मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. रोमकरांस १६:२०सुमारे इ.स. ६०

    शांतीचा परमेश्वर लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली चिरडून टाकील. आपल्या प्रभू येशूंची कृपा तुम्हावर असो.

  2. रोमकरांस १६:२१सुमारे इ.स. ६०

    माझा सहकारी तीमथ्य, तसेच माझे नातेवाईक लूक्य, यासोन आणि सोसिपतेर, हे तुम्हाला आपल्या सदिच्छा कळवीत आहेत.

  3. रोमकरांस १६:२२सुमारे इ.स. ६०

    हे पत्र लिहिणारा, मी तर्तिय, प्रभूमध्ये तुम्हाला सदिच्छा देत आहे.

  4. रोमकरांस १६:२३सुमारे इ.स. ६०

    गायस, जो माझे आणि इथे त्याच्या घरी जमणाऱ्या मंडळीचे आदरातिथ्य करतो, तो तुम्हाला त्याच्या सदिच्छा कळवितो. या शहराचा खजिनदार एरास्त, तसेच आपला विश्वासू बंधू क्किर्त यांच्याही तुम्हाला सदिच्छा.

  5. रोमकरांस १६:२४सुमारे इ.स. ६०

    आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा तुम्हा सर्वांवर असो. आमेन.

  6. रोमकरांस १६:२५सुमारे इ.स. ६०

    माझ्या शुभवार्तेनुसार तो आता तुम्हाला स्थिर करेल व ज्या येशू ख्रिस्ताचा संदेश मी घोषित केला त्यानुसार जे रहस्य अनंत काळापूर्वी गुपित होते ते आता प्रकट झाले आहे.

  7. रोमकरांस १६:२६सुमारे इ.स. ६०

    पण आता संदेष्ट्यांनी लिहिलेल्या शास्त्राद्वारे प्रकट आणि जाहीर झालेली सार्वकालिक परमेश्वराची आज्ञा यांना अनुसरून सर्व गैरयहूदी लोकांनी विश्वासाने आज्ञापालन करावे.

  8. रोमकरांस १६:२७सुमारे इ.स. ६०

    आता केवळ एकच ज्ञानी परमेश्वर, त्यांना येशू ख्रिस्त यांच्याद्वारे सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.

  9. 1 करिंथकरांस १:१सुमारे इ.स. ५९

    परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूंचा प्रेषित होण्यासाठी बोलविलेला पौल आणि बंधू सोस्थनेस यांच्याकडून,

  10. 1 करिंथकरांस १:२सुमारे इ.स. ५९

    करिंथ येथील परमेश्वराच्या मंडळीस, जे ख्रिस्त येशूंमध्ये पवित्र केलेले व पवित्र होण्यासाठी बोलाविलेले, तसेच ख्रिस्त येशू आपले व त्यांचे प्रभू यांचे नाव घेऊन प्रत्येक ठिकाणी धावा करतात त्या सर्वांस:

  11. 1 करिंथकरांस १:३सुमारे इ.स. ५९

    परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.

  12. 1 करिंथकरांस १:४सुमारे इ.स. ५९

    ख्रिस्त येशूंमध्ये जी कृपा तुम्हाला दिली, त्याबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.

  13. 1 करिंथकरांस १:५सुमारे इ.स. ५९

    त्यांच्यामध्ये तुम्ही सर्वप्रकारे संपन्न झाला आहात—सर्वप्रकारच्या भाषणात व सर्व ज्ञानात समृद्ध झाला आहात.

  14. 1 करिंथकरांस १:६सुमारे इ.स. ५९

    ख्रिस्ताविषयीची जी आमची साक्ष आहे त्याची परमेश्वर तुमच्यामध्ये पुष्टी करीत आहे.

  15. 1 करिंथकरांस १:७सुमारे इ.स. ५९

    यास्तव तुम्ही आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या प्रकट होण्याची आतुरतेने वाट पाहत असताना आध्यात्मिक दानाची तुम्हाला काहीच उणीव पडलेली नाही.

  16. 1 करिंथकरांस १:८सुमारे इ.स. ५९

    प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष असे असावे म्हणून तेच तुम्हाला शेवटपर्यंत स्थिर करतील.

  17. 1 करिंथकरांस १:९सुमारे इ.स. ५९

    परमेश्वर ज्यांनी त्यांचा पुत्र आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या सहभागितेत तुम्हाला बोलाविले ते विश्वसनीय आहेत.

  18. 1 करिंथकरांस १:१०सुमारे इ.स. ५९

    माझ्या प्रिय बंधूंनो व भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावास्तव मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही जे काही बोलता त्यामध्ये एकमत असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये, मनाने आणि विचाराने तुम्ही सर्व एकतेमध्ये परिपूर्ण असावे.

  19. 1 करिंथकरांस १:११सुमारे इ.स. ५९

    कारण बंधूंनो व भगिनींनो, तुम्हामध्ये भांडणे आहेत, असे मला ख्लोवेच्या घरातील काही लोकांनी सांगितले आहे.

  20. 1 करिंथकरांस १:१२सुमारे इ.स. ५९

    माझ्या म्हणण्याचा अर्थ हा: तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे,” तर कोणी “मी अपुल्लोसाचा” आणखी कोणी “मी केफाचा अनुयायी आहे,” आणखी कोणी “मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे.”

  21. 1 करिंथकरांस १:१३सुमारे इ.स. ५९

    ख्रिस्त विभागले गेले आहेत का? तुमच्यासाठी पौलाला क्रूसावर दिले होते का? तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावात झाला होता का?

  22. 1 करिंथकरांस १:१४सुमारे इ.स. ५९

    तुमच्यातील क्रिस्प आणि गायस यांच्याशिवाय मी इतर कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो.

  23. 1 करिंथकरांस १:१५सुमारे इ.स. ५९

    त्यामुळे तुम्हापैकी कोणालाही, तुमचा बाप्तिस्मा माझ्या नावात झाला असे म्हणता येणार नाही.

  24. 1 करिंथकरांस १:१६सुमारे इ.स. ५९

    होय! मी स्तेफनाच्या कुटुंबीयांचाही बाप्तिस्मा केला, पण त्यांच्याशिवाय दुसर्‍या कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही.

  25. 1 करिंथकरांस १:१७सुमारे इ.स. ५९

    कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्याकरिता नव्हे, तर शुभवार्तेचा प्रचार करण्याकरिता पाठविले आहे—वाक्पटुतेने व ज्ञानाने नव्हे, यामुळे असे न होवो की ख्रिस्ताच्या क्रूसाचे सामर्थ्य रिक्त व्हावे.