- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- मलाखी १:१सुमारे इ.स.पू. ३९७
एक भविष्यवाणी: संदेष्टा मलाखी द्वारे याहवेहने इस्राएलला दिलेले वचन.
- मलाखी १:२सुमारे इ.स.पू. ३९७
याहवेह म्हणतात, “मी तुमच्यावर नितांत प्रेम केले आहे.” पण यावर तुम्ही विचारता, “हे प्रेम तुम्ही कसे केले?” याहवेह जाहीर करतात, “एसाव याकोबाचा सख्खा भाऊ नव्हता काय? तरी देखील मी याकोबावर प्रीती केली.
- मलाखी १:३सुमारे इ.स.पू. ३९७
परंतु मी एसावाचा द्वेष केला आणि त्याचा डोंगराळ प्रदेश टाकाऊ भूमी केला व त्याचे वतन रानातील कोल्ह्यांकरिता सोडले.”
- मलाखी १:४सुमारे इ.स.पू. ३९७
एसावाचा वंशज, एदोमाने म्हटले, “जरी आम्ही चिरडले गेलो आहोत तरी देखील, भग्न झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू.” परंतु सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “ते बांधतील, पण मी ते उद्ध्वस्त करेन, कारण त्या देशाचे नाव दुष्टाईचा देश आणि त्या लोकांवर नेहमीच याहवेहचा कोप राहील.
- मलाखी १:५सुमारे इ.स.पू. ३९७
तू स्वतःच्या डोळ्याने बघशील व म्हणशील, ‘इस्राएलच्या सीमेपलीकडे देखील याहवेह महान आहेत!’
- मलाखी १:६सुमारे इ.स.पू. ३९७
“पुत्र आपल्या पित्याचा आदर करतो, नोकर आपल्या धन्याचा आदर करतो. जर मी तुमचा पिता आहे, तर मला दिला जाणारा योग्य आदर कुठे आहे? मी जर धनी आहे, तर मला दिला जाणारा योग्य आदर कुठे आहे?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. “ते तुम्ही याजक आहात, जे माझ्या नामाचा अनादर करतात. “पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुमच्या नामाचा अनादर कसा केला?’
- मलाखी १:७सुमारे इ.स.पू. ३९७
“तुम्ही माझ्या वेदीवर भ्रष्ट अर्पणे आणता तेव्हा. “परंतु तुम्ही विचारता, ‘आम्ही तुम्हाला कसे अमंगळ केले?’ “याहवेहचा मेज तुच्छ आहे असे तुमच्या म्हणण्याने.
- मलाखी १:८सुमारे इ.स.पू. ३९७
जेव्हा तुम्ही वेदीवर आंधळे पशू अर्पण करता, हे चुकीचे नाही काय? जेव्हा तुम्ही वेदीवर लंगडे वा रोगट पशू अर्पण करता, हे चुकीचे नाही काय? हे अर्पण तुम्ही आपल्या राज्यपालांना करून पाहा! ते तुमच्यावर प्रसन्न होतील का? ते तुमचा स्वीकार करतील का?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
- मलाखी १:९सुमारे इ.स.पू. ३९७
“मग तुम्ही विनंती करता, परमेश्वरा आम्हावर दया करा. पण अशा प्रकारची अर्पणे हातात घेऊन येता, तर ते तुमचा स्वीकार करतील का?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
- मलाखी १:१०सुमारे इ.स.पू. ३९७
“अहा, तुमच्यापैकी कोणीतरी मंदिराची दारे बंद करावी, म्हणजे तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक धूप जाळणार नाही! मी तुमच्यावर मुळीच प्रसन्न नाही, आणि तुमच्या हातातील अर्पणांचा स्वीकार करणार नाही.” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
- मलाखी १:११सुमारे इ.स.पू. ३९७
“जिथून सूर्य उगवतो व जिथे तो मावळतो तिथपर्यंतच्या सर्व राष्ट्रांमध्ये माझे नाम महान केले जाईल. प्रत्येक ठिकाणी माझ्या सन्मानार्थ सुवासिक धूप जाळण्यात येईल व शुद्ध अर्पणे वाहण्यात येतील, कारण माझे नाम सर्व राष्ट्रांमध्ये थोर होईल,” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
- मलाखी १:१२सुमारे इ.स.पू. ३९७
“ ‘प्रभूचा मेज अशुद्ध आहे’ व ‘त्यावरील अन्न तुच्छ आहे,’ असे सांगून तुम्ही माझे नाम अपवित्र करता.
