- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 1 करिंथकरांस ५:२सुमारे इ.स. ५९
आणि तुम्ही अभिमान बाळगता! याउलट दुःखाने ज्या मनुष्याने असे केले, त्याला सहभागितेतून घालवून द्यावयाचे नव्हते का?
- 1 करिंथकरांस ५:३सुमारे इ.स. ५९
मी शरीराने अनुपस्थित असलो तरी आत्म्याने उपस्थित आहे आणि उपस्थित असल्यासारखा मी प्रभू येशूंच्या नावाने जो हे कृत्य करीत आहे त्याचा न्याय करून चुकलो आहे.
- 1 करिंथकरांस ५:४सुमारे इ.स. ५९
आपल्या प्रभू येशूंच्या शक्तीने युक्त असा माझा आत्मा व तुम्ही एकत्र मिळून
- 1 करिंथकरांस ५:५सुमारे इ.स. ५९
या मनुष्याला देहस्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे, यासाठी की त्याचा आत्मा प्रभूच्या दिवशी तारला जावा.
- 1 करिंथकरांस ५:६सुमारे इ.स. ५९
तुम्ही गर्व करणे उचित नाही. थोडे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते, हे तुम्हाला माहीत नाही का?
- 1 करिंथकरांस ५:७सुमारे इ.स. ५९
या जुन्या खमिराला काढून टाका, म्हणजे तुम्ही एक नवीन अखमीर गोळा तयार व्हाल, जे वास्तविक तुम्हीच आहात. कारण ख्रिस्त आपल्यासाठी वल्हांडणाचा कोकरा म्हणून अर्पिले गेले.
- 1 करिंथकरांस ५:८सुमारे इ.स. ५९
आपण सण साजरा करू या, जुन्या भाकरीच्या खमिराने, द्वेष आणि दुष्टपणाने नव्हे तर त्याऐवजी प्रामाणिकपणाने व सत्याने अखमीर भाकरीने साजरा करू या.
- 1 करिंथकरांस ५:९सुमारे इ.स. ५९
तुम्हाला लिहिलेल्या पत्रात तुम्ही जारकर्मी लोकांमध्ये मिसळू नये असे मी म्हटले होते.
- 1 करिंथकरांस ५:१०सुमारे इ.स. ५९
जे अनीतिमान, लोभिष्ट, फसविणारे आणि मूर्तिपूजक अशा या जगाच्या लोकांविषयी मी बोलत नव्हतो, अन्यथा तुम्हाला हे जग सोडून जावे लागेल.
- 1 करिंथकरांस ५:११सुमारे इ.स. ५९
मी तुम्हाला लिहित आहे की आपण बंधू किंवा भगिनी आहोत असा दावा करीत असतानाही जे जारकर्म किंवा लोभी, निंदक, मूर्तिपूजक, मद्य प्राशन करणारे आहेत अशांमध्ये मिसळू नका. अशा लोकांबरोबर भोजनास देखील बसू नका.
- 1 करिंथकरांस ५:१२सुमारे इ.स. ५९
मंडळीच्या बाहेर जे आहेत त्यांचा न्याय मी का करावा? परंतु जे आत आहेत त्यांचा न्याय करू नये का?
- 1 करिंथकरांस ५:१३सुमारे इ.स. ५९
बाहेरच्या लोकांचा न्याय करणारे परमेश्वर आहेत. “या दुष्ट मनुष्याला तुमच्यामधून काढून टाका.”
- 1 करिंथकरांस ६:१सुमारे इ.स. ५९
जर तुमचा कोणाविरुद्ध वाद असल्यास, तो प्रभूच्या लोकांकडे न नेता, एखाद्या अनीतिमान न्यायाधीशाकडे नेण्याचे धैर्य कसे करता?
- 1 करिंथकरांस ६:२सुमारे इ.स. ५९
आपण प्रभूचे लोक जगाचा न्याय करणार आहोत, हे तुम्हाला माहीत नाही काय? असे असताना, तुम्ही या क्षुल्लक गोष्टींचा आपसात न्याय करण्यास समर्थ नाही का?
- 1 करिंथकरांस ६:३सुमारे इ.स. ५९
आपण स्वतः देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हाला माहीत नाही का? तर त्याच्या तुलनेत या जगाच्या गोष्टी काहीच नाहीत.
- 1 करिंथकरांस ६:४सुमारे इ.स. ५९
जर अशा गोष्टीसंबंधी तुमच्यात वाद आहेत, तर तुमच्या मंडळीशी ज्यांचा काहीही संबंध नाही, अशांना तुम्ही न्याय करावयास कसे लावता?
- 1 करिंथकरांस ६:५सुमारे इ.स. ५९
तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे सांगत आहे. विश्वासणार्यांमधील वादांचा न्याय करू शकेल असा तुमच्यामध्ये कोणीच शहाणा मनुष्य नाही का?
- 1 करिंथकरांस ६:६सुमारे इ.स. ५९
उलट एक विश्वासणारा मनुष्य त्याच्या बंधुवर फिर्याद करतो आणि ती ही विश्वास न ठेवणार्यांपुढे!
- 1 करिंथकरांस ६:७सुमारे इ.स. ५९
तुम्हामध्ये खटले आहेत याचा अर्थ हाच की तुमचा पूर्णपणे पराजय झालेला आहे. त्याऐवजी तुम्ही अन्याय का सहन करत नाही? स्वतःची फसवणूक का करून घेत नाही?
- 1 करिंथकरांस ६:८सुमारे इ.स. ५९
उलट, तुम्ही स्वतःच बंधू व भगिनींची फसवणूक करून त्यांच्यावर अन्याय करता!
- 1 करिंथकरांस ६:९सुमारे इ.स. ५९
अशा वाईट गोष्टी करणार्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. व्यभिचारी, मूर्तिपूजक, जारकर्मी आणि पुमैथुनी,
- 1 करिंथकरांस ६:१०सुमारे इ.स. ५९
चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर आणि दरोडेखोर यांनाही परमेश्वराच्या राज्यात वाटा मिळणार नाही.
- 1 करिंथकरांस ६:११सुमारे इ.स. ५९
तुमच्यापैकी काहीजण अशा प्रकारचे होते, पण आता तुम्हाला धुऊन स्वच्छ करून पवित्र केलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला नीतिमान केले आहे.
- 1 करिंथकरांस ६:१२सुमारे इ.स. ५९
तुम्ही म्हणाल, “मला काहीही करण्याची मुभा आहे,” पण सर्वच गोष्टी हिताच्या नसतात. “मला काहीही करण्याची मुभा असली” तरी कोणत्याही गोष्टींची सत्ता मजवर चालणार नाही.
- 1 करिंथकरांस ६:१३सुमारे इ.स. ५९
तुम्ही म्हणता, “अन्न पोटासाठी आणि पोट अन्नासाठी आहे, पण परमेश्वर या दोघांचाही नाश करतील.” शरीर लैंगिक अशुद्धतेसाठी नाही तर प्रभूसाठी आहे आणि प्रभू शरीरासाठी आहे.