- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 1 करिंथकरांस २:१२सुमारे इ.स. ५९
आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, परंतु जो आत्मा परमेश्वरापासून आहे तो मिळाला आहे, यासाठी की परमेश्वराने आपल्याला जे विनामूल्य दिले आहे, ते आपण समजून घ्यावे.
- 1 करिंथकरांस २:१३सुमारे इ.स. ५९
आम्ही असे बोलतो हे मानवी ज्ञानाने शिकविलेले शब्द नव्हे, तर आत्म्याने शिकविलेले शब्द म्हणजे आत्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याकरिता आम्ही आत्म्याने शिकविलेले शब्द वापरतो.
- 1 करिंथकरांस २:१४सुमारे इ.स. ५९
परंतु जो मनुष्य आत्मिक नाही, तो परमेश्वराच्या आत्म्यापासून आलेल्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात, त्याला त्या समजणार नाहीत, कारण त्या गोष्टी परमेश्वराच्या आत्म्यानेच पारखल्या जाऊ शकतात.
- 1 करिंथकरांस २:१५सुमारे इ.स. ५९
आत्मिक असलेल्या मनुष्याला प्रत्येक गोष्ट पारखता येते, परंतु तो स्वतः मात्र कोणत्याही मानवी न्यायाखाली नसतो.
- 1 करिंथकरांस २:१६सुमारे इ.स. ५९
कारण, “प्रभूचे मन कोण जाणू शकेल? त्यांचा सल्लागार कोण आहे?” आपल्याकडे तर ख्रिस्ताचे मन आहे.
- 1 करिंथकरांस ३:१सुमारे इ.स. ५९
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आत्म्याद्वारे जीवन जगत असलेल्या लोकांबरोबर बोलावे तसे मी तुमच्याबरोबर बोलू शकलो नाही, कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये लहान बालक असून अजूनही दैहिक आहात.
- 1 करिंथकरांस ३:२सुमारे इ.स. ५९
मी तुम्हाला दूध दिले, जड अन्न दिले नाही, कारण तुम्ही त्यासाठी तयार नव्हता आणि निश्चित त्यासाठी तुम्ही अजूनही तयार नाही.
- 1 करिंथकरांस ३:३सुमारे इ.स. ५९
तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुम्हामध्ये भांडणे आणि मत्सर आहेत, तुम्ही दैहिक आहात की नाही? तुम्ही केवळ सामान्य मानवासारखे वागता की नाही?
- 1 करिंथकरांस ३:४सुमारे इ.स. ५९
तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे” आणि दुसरा “मी अपुल्लोसाचा अनुयायी आहे,” यावरून तुम्ही सामान्य मनुष्य आहात नाही काय?
- 1 करिंथकरांस ३:५सुमारे इ.स. ५९
तर मग काय, अपुल्लोस तरी कोण आहे? मी पौल कोण आहे? आम्ही तर केवळ परमेश्वराचे सेवक, त्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला—प्रभूने प्रत्येकाला कामगिरी सोपवून दिली होती.
- 1 करिंथकरांस ३:६सुमारे इ.स. ५९
मी बी पेरले, अपुल्लोसाने पाणी घातले, परंतु परमेश्वराने वाढविले.
- 1 करिंथकरांस ३:७सुमारे इ.स. ५९
पेरणारा किंवा पाणी घालणारा कोणी काही नाही, तर फक्त परमेश्वरच जे त्याची वाढ करतात.
- 1 करिंथकरांस ३:८सुमारे इ.स. ५९
जो पेरतो व जो पाणी घालतो त्यांचा हेतू एकच आहे आणि त्या दोघांनाही त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ मिळेल.
- 1 करिंथकरांस ३:९सुमारे इ.स. ५९
आम्ही परमेश्वराच्या सेवेतील सहकारी आहोत. तुम्ही परमेश्वराचे शेत आहात, परमेश्वराची इमारत आहात.
- 1 करिंथकरांस ३:१०सुमारे इ.स. ५९
परमेश्वराने जी कृपा मला दिली आहे, त्यानुसार मी कुशल बांधकाम करणार्यासारखा पाया घातला आणि आणखी कोणी त्यावर बांधकाम करीत आहे. परंतु प्रत्येकाने बांधकाम काळजीपूर्वक केले पाहिजे.
- 1 करिंथकरांस ३:११सुमारे इ.स. ५९
जो पाया आधी घातलेला आहे, जे स्वतः येशू ख्रिस्त आहे, त्या व्यतिरिक्त दुसरा पाया कोणालाही घालता येणार नाही.
- 1 करिंथकरांस ३:१२सुमारे इ.स. ५९
जर या पायांवर कोणी सोने, चांदी, रत्ने व माणके आणि कोणी केवळ लाकूड, गवत व पेंढ्या वापरून बांधकाम करेल.
- 1 करिंथकरांस ३:१३सुमारे इ.स. ५९
तर त्या प्रत्येकाचे काम जसे आहे तसे दिसेल, कारण तो दिवस ते प्रकाशात आणेल. अग्नीद्वारे ते प्रकट होईल, प्रत्येकाचे काम कसे आहे हे अग्नीने पारखले जाईल.
- 1 करिंथकरांस ३:१४सुमारे इ.स. ५९
बांधलेले टिकून राहिले, तर बांधकाम करणार्याला त्याचे प्रतिफळ मिळेल.
- 1 करिंथकरांस ३:१५सुमारे इ.स. ५९
परंतु जर ते जळून गेले, तर बांधकाम करणार्याला हानी सोसावी लागेल; परंतु तो स्वतः वाचेल, परंतु जणू काय अग्नी ज्वालांमधून बाहेर ओढून काढल्यासारखाच वाचेल.
- 1 करिंथकरांस ३:१६सुमारे इ.स. ५९
तुम्ही स्वतः परमेश्वराचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो हे तुम्हाला माहीत नाही का?
- 1 करिंथकरांस ३:१७सुमारे इ.स. ५९
जर कोणी परमेश्वराच्या मंदिराचा नाश करतो, तर परमेश्वरसुद्धा त्या व्यक्तीचा नाश करतील. कारण परमेश्वराचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही मिळून ते मंदिर आहात.
- 1 करिंथकरांस ३:१८सुमारे इ.स. ५९
तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. जर तुमच्यापैकी कोणी या युगाच्या रीतीप्रमाणे स्वतःला ज्ञानी समजत असेल, तर ज्ञानी होण्यासाठी त्याला “मूर्ख” व्हावे लागेल,
- 1 करिंथकरांस ३:१९सुमारे इ.स. ५९
कारण या जगाचे ज्ञान परमेश्वराच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. असे लिहिले आहे: “ते ज्ञानी लोकांना त्यांच्याच धूर्तपणात पकडतात,”
- 1 करिंथकरांस ३:२०सुमारे इ.स. ५९
आणि पुन्हा, “ज्ञानी लोकांचे विचार निरर्थक असतात हे प्रभू जाणतात.”