- मलाखी १:१३सुमारे इ.स.पू. ३९७
‘किती हे ओझे आहे!’ असे म्हणून तुम्ही त्याकडे घृणेने नाक मुरडता,” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. “जेव्हा तुम्ही जखमी, लंगडे आणि आजारी पशू आणता व ते अर्पणे म्हणून वाहता, मी ते तुमच्या हातून स्वीकारावे काय?” याहवेह असे म्हणतात.
- मलाखी १:१४सुमारे इ.स.पू. ३९७
“प्रभूला आपल्या कळपातील एखादा धष्टपुष्ट मेंढा असूनही व त्याचे अर्पण करण्याचे वचन देऊन, जो आजारी असलेला मेंढा अर्पण करतो, तो लबाड शापित असो. कारण मी परमथोर राजा आहे आणि माझे नाव सर्व देशांमध्ये अत्यंत भयनीय आहे.” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
- मलाखी २:१सुमारे इ.स.पू. ३९७
“आणि आता, अहो याजकांनो ऐका, हा सावधानतेचा इशारा तुमच्याकरिता आहे.
- मलाखी २:२सुमारे इ.स.पू. ३९७
जर तुम्ही ऐकले नाही आणि माझ्या नावाचे गौरव करण्याचा निश्चय केला नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवेन आणि तुमच्या आशीर्वादास शाप देईन. होय, मी ते आधीच शापित केले आहेत, कारण तुम्ही माझ्या नावाचे गौरव करण्याचा निश्चय केला नाही,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
- मलाखी २:३सुमारे इ.स.पू. ३९७
“हे लक्षात ठेवा की मी तुमच्या मुलांना धमकावेन आणि तुम्ही मला सणासाठी अर्पण म्हणून आणलेल्या पशूंची विष्ठा मी तुमच्या मुखांना फाशीन आणि तुम्हाला तसेच जाऊ देईन.
- मलाखी २:४सुमारे इ.स.पू. ३९७
आणि मग तुम्हाला समजेल की मी तुम्हाला हा सावधानतेचा इशारा दिला आहे, जेणेकरून लेवी वंशाशी माझा करार कायम राहील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
- मलाखी २:५सुमारे इ.स.पू. ३९७
“माझा करार लेवी वंशाशी होता, जीवन आणि शांतीचा करार आणि मी हे सर्व त्याला दिले; हे प्राप्त व्हावे म्हणून आदर करण्याची गरज होती आणि त्याने मला आदर दिला व माझ्या नामाचे भय बाळगले.
- मलाखी २:६सुमारे इ.स.पू. ३९७
सत्याचे शिक्षण त्याच्या मुखात होते व त्याच्या जिभेवर काहीही असत्य असे नव्हते. तो माझ्यासह शांती व नीतिमत्तेत चालला आणि त्याने अनेकांना त्यांच्या पापी जीवनापासून वळविले.
- मलाखी २:७सुमारे इ.स.पू. ३९७
“याजकांच्या ओठात याहवेहसंबंधीचे ज्ञान साठविलेले असावे, कारण तो सर्वसमर्थ याहवेहचा संदेष्टा आहे आणि लोक त्याच्या मुखाद्वारे शिकवण शोधतात.
- मलाखी २:८सुमारे इ.स.पू. ३९७
पण तुम्ही पथभ्रष्ट झाला आहात व तुमच्या शिक्षणामुळे अनेकजण अडखळून पडले आहेत; तुम्ही लेव्याचा करार विपरीत केला आहे,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
- मलाखी २:९सुमारे इ.स.पू. ३९७
“म्हणून सर्व लोकांच्या दृष्टीने मी तुम्हाला तिरस्करणीय व तुच्छ केले आहे; कारण तुम्ही स्वतः माझे मार्ग अनुसरले नाहीतच, पण कायद्याबाबत तुम्ही पक्षपात केला.”
- मलाखी २:१०सुमारे इ.स.पू. ३९७
आपण सर्व एकाच पित्याची मुले नाही का? आपल्याला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? मग आपण एकमेकांचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो?
- मलाखी २:११सुमारे इ.स.पू. ३९७
यहूदाहने विश्वासघात केला. इस्राएल आणि यरुशलेम येथे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे: यहूदीयाच्या पुरुषांनी याहवेहचे प्रिय मंदिर परकीय मूर्तिपूजक स्त्रियांशी विवाह करून भ्रष्ट केले आहे.