- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- आमोस १:१सुमारे इ.स.पू. ७८७
तकोवा येथील एक मेंढपाळ आमोसाची वचने—त्याने उज्जीयाह यहूदाहचा आणि योआश चा पुत्र यरोबोअम इस्राएलचा राजा असता, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाबद्दल जे दृष्टान्तामध्ये पाहिले ते हे.
- आमोस १:२सुमारे इ.स.पू. ७८७
त्याने म्हटले: “याहवेह सीयोनातून गर्जना करतात आणि यरुशलेमातून गडगडाट करतात; मेंढपाळांची कुरणे सुकून जातात, आणि कर्मेलचा माथा कोमेजून जाईल.”
- आमोस १:३सुमारे इ.स.पू. ७८७
याहवेह असे म्हणतात: “दिमिष्कच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण तिने गिलआदला मळणी करण्याच्या लोखंडी काट्यांनी मळले आहे,
- आमोस १:४सुमारे इ.स.पू. ७८७
म्हणून मी हजाएलच्या घरावर अग्नी पाठवेन व बेन-हदादच्या किल्ल्याला भस्म करेन.
- आमोस १:५सुमारे इ.स.पू. ७८७
दिमिष्कचे प्रवेशद्वार तोडून टाकेन; आणि आवेन खोर्यातील राजा आणि बेथ-एदेनचा राजदंड धरणाऱ्यांना मी नष्ट करेन. अरामाचे लोक कीर येथे गुलाम म्हणून जातील.” याहवेह असे म्हणतात.
- आमोस १:६सुमारे इ.स.पू. ७८७
याहवेह असे म्हणतात: “गाझाच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण तिने सर्व लोकांना बंदिवासात घेतले आणि त्यांना एदोमला विकले,
- आमोस १:७सुमारे इ.स.पू. ७८७
म्हणून मी गाझाच्या तटांवर अग्नी पाठवेन आणि तिच्या किल्ल्याला भस्म करेन.
- आमोस १:८सुमारे इ.स.पू. ७८७
मी अश्दोदच्या राजाचा आणि अष्कलोनचा राजदंड धरणार्याचा नाश करेन. शेवटच्या पलिष्टीचा नाश होत नाही तोपर्यंत मी आपला हात एक्रोनावर चालवेन,” असे सार्वभौम याहवेह म्हणतात.
- आमोस १:९सुमारे इ.स.पू. ७८७
याहवेह असे म्हणतात: “सोरच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण बंदिवासातील सर्वांना एदोमास विकले आणि बंधुत्वाच्या कराराची अवहेलना केली आहे.
- आमोस १:१०सुमारे इ.स.पू. ७८७
म्हणून मी सोरच्या तटांवर अग्नी पाठवेन आणि तिच्या किल्ल्यांना भस्म करेन.”
- आमोस १:११सुमारे इ.स.पू. ७८७
याहवेह असे म्हणतात: “एदोमच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून अनुताप करणार नाही. कारण त्याने तलवार घेऊन आपल्या भावाचा पाठलाग केला आणि देशातील स्त्रियांचा वध केला, कारण त्याचा क्रोध निरंतर वाढत होता, आणि त्याच्या क्रोध अनियंत्रित वाढत गेला,
- आमोस १:१२सुमारे इ.स.पू. ७८७
म्हणून मी तेमानवर अग्नी पाठवेन आणि ती आग बस्राचे किल्ले भस्म करून टाकील.”
- आमोस १:१३सुमारे इ.स.पू. ७८७
याहवेह असे म्हणतात, “अम्मोनच्या तीन नाही तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण आपल्या सीमा वाढविण्यासाठी गिलआदाच्या गरोदर स्त्रियांना चिरले,
- आमोस १:१४सुमारे इ.स.पू. ७८७
म्हणून मी राब्बाहच्या तटांवर अग्नी पाठवेन आणि त्यामुळे त्यांचे किल्ले व राजमहाल भस्म होतील. महान वादळामध्ये वावटळीचा आवाज व्हावा तसा भयानक रणगर्जना होतील;
- आमोस १:१५सुमारे इ.स.पू. ७८७
आणि तिचा राजा आणि राजाचे अधिपती बरोबरच बंदिवासात जातील.” याहवेहने म्हटले.
- आमोस २:१सुमारे इ.स.पू. ७८७
याहवेह असे म्हणतात, “मोआबच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण त्याने एदोम राजाची हाडे जाळून त्याची राख केली आहे.
- आमोस २:२सुमारे इ.स.पू. ७८७
मी मोआबावर अग्नी पाठवेन तो करीयोथच्या किल्ल्याला भस्म करेन. युद्धाच्या आक्रोशात आणि रणशिंगाच्या आवाजात मोआब प्रचंड नाशाने खाली जाईल.
- आमोस २:३सुमारे इ.स.पू. ७८७
मी तिच्या शासकाचा नाश करेन आणि त्याच्यासोबत तिच्या सर्व अधिकार्यांना मारून टाकेन.” असे याहवेह म्हणतात.
- आमोस २:४सुमारे इ.स.पू. ७८७
याहवेह असे म्हणतात: “यहूदीयाच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी याहवेहचे नियमशास्त्र धिक्कारले आहे व त्यांचे विधी पाळले नाही. ज्या दैवतांचे अनुसरण त्यांच्या पूर्वजांनी केले होते त्या त्यांच्या खोट्या दैवतांनी त्यांची दिशाभूल केली होती,
- आमोस २:५सुमारे इ.स.पू. ७८७
म्हणून मी यहूदीयावर अग्नी पाठवेन आणि यरुशलेमचे किल्ले भस्म करेन.”
- आमोस २:६सुमारे इ.स.पू. ७८७
याहवेह असे म्हणतात, “इस्राएलला तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. चांदीसाठी ते एका न्यायी व्यक्तीला, आणि पायातील एका जोड्यासाठी गरजवंत व्यक्तीला विकतात.
- आमोस २:७सुमारे इ.स.पू. ७८७
ते गरिबांच्या डोक्याला भूमिवरील धुळीत पायदळी तुडवितात आणि दीनदुबळ्यांचा न्याय करीत नाही. मुलगा व पिता एकाच तरुणीकडे जाऊन माझ्या पवित्र नामाला काळिमा लावतात.
- आमोस २:८सुमारे इ.स.पू. ७८७
प्रत्येक वेदीजवळ गहाण ठेवलेल्या वस्त्रांवर पडून राहतात आणि आपल्या दैवतांच्या घरात दंड म्हणून घेतलेला द्राक्षारस पितात.
- आमोस २:९सुमारे इ.स.पू. ७८७
“जरी ते गंधसरूंसारखे उंच व एलावृक्षांसारखे मजबूत होते, तरी मी त्यांच्यासमोर अमोरी लोकांचा संहार केला. मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासविले.
- आमोस २:१०सुमारे इ.स.पू. ७८७
अमोर्यांचा देश तुम्हाला द्यावा म्हणून मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले व चाळीस वर्षे तुम्हाला रानात चालविले.