- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह ३१:५सुमारे इ.स.पू. ७१३
ज्याप्रमाणे पक्षी डोक्यावर घिरट्या घालतात, त्याप्रमाणे सर्वसमर्थ याहवेह यरुशलेमची ढाल होतील; ते तिला संरक्षण देऊन सोडवतील, ते त्यांना ओलांडून जातील आणि त्याला सोडवतील आणि त्याचा बचाव करतील.”
- यशायाह ३१:६सुमारे इ.स.पू. ७१३
अहो तुम्ही इस्राएली लोकांनो, ज्यांच्याविरुद्ध तुम्ही फार मोठेपणाने बंड केले आहे त्याच्याकडे परत या.
- यशायाह ३१:७सुमारे इ.स.पू. ७१३
कारण त्या दिवशी तुमच्यामधील प्रत्येकजण तुमच्या पापी हातांनी सोन्या-चांदीच्या ज्या मूर्ती तयार केल्या आहेत, त्यांना नाकारतील.
- यशायाह ३१:८सुमारे इ.स.पू. ७१३
“अश्शूर मानवी तलवारीने पडणार नाही; एक तलवार, जी मर्त्य मानवांची नाही, ती त्यांना गिळून टाकेल. तलवार पाहून ते पळून जातील आणि त्यांच्या तरुणांना जबरदस्तीने मजुरीच्या कामाला ठेवले जाईल.
- यशायाह ३१:९सुमारे इ.स.पू. ७१३
दहशतीमुळे त्यांचा किल्ला पडून जाईल; युद्धाच्या ध्वजाचे दृश्य पाहून त्यांचे सेनापती भयभीत होतील,” ज्या याहवेहचा अग्नी सीयोनमध्ये आहे, ज्यांची भट्टी यरुशलेममध्ये आहे, ते अशी घोषणा करतात.
- यशायाह ३२:१सुमारे इ.स.पू. ७१३
पाहा, एक राजा धार्मिकतेने राज्य करेल आणि राज्यकर्ते न्यायाने सत्ता चालवितील.
- यशायाह ३२:२सुमारे इ.स.पू. ७१३
प्रत्येकजण वाऱ्यापासून आश्रयस्थान आणि वादळापासून आश्रयस्थान, वाळवंटामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रवाहासारखा आणि तहानलेल्या भूमीमध्ये मोठ्या खडकाच्या सावलीसारखा असेल.
- यशायाह ३२:३सुमारे इ.स.पू. ७१३
तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे बंद राहणार नाहीत, आणि ज्यांच्या कानांना ऐकू येते ते ऐकतील.
- यशायाह ३२:४सुमारे इ.स.पू. ७१३
भीती बाळगणाऱ्या अंतःकरणाला माहीत होईल आणि ते समजून घेतील आणि अडखळणारी जीभ अस्खलित आणि स्पष्ट अशी होईल.
- यशायाह ३२:५सुमारे इ.स.पू. ७१३
यापुढे मूर्खांना चांगले व बदमाशांना थोर म्हटले जाणार नाही.
- यशायाह ३२:६सुमारे इ.स.पू. ७१३
मूर्ख लोक मूर्खपणाच्या गोष्टी करतात, त्यांचे अंतःकरण वाईट कृत्य करण्यावरच केंद्रित असते: ते देवहीनतेची कृत्ये करतात आणि याहवेहविरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवितात; भुकेल्यांना ते उपाशी सोडतात आणि व तान्हेल्या जिवांना पाण्यापासून वंचित ठेवतात.
- यशायाह ३२:७सुमारे इ.स.पू. ७१३
बदमाश माणसे दुष्ट पद्धतीचा वापर करतात, गरजवंताची याचना वाजवी असली तरी, ते दुष्टाईच्या योजना बनवितात, ते लबाडीने गरिबांचा नाश करतात.
- यशायाह ३२:८सुमारे इ.स.पू. ७१३
परंतु कुलीन मनुष्य कुलीनतेच्या योजना बनवितो आणि कुलीनतेच्या कार्यावर स्थिर राहतो.
- यशायाह ३२:९सुमारे इ.स.पू. ७१३
आळसात लोळत पडणार्या स्त्रियांनो, उठा व माझे ऐका; हे निश्चिंत असणाऱ्या कन्यांनो, मी काय सांगतो याकडे लक्ष द्या!
- यशायाह ३२:१०सुमारे इ.स.पू. ७१३
एका वर्षाहून अधिक कालावधीत तुम्हाला जे सुरक्षित वाटते ते थरथर कापतील; कारण द्राक्षाचा उपज बुडेल, आणि फळांचा हंगाम येणार नाही.
- यशायाह ३२:११सुमारे इ.स.पू. ७१३
आत्मसंतुष्ट स्त्रियांनो, थरथर कापा; निश्चिंत असलेल्या कन्यांनो, तुमचा थरकाप होऊ द्या! आपली सुंदर वस्त्रे काढून शोक करण्यासाठी गोणपाट गुंडाळा.
- यशायाह ३२:१२सुमारे इ.स.पू. ७१३
तुमचे ऊर बडवा, प्रसन्न करणार्या तुमच्या शेतांसाठी, फलवंत द्राक्षवेलीसाठी
- यशायाह ३२:१३सुमारे इ.स.पू. ७१३
आणि माझ्या लोकांच्या भूमीसाठीही कारण शेतात सर्वत्र काटेकुसळे व झुडपे वाढतील— होय, आनंदोत्सव करणाऱ्या तुमच्या घरांसाठी, व चैनबाजी करणार्या या शहरांसाठी विलाप करा.
- यशायाह ३२:१४सुमारे इ.स.पू. ७१३
गडाचा त्याग करण्यात येईल, गजबजलेली शहरे रिकामी होतील; किल्ले व टेहळणी बुरूज कायमची पडीक स्थाने होतील, जिथे रानगाढवांचे व शेरडेमेंढरांचे कळप आनंदात चरतील,
- यशायाह ३२:१५सुमारे इ.स.पू. ७१३
परंतु जेव्हा उच्च स्थानावरून परमेश्वराचा आत्मा आपल्यावर ओतल्या जाईल, ओसाड भूमी सुपीक होईल, आणि सुपीक भूमी अरण्यासारखी वाटू लागेल.
- यशायाह ३२:१६सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेहचा न्याय वाळवंटातही वास्तव्य करेल, व त्यांची नीतिमत्ता सुपीक भूमीत नांदेल.
- यशायाह ३२:१७सुमारे इ.स.पू. ७१३
शांती नीतिमत्तेचे फळ असेल; नीतिमत्तेचे कार्य तर सार्वकालिक शांतता आणि धैर्य आहे.
- यशायाह ३२:१८सुमारे इ.स.पू. ७१३
माझ्या लोकांची घरे शांतीने भरलेली आणि सुरक्षित असतील, त्यांची शांतिभंग न होता ते विश्रांती घेतील.
- यशायाह ३२:१९सुमारे इ.स.पू. ७१३
जरी गारांनी अरण्याचा नाश होईल आणि सर्व शहरे जमीनदोस्त होतील.
- यशायाह ३२:२०सुमारे इ.स.पू. ७१३
तरी तुम्ही किती आशीर्वादित व्हाल, प्रत्येक झऱ्याजवळ तुमचे बीज पेराल, आणि तुमची गुरे आणि गाढवे मुक्तपणे चरतील.