- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- नहूम १:१सुमारे इ.स.पू. ७१३
निनवेहविषयी भविष्यवाणी. एल्कोशवासी नहूमच्या दृष्टान्ताचे पुस्तक.
- नहूम १:२सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेह ईर्ष्यावान व सूड घेणारे परमेश्वर आहेत; याहवेह सूड घेणारे आणि क्रोधाने भरलेले आहेत. त्यांच्या शत्रूंचा ते सूड घेतात आणि आपला कोप त्यांच्याविरुद्ध मोकळा करतात.
- नहूम १:३सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेह मंदक्रोध आहेत, पण अत्यंत सामर्थ्यशाली आहेत; याहवेह दुष्टांना शिक्षा दिल्याशिवाय सोडत नाही. त्यांचे मार्ग चक्रीवादळ व वादळामधून जातात. ढग त्यांच्या पायाखालची धूळ आहेत.
- नहूम १:४सुमारे इ.स.पू. ७१३
ते समुद्रास फटकारतात आणि तो शुष्क होतो; ते सर्व नद्यांना कोरडे करतात. बाशान व कर्मेल मलूल होतात; लबानोनचा मोहोर कोमेजतो.
- नहूम १:५सुमारे इ.स.पू. ७१३
त्यांच्यासमोर पर्वत कंपित होतात व टेकड्या विरघळतात. पृथ्वी आणि जग व त्यात राहणारे सर्वजण त्यांच्या समक्षतेत थरकापतात.
- नहूम १:६सुमारे इ.स.पू. ७१३
संतप्त याहवेहपुढे कोणाचा निभाव लागेल? त्यांचा क्रोध कोण सहन करू शकेल? त्यांचा उग्र क्रोध अग्नीसारखा ओतला जातो; त्यांच्यापुढे खडक ढासळून पडतात.
- नहूम १:७सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेह चांगले आहेत, संकटसमयी आश्रयस्थान आहेत. त्यांच्यावर भरवसा ठेवणार्या प्रत्येकाची ते काळजी घेतात.
- नहूम १:८सुमारे इ.स.पू. ७१३
परंतु भयंकर महापुराने ते निनवेहचा अंत करतील; त्यांच्या शत्रूचा ते अंधकाराच्या साम्राज्यातही पाठलाग करतात.
- नहूम १:९सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेहच्या विरुद्ध ते जे काही कारस्थान करतात त्याचा ते अंत करतील; ते संकट दुसऱ्यांदा येणार नाही.
- नहूम १:१०सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेहचे शत्रू काटेरी झुडूपात गुंतून पडतील आणि स्वतःचेच मद्य पिऊन ते धुंद होतील; वाळलेल्या गवताप्रमाणे ते अग्नीमध्ये भस्म होतील.
- नहूम १:११सुमारे इ.स.पू. ७१३
हे निनवेह, तुमच्यापैकी कोण आहे जो याहवेहविरुद्ध कट रचेल आणि दुष्ट योजना करू शकेल?
- नहूम १:१२सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेह असे म्हणतात: “यद्यपि त्यांना अनेक दोस्त राष्ट्र आहेत व ते असंख्य आहेत, तरी ते नष्ट होतील व त्यांचे अस्तित्व नाहीसे होईल. हे यहूदाह, मी जरी तुला पीडित केले, तरी आता मी तुला पीडा देणार नाही.
- नहूम १:१३सुमारे इ.स.पू. ७१३
आता मी तुमच्या मानेवरील जू मोडून टाकीन आणि तुमच्या शृंखला तोडून टाकीन.”
- नहूम १:१४सुमारे इ.स.पू. ७१३
हे निनवेह, याहवेहने तुझ्याविषयी आज्ञा दिली आहे: “तुझे नाव पुढे चालविणारी कोणीही संतती राहणार नाही. आणि जी तुझ्या दैवताच्या मंदिरात आहेत ती तुझी दैवते आणि मूर्ती मी नष्ट करेन. मी तुझी कबर तयार करेन, कारण तू तिरस्करणीय आहेस.”
