मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह १:१सुमारे इ.स.पू. ६२९

    बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील याजकांपैकी हिल्कियाहचा पुत्र यिर्मयाहचे वचन.

  2. यिर्मयाह १:२सुमारे इ.स.पू. ६२९

    यहूदीयाचा राजा आमोनाचा पुत्र योशीयाह, याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षी याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले,

  3. यिर्मयाह १:३सुमारे इ.स.पू. ६२९

    आणि यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र यहोयाकीम, याच्या राजवटीपासून आणि यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याच्या राजवटीच्या अकराव्या वर्षाच्या पाचवा महिना संपला, जेव्हा यरुशलेममधील लोक बंदिवान करून नेण्यात आले तेव्हा.

  4. यिर्मयाह १:४सुमारे इ.स.पू. ६२९

    याहवेहचे वचन मला मिळाले ते असे,

  5. यिर्मयाह १:५सुमारे इ.स.पू. ६२९

    “मी तुला गर्भाशयात घडविण्याच्या पूर्वीपासून ओळखतो, तुझा जन्म होण्यापूर्वीच मी तुला समर्पित केले आहे; आणि राष्ट्रांकरिता माझा संदेष्टा म्हणून तुझी नेमणूक केली आहे.”

  6. यिर्मयाह १:६सुमारे इ.स.पू. ६२९

    मी म्हटले, “अहो सार्वभौम याहवेह, पाहा, मला तर बोलताही येत नाही; मी केवळ एक कोवळा तरुण आहे.”

  7. यिर्मयाह १:७सुमारे इ.स.पू. ६२९

    परंतु याहवेह मला म्हणाले, “ ‘मी कोवळा तरुण आहे,’ असे म्हणू नकोस. मी तुला जिथे पाठवेन, तिथे तुला जावे लागेल आणि मी जे तुला सांगेन, ते तुला बोलावे लागेल.

  8. यिर्मयाह १:८सुमारे इ.स.पू. ६२९

    त्यांना भिऊ नकोस, मी तुला संकटातून सोडविण्यासाठी तुझ्यासह आहे,” याहवेह असे जाहीर करीत आहेत.

  9. यिर्मयाह १:९सुमारे इ.स.पू. ६२९

    तेव्हा याहवेहने माझ्या मुखाला त्यांच्या हातांनी स्पर्श केला आणि मला म्हटले, “माझे वचन मी तुझ्या मुखात टाकले आहे.

  10. यिर्मयाह १:१०सुमारे इ.स.पू. ६२९

    पाहा, आज मी तुझी काही राष्ट्रे आणि राज्ये उपटून टाकण्यासाठी, काहींचा नाश करण्यासाठी, तर काहींची स्थापना, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी त्यांच्यावर तुझी नेमणूक करीत आहे.”

  11. यिर्मयाह १:११सुमारे इ.स.पू. ६२९

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “यिर्मयाह, तुला काय दिसते?” तेव्हा मी उत्तर दिले, “मला बदाम वृक्षाची फांदी दिसते.”

  12. यिर्मयाह १:१२सुमारे इ.स.पू. ६२९

    याहवेहनी मला म्हटले, “तुला योग्य दिसले, अगदी बरोबर सांगितलेस, मी आपले वचन पूर्ण झालेले पाहत आहे.”

  13. यिर्मयाह १:१३सुमारे इ.स.पू. ६२९

    याहवेहचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले: “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला उकळत्या पाण्याचे एक भांडे दिसत आहे. ते उत्तरेकडून आमच्या दिशेने तिरपे झालेले आहे.”

  14. यिर्मयाह १:१४सुमारे इ.स.पू. ६२९

    याहवेह मला म्हणाले, “या राष्ट्रात राहणाऱ्या लोकांवर उत्तरेकडून संकट येऊन पडेल.

