मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मीखाह १:१सुमारे इ.स.पू. ७५०

    यहूदीयाचे राजे योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या कारकिर्दीत, मोरेशेथचा रहिवासी मीखाहला याहवेहचा संदेश आला—त्याने शोमरोन आणि यरुशलेमबद्दल दृष्टान्तात पाहिला.

  2. मीखाह १:२सुमारे इ.स.पू. ७५०

    सर्व लोकहो, तुम्ही सर्वजण, ऐका, पृथ्वी आणि जे सर्व त्यामध्ये राहतात, लक्ष द्या, सार्वभौम याहवेह परमेश्वर, त्यांच्या पवित्र मंदिरातून, तुमच्याविरुद्ध साक्ष देतील.

  3. मीखाह १:३सुमारे इ.स.पू. ७५०

    पाहा! याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत आहेत. ते खाली उतरतात आणि पृथ्वीच्या उंच जागा तुडवितात.

  4. मीखाह १:४सुमारे इ.स.पू. ७५०

    त्यांच्या पायाखाली पर्वत वितळतात जसे अग्नीपुढे मेण, जसे पाणी उतारावरून खाली येते, तशा दऱ्या दुभंगतात.

  5. मीखाह १:५सुमारे इ.स.पू. ७५०

    हे सर्व याकोबाच्या अपराधामुळे आणि इस्राएली लोकांच्या पापाचे परिणाम आहे. याकोबाचा अपराध काय आहे? ते शोमरोन आहे की नाही? यहूदीयाचे उच्च स्थान कोणते आहे? ते यरुशलेम नाही की नाही?

  6. मीखाह १:६सुमारे इ.स.पू. ७५०

    “म्हणून मी शोमरोनला मातीचा ढिगारा, द्राक्षमळे लावण्याची जागा करेन. मी तिचे दगड खोऱ्यात टाकेन आणि तिचा पाया उघडा करेन.

  7. मीखाह १:७सुमारे इ.स.पू. ७५०

    तिच्या सर्व मूर्ती फोडून तुकडे करण्यात येतील; तिच्या मंदिरातील सर्व भेटवस्तू अग्नीत भस्म होतील; मी तिच्या सर्व प्रतिमा नष्ट करेन. कारण तिने आपल्या भेटवस्तू वेश्याव्यवसाय करून मिळवल्या आहेत, आणि त्या पुन्हा वेश्यावृत्तीची मजुरी म्हणून वापरली जाईल.”

  8. मीखाह १:८सुमारे इ.स.पू. ७५०

    म्हणून मी शोक व आक्रंदन करेन; मी अनवाणी व वस्त्रहीन फिरेन. कोल्ह्यासारखा मी आक्रोश करेन; आणि घुबडाप्रमाणे विव्हळेन.

  9. मीखाह १:९सुमारे इ.स.पू. ७५०

    कारण शोमरोनची पीडा असाध्य आहे; ती यहूदीयामध्ये पसरली आहे. ती माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत पोहोचली आहे, ती यरुशलेमपर्यंतही पोहोचली आहे.

  10. मीखाह १:१०सुमारे इ.स.पू. ७५०

    गथ मध्ये ही बातमी देऊ नका; अजिबात रडू नका. बेथ‑ले‑अफ्राह मध्ये जाऊन धुळीत लोळ.

  11. मीखाह १:११सुमारे इ.स.पू. ७५०

    शाफीर मध्ये राहणारे तुम्ही वस्त्रहीन आणि निर्लज्जपणे निघून जा. जे झानन मध्ये राहतात ते बाहेर जाणार नाहीत. बेथ‑एसल विलाप करीत आहे; ते तुम्हाला यापुढे संरक्षण देऊ शकत नाही.

  12. मीखाह १:१२सुमारे इ.स.पू. ७५०

    मारोथ मध्ये राहणारे लोक वेदनांनी रडत आहेत, आणि मदतीची वाट पाहत आहेत, कारण यरुशलेमच्या प्रवेशद्वारापर्यंत पीडा याहवेहने पाठविलेली आहे.

