- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- योएल १:१सुमारे इ.स.पू. ८००
पेथूएलचा पुत्र योएलकडे याहवेहचे वचन आले.
- योएल १:२सुमारे इ.स.पू. ८००
वडिलजनहो, हे ऐका; या देशात राहणारे प्रत्येकजण हे ऐको. तुमच्या दिवसात किंवा तुमच्या पूर्वजांच्या दिवसात असे कधी घडले होते काय?
- योएल १:३सुमारे इ.स.पू. ८००
तुम्ही ते आपल्या लेकरांना सांगा, आणि तुमच्या लेकरांनी ते त्यांच्या लेकरांना सांगावे, आणि त्यांच्या लेकरांनी पुढील पिढीला सांगावे.
- योएल १:४सुमारे इ.स.पू. ८००
कुरतडणार्या टोळांनी जे सोडले होते, ते झुंडींनी येणार्या टोळांनी खाल्ले; जे झुंडींनी येणार्या टोळांनी सोडले ते खुरडत चालणार्या टोळांनी खाल्ले; जे खुरडत चालणार्या टोळांनी सोडले ते इतर टोळांनी खाल्ले.
- योएल १:५सुमारे इ.स.पू. ८००
अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा! हे सर्व द्राक्षारस पिणार्यांनो विलाप करा; नवीन द्राक्षारसाकरिता विलाप करा कारण तो तुमच्या ओठातून काढून घेतला आहे.
- योएल १:६सुमारे इ.स.पू. ८००
एक राष्ट्र माझ्या देशावर चालून आले आहे, ते सैन्य बलाढ्य आणि असंख्य आहे; त्यांचे दात हे सिंहाचे दात आहे, त्यांचे सुळे हे सिंहिणीचे सुळे आहेत.
- योएल १:७सुमारे इ.स.पू. ८००
त्या राष्ट्रांनी माझ्या द्राक्षवेलींची नासधूस केली आहेत आणि अंजिराच्या झाडांचा नाश केला आहे. त्यांनी त्याचे खोड सोलून साल दूर फेकली आहे, त्यांच्या फांद्या पांढर्या केल्या आहेत.
- योएल १:८सुमारे इ.स.पू. ८००
जशी एक कुमारी गोणपाट नेसून आपल्या तारुण्यातील प्रियकरासाठी करते, तसा तुम्हीही शोक करा.
- योएल १:९सुमारे इ.स.पू. ८००
याहवेहच्या मंदिरात वाहण्याची अन्नार्पणे व पेयार्पणे बंद झाली आहेत; याहवेहसमोर सेवा करणारे याजक विलाप करीत आहे.
- योएल १:१०सुमारे इ.स.पू. ८००
शेतांची धूळधाण झाली आहेत, भूमी कोरडी पडली आहे; धान्याचा नाश झाला आहे, नवीन द्राक्षारस सुकला आहे, जैतून तेल समाप्त झाले आहे.
- योएल १:११सुमारे इ.स.पू. ८००
अहो, शेतकर्यांनो, लज्जित व्हा, द्राक्षमळ्यांची मशागत करणार्यांनो, आकांत करा; गहू व जव याकरिता विलाप करा, कारण शेतातील पिके नष्ट झाली आहेत.
- योएल १:१२सुमारे इ.स.पू. ८००
द्राक्षवेल वाळून गेली आहे अंजिराचे झाड कोमेजले आहे; डाळिंब, खजुराचे आणि सफरचंदाचे झाड; शेतातील सर्व झाडे सुकून गेली आहेत. खचितच लोकांचा आनंद विरून गेला आहे.
- योएल १:१३सुमारे इ.स.पू. ८००
अहो याजकांनो, गोणपाट परिधान करा आणि शोक करा; वेदीची सेवा करणार्यांनो, विलाप करा. तुम्ही जी परमेश्वराची सेवा करता, या, गोणपाट परिधान करीत रात्र घालावा; कारण अन्नार्पणे व पेयार्पणे तुमच्या परमेश्वराच्या भवनात येणे बंद झाले आहेत.