  15. यिर्मयाह १:१५सुमारे इ.स.पू. ६२९

    मी उत्तरेकडील राष्ट्रांच्या सर्व लोकांना आवाहन केले आहे,” असे याहवेह जाहीर करतात. “त्यांचे राजे येतील व त्यांची सिंहासने यरुशलेमच्या प्रवेश व्दारावर स्थापतील. ते तटाच्या सर्व बाजूला व यहूदीयाच्या सर्व नगरांविरुद्ध येतील.

  16. यिर्मयाह १:१६सुमारे इ.स.पू. ६२९

    मी माझ्या लोकांविरुद्ध माझ्या न्यायाची घोषणा करेन, कारण त्यांनी माझा त्याग करण्याचे वाईट कृत्य केले आहे. इतर दैवतांच्या मूर्तीला धूप जाळला व स्वतःच्या हस्तकृतींची पूजा केली आहे.

  17. यिर्मयाह १:१७सुमारे इ.स.पू. ६२९

    “तू स्वतःला तयार कर! उठून जा आणि मी तुला सांगतो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस, नाहीतर त्यांच्यासमोर मी तुला भयभीत करेन.

  18. यिर्मयाह १:१८सुमारे इ.स.पू. ६२९

    आज मी तुला तटबंदीचे नगर केले आहे, या संपूर्ण राष्ट्राविरुद्ध उभे राहण्यासाठी लोहस्तंभासारखे व भक्कम कास्य दरवाजांसारखे केले आहे—यहूदीयाचे राजे, त्यांचे अधिकारी, याजक आणि लोक या सर्वांविरुद्धच.

  19. यिर्मयाह १:१९सुमारे इ.स.पू. ६२९

    ते तुझ्याशी युद्ध करतील, परंतु तुझ्यावर विजयी होणार नाही, कारण मी तुझ्यासह आहे आणि तुझा बचाव करेन,” असे याहवेह म्हणतात.

  20. यिर्मयाह २:१सुमारे इ.स.पू. ६२९

    तेव्हा याहवेहचे वचन मला प्राप्त झाले:

  21. यिर्मयाह २:२सुमारे इ.स.पू. ६२९

    “जा आणि यरुशलेमच्या लोकांस याची घोषणा कर: “याहवेह असे म्हणतात: “ ‘मला आठवण आहे, मला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एखाद्या नववधूप्रमाणे मजवर कशी प्रीती केली. आणि रानात व पेरणीरहित भूमीत देखील मला अनुसरला.

  22. यिर्मयाह २:३सुमारे इ.स.पू. ६२९

    इस्राएल हे याहवेहकरिता पवित्र होते; त्यांच्या हंगामाचे प्रथमफळ होते. ज्यांनी त्यांचा नाश केला, त्यांच्यावर दोष लावण्यात आला आणि घोर आपत्तीने त्यांना गाठले,’ ” असे याहवेह जाहीर करतात.

  23. यिर्मयाह २:४सुमारे इ.स.पू. ६२९

    याकोबाचे वंशजा, याहवेहचे वचन ऐका, सर्व इस्राएली कुळांनो तुम्ही सुद्धा.

  24. यिर्मयाह २:५सुमारे इ.स.पू. ६२९

    याहवेह असे म्हणतात: “तुमच्या पूर्वजांना माझ्याठायी असा कोणता अन्याय दिसला की ते माझ्यापासून इतके दूर गेले? आणि ते व्यर्थ मूर्तींना अनुसरू लागले, आणि स्वतःही तसेच निरुपयोगी बनले?

  25. यिर्मयाह २:६सुमारे इ.स.पू. ६२९

    त्यांनी असे विचारले नाही, ‘ज्यांनी आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले आणि वैराण प्रदेशातून मार्गस्थ केले, वाळवंटातून व दऱ्याखोऱ्यातून नेले, निर्जल आणि गडद अंधकाराच्या भूमीतून नेले, ज्या प्रदेशातून कोणीही प्रवास करीत नाही व जिथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हाला नेले, ते याहवेह कुठे आहेत?’