- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- रोमकरांस १५:२८सुमारे इ.स. ६०
ही वर्गणी पोहोचवून त्यांचे हे काम पार पाडल्यानंतर आणि दान त्यांना मिळाल्याची खात्री झाल्यानंतर मी स्पेनकडे जाताना तुम्हाला येऊन भेटेन;
- रोमकरांस १५:२९सुमारे इ.स. ६०
आणि जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या भरपूर आशीर्वादाने भरलेला असा येईन हे मला माहीत आहे.
- रोमकरांस १५:३०सुमारे इ.स. ६०
बंधूंनो व भगिनींनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि आत्म्याच्या प्रीतीद्वारे, मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्या संघर्षात सहभाग म्हणून परमेश्वराजवळ माझ्यासाठी प्रार्थना करावी.
- रोमकरांस १५:३१सुमारे इ.स. ६०
यहूदीयामधील जे विश्वासणारे नाहीत त्यांच्यापासून माझे रक्षण व्हावे आणि मी नेत असलेली वर्गणी यरुशलेम येथील प्रभूच्या लोकांनी स्वीकारावी म्हणून प्रार्थना करा.
- रोमकरांस १५:३२सुमारे इ.स. ६०
मी परमेश्वराच्या इच्छेने आनंदाने तुम्हाकडे येऊ शकेन आणि तुमच्या सहवासात ताजातवाना होऊ शकेन.
- रोमकरांस १५:३३सुमारे इ.स. ६०
आता शांतीचे परमेश्वर तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
- रोमकरांस १६:१सुमारे इ.स. ६०
किंख्रिया मंडळीतील आपली बहीण फीबी जी सेविका आहे, तिची शिफारस करतो.
- रोमकरांस १६:२सुमारे इ.स. ६०
मी तुम्हाला सांगतो की प्रभूच्या लोकांना शोभेल असे तिला प्रभूमध्ये स्वीकारा आणि जी काही मदत तिला तुमच्यापासून पाहिजे ती द्या, कारण तिने अनेक लोकांचे व माझेही साहाय्य केले आहे.
- रोमकरांस १६:३सुमारे इ.स. ६०
प्रिस्किल्ला व अक्विला ख्रिस्त येशूंमधील माझे सहकारी, यांना सदिच्छा कळवा.
- रोमकरांस १६:४सुमारे इ.स. ६०
त्यांनी माझ्याकरिता त्यांचा जीवही धोक्यात घातला; आणि केवळ मीच नाही, तर गैरयहूदीयांच्या सर्व मंडळ्याही त्यांचे ऋणी आहेत.
- रोमकरांस १६:५सुमारे इ.स. ६०
त्यांच्या घरात जमणार्या मंडळीला माझ्या सदिच्छा कळवा. माझा प्रिय मित्र अपैनत यालाही सदिच्छा, आशियामध्ये त्यानेच प्रथम ख्रिस्ताचा स्वीकार केला.
- रोमकरांस १६:६सुमारे इ.स. ६०
जिने तुम्हासाठी खूप परिश्रम केले त्या मरीयेलाही सदिच्छा सांगा.
- रोमकरांस १६:७सुमारे इ.स. ६०
माझे यहूदी बंधू अंद्रोनीक व युनिया, जे माझ्याबरोबर तुरुंगात होते त्यांना पण सदिच्छा द्या. प्रेषितांमध्ये त्यांचे स्थान अवर्णनीय आहे व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तात होते.
- रोमकरांस १६:८सुमारे इ.स. ६०
प्रभूमध्ये प्रिय मित्र आंप्लियात याला माझ्या सदिच्छा कळवा.
- रोमकरांस १६:९सुमारे इ.स. ६०
तसेच ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय मित्र स्ताखु यांना सदिच्छा कळवा.
- रोमकरांस १६:१०सुमारे इ.स. ६०
अपिल्लेस जो ख्रिस्ताशी एकनिष्ठ असून परीक्षेस उतरलेला आहे त्याला सदिच्छा कळवा. तसेच अरिस्थबूलच्या घरातील सर्वांना माझ्या सदिच्छा कळवा.
- रोमकरांस १६:११सुमारे इ.स. ६०
माझा नातेवाईक हेरोदियोन याला सदिच्छा द्या. नार्सिसाच्या घरातील जे प्रभूमध्ये आहेत त्यांना सदिच्छा कळवा.
- रोमकरांस १६:१२सुमारे इ.स. ६०
त्रेफैना आणि त्रेफोसा, या स्त्रियांनी प्रभूमध्ये खूप श्रम केले, त्यांना सदिच्छा कळवा. प्रिय मैत्रीण पर्सिस, हिला सदिच्छा कळवा. तिने प्रभूमध्ये अतिशय कष्ट घेतले.
- रोमकरांस १६:१३सुमारे इ.स. ६०
प्रभूने निवडून घेतलेला रूफस आणि त्याची आई, जी माझीही आई आहे, त्यांना सदिच्छा कळवा.
- रोमकरांस १६:१४सुमारे इ.स. ६०
असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रोबास, हेर्मेस यांना व त्यांच्याबरोबर असणार्या सर्व बंधू व भगिनींना सदिच्छा कळवा.
- रोमकरांस १६:१५सुमारे इ.स. ६०
फिललग, युलिया, नीरिय व त्याची बहीण, ओलुंपास, व त्यांच्या बरोबरच्या सर्व पवित्र जणांना सदिच्छा कळवा.
- रोमकरांस १६:१६सुमारे इ.स. ६०
एकमेकांना पवित्र चुंबनाने अभिवादन करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सदिच्छा कळवितात.
- रोमकरांस १६:१७सुमारे इ.स. ६०
आता बंधूंनो व भगिनींनो, मी तुम्हाला आग्रहाने विनंती करतो की, जे शिक्षण तुम्हाला मिळाले आहे त्याविरुद्ध जे फूटी व अडथळे आणणारे आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा; आणि त्यांच्यापासून दूर राहा.
- रोमकरांस १६:१८सुमारे इ.स. ६०
कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाही, तर स्वतःच्या पोटाची करतात. आपल्या गोड व लाघवी भाषणाने, ते भोळ्यांच्या अंतःकरणास भुरळ पाडतात.
- रोमकरांस १६:१९सुमारे इ.स. ६०
तुमच्या आज्ञापालनाबद्दल प्रत्येकाने ऐकले आहे, म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो; तरी तुम्ही जे उत्तम त्यासंबंधाने सुज्ञ आणि जे वाईट त्याविषयी अज्ञानी असावे, अशी माझी इच्छा आहे.