मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हबक्कूक १:१सुमारे इ.स.पू. ६२६

    संदेष्टा हबक्कूकला प्राप्त झालेली ही भविष्यवाणी आहे:

  2. हबक्कूक १:२सुमारे इ.स.पू. ६२६

    हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा? पण तुम्ही ऐकत नाहीत? मी तुम्हाला ओरडून हाक मारतो, “हिंसा!” पण तुम्ही वाचवित नाहीत.

  3. हबक्कूक १:३सुमारे इ.स.पू. ६२६

    तुम्ही मला अन्यायाकडे का पहायला लावता? तुम्ही चुकीचे कार्य का सहन करता? विनाश आणि हिंसाचार माझ्यापुढे होत आहे; वाद व कलह वाढत आहेत.

  4. हबक्कूक १:४सुमारे इ.स.पू. ६२६

    म्हणून कायदा नेभळा झाला आहे, आणि योग्य न्याय कधीही दिला जात नाही, दुष्टांनी नीतिमानांना वेढले आहे, म्हणून कायदा विपरीत केला जातो.

  5. हबक्कूक १:५सुमारे इ.स.पू. ६२६

    “देशांकडे पाहा आणि लक्षपूर्वक बघ— आणि अत्यंत आश्चर्यचकित हो. कारण आता मी तुझ्या काळात जे कार्य करणार आहे जरी ते तुला सांगितले तरी त्यावर तुझा विश्वास बसणार नाही.

  6. हबक्कूक १:६सुमारे इ.स.पू. ६२६

    मी बाबेलच्या लोकांना उभारणार आहे, ते निर्दयी आणि उतावळे लोक आहेत, जे संपूर्ण पृथ्वीला पादाक्रांत करीत आहेत ते स्वतःचे नसलेले आवास काबीज करतील.

  7. हबक्कूक १:७सुमारे इ.स.पू. ६२६

    ते दहशत वाटेलसे व भीतिदायक लोक आहेत; ते स्वतःचाच कायदा बनवितात आणि स्वतःचाच मान राखतात.

  8. हबक्कूक १:८सुमारे इ.स.पू. ६२६

    त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा चपळ आहेत, संधिप्रकाशात फिरणार्‍या लांडग्यापेक्षाही ते उग्र आहेत. त्यांचे घोडदळ बेफामपणे पुढे धाव घेते; त्यांचे स्वार दूर देशातून येतात. भक्ष्यावर तुटून पडणाऱ्या गरुडांप्रमाणे ते झेप घेतात;

  9. हबक्कूक १:९सुमारे इ.स.पू. ६२६

    हिंसाचार करण्याच्या योजनेनेच ते सर्व येतात, वाळवंटातील वावटळीप्रमाणे त्यांची टोळी येते आणि वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात.

  10. हबक्कूक १:१०सुमारे इ.स.पू. ६२६

    ते राजांचा उपहास करतात आणि अधिपतींची चेष्टा करतात. त्यांच्या सर्व तटबंदीच्या नगरांचे हंसे करतात; ते मातीचे ढिगारे उभे करून किल्ले काबीज करतात.

  11. हबक्कूक १:११सुमारे इ.स.पू. ६२६

    वार्‍याप्रमाणे ते झपाट्याने येतात आणि पुढे निघून जातात— ते अपराधी लोक, ज्यांचे सामर्थ्य त्यांच्या दैवतांपासून आहे.”

  12. हबक्कूक १:१२सुमारे इ.स.पू. ६२६

    हे याहवेह, तुम्ही अनादिकालापासून नाही का? माझ्या परमेश्वरा, माझ्या पवित्र परमेश्वरा, तुम्हाला कधीही मृत्यू येणार नाही. हे याहवेह, तुम्ही आमचा न्याय करण्यासाठी त्यांना निवडले आहे; आमच्या आश्रयाच्या खडका, तुम्ही शिक्षा देण्यासाठीच यांना नियुक्त केले आहे.

  13. हबक्कूक १:१३सुमारे इ.स.पू. ६२६

    तुमची दृष्टी इतकी पवित्र आहे की ती कोणतीही दुष्टता पाहू शकत नाही; तुम्ही कोणत्याही स्वरुपातील पातक सहन करू शकत नाही. मग या विश्वासघातकी लोकांना तुम्ही कसे सहन करता? जेव्हा दुष्ट लोक त्यांच्याहून नीतिमान लोकांना गिळंकृत करतात, तेव्हा तुम्ही स्तब्ध कसे राहता?

