- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह ३०:१३सुमारे इ.स.पू. ७१३
हे पाप तुमच्यासाठी उंच, भेगा पडलेल्या आणि फुगलेल्या भिंतीसारखे, जी अचानक, क्षणार्धात कोसळते अशी होईल.
- यशायाह ३०:१४सुमारे इ.स.पू. ७१३
मातीच्या भांड्यांसारखे त्याचे इतक्या निर्दयीपणाने तुकडे केले जातील की त्याच्या अनेक बारीक तुकड्यांमध्ये चुलीमधून निखारे घेण्यासाठी किंवा रांजणातून पाणी काढण्यासाठी एकही तुकडा सापडणार नाही.”
- यशायाह ३०:१५सुमारे इ.स.पू. ७१३
सार्वभौम याहवेह, इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात: “पश्चात्ताप आणि विश्रांती करणे हेच तुमचे तारण आहे, शांतता राखणे आणि विश्वास ठेवणे यामध्ये तुमचे सामर्थ्य आहे, परंतु यापैकी तुम्हाकडे काहीही नसेल.
- यशायाह ३०:१६सुमारे इ.स.पू. ७१३
तुम्ही असे म्हणाला की, ‘नाही, आम्ही घोड्यांवर स्वार होऊन पळून जाऊ.’ म्हणून तुम्ही पळून जाल! तुम्ही असे म्हणाला, ‘आम्ही वेगवान घोड्यांवर स्वार होऊ.’ म्हणून तुमचे पाठलाग करणारे चपळ होतील!
- यशायाह ३०:१७सुमारे इ.स.पू. ७१३
जोपर्यंत तुम्हाला डोंगराच्या शिखरावर असलेल्या ध्वजस्तंभाप्रमाणे, टेकडीवर लावलेल्या पताक्याप्रमाणे सोडून दिले जात नाही तोपर्यंत एका व्यक्तीच्या धमकीने एक हजार लोक पळून जातील; पाच जणांच्या धमकीने तुम्ही सर्वजण पळून जाल.”
- यशायाह ३०:१८सुमारे इ.स.पू. ७१३
तरीसुद्धा याहवेह तुमच्यावर कृपा करण्यास आतुरलेले असतात; त्यामुळे तुमच्यावर दया दाखविण्यास ते उभारतील. कारण याहवेह हे न्यायी परमेश्वर आहेत. धन्य आहेत ते सर्व जे त्यांची वाट पाहतात!
- यशायाह ३०:१९सुमारे इ.स.पू. ७१३
यरुशलेममध्ये राहणाऱ्या सीयोनच्या लोकांनो, तुम्ही यापुढे रडणार नाही. जेव्हा तुम्ही मदतीसाठी हाक माराल, तेव्हा ते किती दयाळू असतील! तुमची हाक ऐकताच ते तुम्हाला उत्तर देतील.
- यशायाह ३०:२०सुमारे इ.स.पू. ७१३
जरी प्रभू तुम्हाला आपत्तीची भाकर आणि वेदनेचे पाणी देत असले, तरी तुमचे शिक्षक यापुढे लपून राहणार नाहीत; तुम्ही त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल.
- यशायाह ३०:२१सुमारे इ.स.पू. ७१३
तुम्ही जरी उजवीकडे किंवा डावीकडे वळलात तरी तुमच्यामागे तुमच्या कानांवर एक आवाज पडेल, “हाच मार्ग आहे; त्यावर चाल.”
- यशायाह ३०:२२सुमारे इ.स.पू. ७१३
मग तुम्ही तुमच्या चांदीने मढविलेल्या मूर्ती आणि सोन्याने आच्छादित असलेल्या तुमच्या प्रतिमांची विटंबना कराल. तुम्ही त्यांना मासिक पाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल आणि त्यांना असे म्हणाल, “आमच्यापासून दूर व्हा!”
- यशायाह ३०:२३सुमारे इ.स.पू. ७१३
तुम्ही जमिनीत जे बीज पेरता, त्यासाठी ते तुमच्याकडे पाऊससुद्धा पाठवतील आणि त्या जमिनीतून येणारे धान्य पौष्टिक आणि विपुल असेल. त्या दिवशी तुमची गुरे विस्तीर्ण कुरणांमध्ये चरतील.
- यशायाह ३०:२४सुमारे इ.स.पू. ७१३
शेतात मशागतीचे काम करणारे बैल आणि गाढवे हे काटे आणि फावड्याने उफणलेला चारा आणि उकडलेले बटाटे खातील.
- यशायाह ३०:२५सुमारे इ.स.पू. ७१३
त्या मोठ्या कत्तलीच्या दिवशी, जेव्हा बुरूज पडतील, तेव्हा प्रत्येक उंच डोंगरावर आणि प्रत्येक उंच पर्वतावर पाण्याचे प्रवाह वाहतील.