  13. मीखाह १:१३सुमारे इ.स.पू. ७५०

    लाखीशमध्ये राहणार्‍यांनो, वेगवान घोडे रथाला जुंपा. तुझ्यापासून सीयोनच्या कन्येचे पाप सुरू झाले, कारण तुझ्यामध्ये इस्राएलचे अपराध आढळून आले.

  14. मीखाह १:१४सुमारे इ.स.पू. ७५०

    त्यामुळे तू मोरेशेथ-गथला निरोपाची भेट देशील. अकजीब चे रहिवासी इस्राएलच्या राजांना फसविणारी ठरतील.

  15. मीखाह १:१५सुमारे इ.स.पू. ७५०

    मारेशाहच्या रहिवाशांनो, मी तुमच्यावर विजय मिळविणारा पाठवेन. इस्राएलचे प्रतिष्ठित लोक अदुल्लामला पळून जातील.

  16. मीखाह १:१६सुमारे इ.स.पू. ७५०

    ज्या मुलांमध्ये तुम्ही आनंदी आहात त्यांच्यासाठी शोक करताना आपले डोके मुंडण करा; गिधाडासारखे तुमच्या डोक्याचे मुंडण करा, कारण ते तुमच्यापासून गुलाम म्हणून जातील.

  17. मीखाह २:१सुमारे इ.स.पू. ७३०

    जे वाईट कृत्याची योजना करतात, जे आपल्या अंथरुणावर कट रचतात, त्यांचा धिक्कार असो! पहाट होताच ते त्यांचा कट पूर्ण करतात कारण हे सामर्थ्य त्यांच्या हातात असते.

  18. मीखाह २:२सुमारे इ.स.पू. ७३०

    ते लोभीपणाने इतरांची शेते बळकावतात, दुसऱ्यांची घरेही हिसकावून घेतात. ते कपटाने लोकांची घरे बळकावतात आणि त्यांच्या पूर्वजांची संपत्ती लुटतात.

  19. मीखाह २:३सुमारे इ.स.पू. ७३०

    म्हणून याहवेह म्हणतात: “मी या लोकांविरुद्ध विपत्ती योजत आहे, ज्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. तुम्ही पुन्हा कधीही गर्वाने चालणार नाही, कारण तो आपत्तीचा काळ असेल.

  20. मीखाह २:४सुमारे इ.स.पू. ७३०

    त्या दिवशी लोकांकरिता तुम्ही चेष्टेचा विषय व्हाल; ते तुम्हाला या विलाप गीताने टोमणे मारतील: ‘आमचा संपूर्ण नाश झाला आहे; माझ्या लोकांच्या मालमत्तेची विभागणी झाली आहे. ते ती माझ्यापासून काढून घेतात! ते आमची शेते बंडखोरांना देतात.’ ”

  21. मीखाह २:५सुमारे इ.स.पू. ७३०

    म्हणून याहवेहच्या सभेत चिठ्ठ्या टाकून सूत्राने जमिनीची वाटणी करण्यास तुमच्याकडे कोणी राहणार नाही.

  22. मीखाह २:६सुमारे इ.स.पू. ७३०

    त्यांचे संदेष्टे म्हणतात, “संदेश देऊ नका, या गोष्टींबद्दल संदेश देऊ नका; आमच्यावर अप्रतिष्ठा येणार नाही.”

  23. मीखाह २:७सुमारे इ.स.पू. ७३०

    हे याकोबाच्या घराण्या, “असे म्हटले जावे काय, याहवेह अधीर होतात काय? ते अशी कामे करतात काय? “ज्याचे मार्ग सरळ आहेत त्याचे माझे शब्द भले करत नाहीत काय?

  24. मीखाह २:८सुमारे इ.स.पू. ७३०

    अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले आहेत. जे लोक निष्काळजीपणे जवळून जातात त्यांचे किमती कपडे तुम्ही काढून घेता, जसे युद्धातून परत येणारे पुरुष करतात.

  25. मीखाह २:९सुमारे इ.स.पू. ७३०

    तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या सुखी घरातून हाकलून देतात. तुम्ही त्यांच्या मुलांकडून माझे आशीर्वाद कायमचे हिरावून घेता.