- योएल १:१४सुमारे इ.स.पू. ८००
एक पवित्र उपास जाहीर करा; लोकांची एक धार्मिक सभा बोलवा. वडीलजनास व देशात राहणार्यांना याहवेह तुमच्या परमेश्वराच्या भवनात बोलवा, आणि याहवेहपुढे शोक करा.
- योएल १:१५सुमारे इ.स.पू. ८००
त्या दिवसाबद्दल हाय! याहवेहचा दिवस जवळ आहे; सर्वसमर्थापासून जसा नाश तसे ते येतील.
- योएल १:१६सुमारे इ.स.पू. ८००
आपल्या डोळ्यादेखत अन्न नाहीसे झाले नाही काय— आमच्या परमेश्वराच्या भवनातील सर्व आनंद व उल्हास गेले नाही काय?
- योएल १:१७सुमारे इ.स.पू. ८००
जमिनीच्या ढेकळांखाली बीज कुजून जात आहे. कोठारे उद्ध्वस्त झाली आहेत आणि गोदामे मोडली आहेत, कारण धान्य करपून गेले आहे.
- योएल १:१८सुमारे इ.स.पू. ८००
गुरे कशी कण्हत आहेत! शेरडामेंढरांचे कळप व्याकूळ झाले आहेत, कारण त्यांना चरण्यासाठी कुरणेच नाहीत; मेंढ्यांचे कळप विव्हळत आहेत.
- योएल १:१९सुमारे इ.स.पू. ८००
हे याहवेह, मी तुम्हाला हाक मारीत आहेत, कारण अग्नीच्या उष्णतेने कुरणे जाळून फस्त केली आहेत, आणि अग्नीने मैदानातील सर्व झाडे भस्मसात झाली आहेत.
- योएल १:२०सुमारे इ.स.पू. ८००
आणि वनपशूदेखील तुमच्याकडे आक्रोश करीत आहेत, पाण्याचे झरे कोरडे पडले आहेत. आणि आणि अग्नीने रानातील कुरणे होरपळून निघाली आहे.
- योएल २:१सुमारे इ.स.पू. ८००
सीयोनात कर्णा वाजवा; माझ्या पवित्र पर्वतावर धोक्याची घंटा वाजवा. देशात राहणार्या प्रत्येकाचा भीतीने थरकाप होवो, कारण याहवेहचा दिवस येत आहे. तो अगदी हाताशी आहे—
- योएल २:२सुमारे इ.स.पू. ८००
तो दिवस अंधाराचा व औदासिन्याचा, मेघांचा व दाट काळोखाचा दिवस. जसे डोंगरावर विस्तारलेल्या पहाटेसारखा आहे तसे विशाल व बलवान सैन्य चालून येत आहे, यापूर्वी असे कधी झाले नव्हते, नंतरही अनेक पिढ्या पुन्हा कधीच होणार नाही.
- योएल २:३सुमारे इ.स.पू. ८००
त्यांच्यापुढे अग्नी विनाश करीत आहे, त्यांच्यामागे ज्वाला पेटली आहे. त्यांच्यापुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्यामागील प्रदेश ओसाड वाळवंट आहे— त्यांच्या तावडीतून काहीच वाचू शकत नाही.
- योएल २:४सुमारे इ.स.पू. ८००
त्यांचे स्वरूप घोड्यांप्रमाणेच आहेत; आणि घोडेस्वारा प्रमाणे ते जोरात धावतात.
- योएल २:५सुमारे इ.स.पू. ८००
रथांच्या आवाजाप्रमाणे, पर्वताच्या माथ्यांवर ते उड्या मारतात, भुसा भस्म करणार्या अग्नीप्रमाणे, युद्धासाठी सज्ज झालेल्या पराक्रमी सैन्याप्रमाणे आहे.