- यशायाह ३०:२६सुमारे इ.स.पू. ७१३
जेव्हा याहवेह त्यांच्या लोकांच्या जखमांना बांधतील आणि त्यांनी दिलेल्या जखमा बरे करतील, तेव्हा चंद्र सूर्यासारखा चमकेल आणि सूर्यप्रकाश सात पटीने तेजस्वी होईल, सात पूर्ण दिवसांच्या प्रकाशासारखा तो असेल.
- यशायाह ३०:२७सुमारे इ.स.पू. ७१३
पहा, धगधगत्या क्रोधाने आणि धुराच्या दाट ढगांबरोबर, याहवेहचे नाव फार लांबून येत आहे; त्यांचे ओठ क्रोधाने भरलेले आहेत, आणि त्यांची जीभ भस्म करणारा अग्नी आहे.
- यशायाह ३०:२८सुमारे इ.स.पू. ७१३
त्यांचा श्वास जलदगतीने येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यासारखा आहे, तो गळ्यापर्यंत वर येतो. ते नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना हादरवितात; ते लोकांच्या जबड्यात लगामाचा भाग ठेवतात जो त्यांना चुकीच्या मार्गाने घेऊन जातो.
- यशायाह ३०:२९सुमारे इ.स.पू. ७१३
आणि तुम्ही जसे रात्रीच्या वेळेस पवित्र सण साजरा करता त्याप्रमाणे तुम्ही गाणी गाल; जेव्हा लोक बासरी वाजवित याहवेहच्या पर्वताकडे वर इस्राएलच्या खडकाकडे जातात, तेव्हा तुमची अंतःकरणे आनंदित होतील.
- यशायाह ३०:३०सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेह त्यांची उदात्त वाणी लोकांना ऐकवतील आणि घोर संतापाने आणि भस्मसात करणाऱ्या अग्नीने, ढगफुटी, वादळ आणि गारा यांच्याबरोबर त्यांची भुजा खाली येत असताना लोक पहातील.
- यशायाह ३०:३१सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेहचा आवाज अश्शूरला हादरून टाकेल; ते त्यांच्या काठीने त्यांना तडाखा देतील.
- यशायाह ३०:३२सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेह त्यांच्याकडील शिक्षेच्या दांड्याने त्यांच्यावर दिलेला प्रत्येक प्रहार डफ आणि वीणा यांच्या संगीतावर असेल, जसे ते त्यांच्या हाताच्या तडाख्याने युद्धामध्ये त्यांच्याशी लढतात.
- यशायाह ३०:३३सुमारे इ.स.पू. ७१३
तोफेथ फार पूर्वीपासून तयार झालेला आहे; ते राजासाठी तयार केलेले आहे. त्याचे अग्निकुंड खोल आणि रुंद केले आहे, त्यामध्ये भरपूर अग्नी आणि लाकूड आहे; जळत्या गंधकाच्या प्रवाहासारखा, याहवेहचा श्वास ते पेटवितो.
- यशायाह ३१:१सुमारे इ.स.पू. ७१३
जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात, जे घोड्यांवर अवलंबून असतात, त्यांचा धिक्कार असो, जे त्यांच्याकडील पुष्कळ रथांच्या संख्येवर आणि घोडेस्वारांच्या मोठ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात, परंतु इस्राएलचे जे पवित्र परमेश्वराकडे पाहात नाहीत, किंवा याहवेहकडून मदत घेत नाहीत.
- यशायाह ३१:२सुमारे इ.स.पू. ७१३
तरीसुद्धा ते सुज्ञ आहेत आणि संकट आणू शकतात. ते त्यांचे शब्द मागे घेत नाहीत. जे दुष्टांना मदत करतात त्यांच्याविरुद्ध ते त्या दुष्ट राष्ट्राविरुद्ध उठाव करतील,
- यशायाह ३१:३सुमारे इ.स.पू. ७१३
परंतु इजिप्तचे लोक केवळ नश्वर आहेत आणि ते परमेश्वर नाहीत; त्यांचे घोडे मांसाचे आहेत आणि आत्म्याचे नाहीत. जेव्हा याहवेह त्यांचा हात पुढे करतात तेव्हा जे मदत करणारे ते अडखळतील, ज्यांना मदत मिळाली आहे ते पडतील. सर्वजण एकत्र नाश पावतील.
- यशायाह ३१:४सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेह मला असे म्हणतात: “जसा सिंह गुरगुरतो, एक मोठा सिंह त्याच्या भक्ष्यावर— आणि त्याला विरोध करण्यासाठी जरी मेंढपाळांची संपूर्ण टोळी एकत्र बोलावली जाते, तरी तो त्यांच्या ओरडण्याने घाबरत नाही किंवा त्यांच्या मोठ्या गोंधळ्याच्या आवाजाने अस्वस्थ होत नाही, म्हणून सर्वसमर्थ याहवेह सीयोन पर्वतावर आणि त्याच्या उंचीवर युद्ध करण्यासाठी खाली येतील.