- नहूम १:१५सुमारे इ.स.पू. ७१३
पाहा, पर्वतांवरून संदेशवाहक येत आहेत, ज्यांची पावले एक शुभवार्ता आणत आहेत, जे शांतीची घोषणा करतात! हे यहूदाह, तू तुझे सण साजरे कर, आणि तुझे नवस फेड. कारण आता कोणी दुष्ट लोक तुझ्यावर आक्रमण करणार नाहीत; त्यांचा कायमचा उच्छेद होईल.
- नहूम २:१सुमारे इ.स.पू. ७१३
हे निनवेह, एक आक्रमक तुझ्याविरुद्ध येत आहे. आपल्या गडांवर पहारा दे, मार्गांची रखवाली कर, मोर्चा बांध, आपल्या सर्व शक्तिनिशी सैन्यांची संरक्षक फळी मजबूत कर!
- नहूम २:२सुमारे इ.स.पू. ७१३
जरी संहारकाने तो देश उद्ध्वस्त केला आहे आणि त्यांचे द्राक्षमळे नष्ट केले आहेत तरी, इस्राएलच्या वैभवासारखे याहवेह याकोबाचे वैभव पुनर्स्थापित करणार आहेत.
- नहूम २:३सुमारे इ.स.पू. ७१३
ज्या दिवसाची त्यांनी तयारी केली आहे; त्या दिवसासाठी रथांवरील धातू चकाकत आहेत, सैनिकांच्या ढाली तांबड्या आहेत; योद्धे किरमिजी पेहराव केलेले आहेत सनोवरचे भाले परजलेले आहेत.
- नहूम २:४सुमारे इ.स.पू. ७१३
रथही मार्गांवरून बेफामपणे धावत आहेत, चौकातून झपाट्याने मागेपुढे होत आहेत. ते प्रज्वलित मशालीप्रमाणे दिसत आहेत; ते वीजगतीने दौडत आहेत.
- नहूम २:५सुमारे इ.स.पू. ७१३
निनवेहने आपल्या निवडक सैनिकांना पाचारण केले आहे, तरी ते आपल्या मार्गांवर अडखळत आहेत. ते तटाच्या भिंतीकडे धाव घेतात; संरक्षक ढाल नियोजित ठिकाणी ठेवलेली आहे.
- नहूम २:६सुमारे इ.स.पू. ७१३
नदीकडचे दरवाजे सताड उघडले गेले आहेत आणि राजवाडे ढासळत आहेत.
- नहूम २:७सुमारे इ.स.पू. ७१३
अशी राजाज्ञा सुनावण्यात आली आहे, की निनवेहला बंदिवासात टाकून नेण्यात यावे. तिच्या दासी पारव्यांच्या घुमण्याप्रमाणे विलाप करीत आहेत आणि त्यांचे ऊर बडवित आहेत.
- नहूम २:८सुमारे इ.स.पू. ७१३
निनवेह एखाद्या जलाशयाप्रमाणे आहे जिचे पाणी गळून चालले आहे. “थांबा, थांबा,” ते ओरडतात, पण कोणीही वळून तिच्याकडे परत येत नाही.
- नहूम २:९सुमारे इ.स.पू. ७१३
चांदी लुटा! सोने लुटा! निनवेहची संपत्ती येथील मौल्यवान वस्तूंचा अमर्याद संग्रह आहे!
- नहूम २:१०सुमारे इ.स.पू. ७१३
ती लुटल्या गेली, लुबाडल्या गेली व विवस्त्र करण्यात आली आहे! तिच्या लोकांची अंतःकरणे वितळून गेली आहेत व गुडघे निकामी झाले आहेत, त्यांची शरीरे थरथर कापत आहेत व त्यांचे चेहरे फिके पडले आहेत.