या व्यक्तीचे विचार त्या व्यक्तीच्या आत्म्याशिवाय इतर कोणाला समजतात का? त्याचप्रमाणे परमेश्वराचे विचार परमेश्वराच्या आत्म्याशिवाय कोणालाही माहीत नाहीत.