  14. हबक्कूक १:१४सुमारे इ.स.पू. ६२६

    तुम्ही लोकांना समुद्रातील माशाप्रमाणे बनविले आहे, जसे काही समुद्री जीव, ज्यांचा कोणी शासक नसतो.

  15. हबक्कूक १:१५सुमारे इ.स.पू. ६२६

    दुष्ट शत्रू गळ टाकतो व त्यांना वर ओढतो, तो त्यांना जाळ्यात पकडतो, मग तो त्यांना त्याच्या अडणीजाळ्यात जमा करतो, आणि तो आनंदित व उल्हासित होतो.

  16. हबक्कूक १:१६सुमारे इ.स.पू. ६२६

    म्हणून तो आपल्या जाळ्यास अर्पणे वाहतो व अडणीजाळ्यापुढे धूप जाळतो, कारण त्याच्या जाळ्यामुळेच तो धनवान होतो आणि आपल्या मनपसंद भोजनाचा आस्वाद घेतो.

  17. हबक्कूक १:१७सुमारे इ.स.पू. ६२६

    तो सर्वकाळ असेच जाळे रिकामे करीत राहणार आहे काय, निर्दयीपणे देशांना नष्ट करीत राहणार आहे काय?

  18. हबक्कूक २:१सुमारे इ.स.पू. ६२६

    मी पहारा देण्यासाठी उभा राहीन आणि टेहळणीच्या बुरुजावर चढेन; मी बघेन व ते मला काय उत्तर देतात हे पाहेन आणि या तक्रारीला मी काय उत्तर द्यावे ते पाहेन.

  19. हबक्कूक २:२सुमारे इ.स.पू. ६२६

    तेव्हा याहवेहने उत्तर दिले: “हे प्रगटीकरण लिही आणि सरळ स्वरुपात एका फळ्यावर लिही म्हणजे घोषणा करणारा धावतांनाही वाचू शकेल.

  20. हबक्कूक २:३सुमारे इ.स.पू. ६२६

    कारण प्रगटीकरण त्याच्या नियोजित वेळेची वाट पाहते; ते अंत समयाबद्धल बोलते आणि ते खोटे ठरत नाही. जरी ते विलंबित होते, तरी त्याची वाट पाहा; ते निश्चितच येईल आणि त्याला उशीर होणार नाही.

  21. हबक्कूक २:४सुमारे इ.स.पू. ६२६

    “बघ, शत्रू फुशारक्या मारत आहे; त्याच्या इच्छा दुष्ट आहेत— पण नीतिमान व्यक्ती त्याच्या विश्वासयोग्यतेमुळे जगेल.

  22. हबक्कूक २:५सुमारे इ.स.पू. ६२६

    खरोखर, मद्य त्यांचा घात करते; तो उन्मत्त आहे व त्याला कधीही चैन पडत नाही. कारण तो कबरेसारखा लोभी आहे आणि मृत्यूप्रमाणे तो कधीही समाधानी होत नाही, तो अनेक राष्ट्रे गोळा करीत आहे, आणि सर्व लोकांना बंदिवान करीत आहे.

  23. हबक्कूक २:६सुमारे इ.स.पू. ६२६

    “ते सगळे त्याचा उपहास व अपमान करून टोमणा मारून म्हणणार नाहीत काय, “ ‘जो चोरीच्या सामानाचे ढीग लावतो आणि अवैध कामे करून स्वतःला धनवान बनवितो, त्याचा धिक्कार असो! हे असे केव्हापर्यंत चालत राहणार?’

  24. हबक्कूक २:७सुमारे इ.स.पू. ६२६

    तुमचे कर्जदाते अचानक तुमच्यापुढे येणार नाहीत काय? ते उठून तुमचा थरकाप करणार नाहीत काय? मग तुम्ही त्यांचे सावज बनाल.

  25. हबक्कूक २:८सुमारे इ.स.पू. ६२६

    कारण तुम्ही पुष्कळ राष्ट्रांची लूट केली आहे, मग जे राहिलेले लोक आहेत, ते तुमची लूट करतील. तुम्ही मनुष्यांचे रक्त वाहिले आहे; तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला.