- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- सफन्याह १:१सुमारे इ.स.पू. ६३०
सफन्याहला, जो कूशीचा पुत्र, जो गदल्याहचा पुत्र, जो अमर्याहचा पुत्र, जो हिज्कीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा योशीयाह, जो आमोनचा पुत्र होता, याच्या कारकिर्दीत याहवेहकडून आलेले वचन ते असे:
- सफन्याह १:२सुमारे इ.स.पू. ६३०
“मी पृथ्वीतलावरून सर्वकाही झटकून नाहीसे करेन.” असे याहवेह जाहीर करतात.
- सफन्याह १:३सुमारे इ.स.पू. ६३०
“मी माणसे आणि जनावरे दोन्हीही नष्ट करेन; मी आकाशातील पक्षी नष्ट करेन आणि समुद्रातील मासेही— त्या मूर्ती ज्या दुष्टाच्या अडखळण्याचे कारण बनते.” याहवेह जाहीर करतात, “जेव्हा मी पृथ्वीवरून सर्व मानवजातीला नष्ट करेन,
- सफन्याह १:४सुमारे इ.स.पू. ६३०
तेव्हा मी यहूदीयातील आणि यरुशलेम येथील सर्व रहिवाशांच्या विरुद्ध माझा हात उगारेन. या ठिकाणावरील बआलच्या सर्व शेष उपासकांचा मी नाश करेन प्रत्येक मूर्तिपूजक पुजार्यांच्या नावाचा—
- सफन्याह १:५सुमारे इ.स.पू. ६३०
जे त्यांच्या घरांच्या धाब्यांवर जातात आणि आकाशातील नक्षत्रांना नमन करतात. जे याहवेहला नमन करून त्यांची शपथ घेतात, आणि मोलेख दैवताचीही शपथ घेतात,
- सफन्याह १:६सुमारे इ.स.पू. ६३०
जे याहवेहचे अनुसरण करण्यापासून मागे फिरले आहेत आणि जे याहवेहचा शोध घेत नाहीत वा त्यांची इच्छा जाणून घेत नाहीत.”
- सफन्याह १:७सुमारे इ.स.पू. ६३०
सार्वभौम याहवेहपुढे स्तब्ध राहा. कारण त्यांच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे; याहवेहने अर्पण सिद्ध केले आहे; ज्यांना त्यांनी आमंत्रित केले, त्यांचे पवित्रीकरण केले आहे.
- सफन्याह १:८सुमारे इ.स.पू. ६३०
याहवेहच्या अर्पणाच्या दिवशी मी अधिपतींना आणि राजपुत्रांना आणि परकीय वस्त्रे परिधान करणार्या सर्वांना शिक्षा करेन.
- सफन्याह १:९सुमारे इ.स.पू. ६३०
त्या दिवशी या सर्वांना शिक्षा करेन जे उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याचे टाळतात जे त्यांच्या दैवतांची मंदिरे हिंसाचार व लबाडीने भरतात.
- सफन्याह १:१०सुमारे इ.स.पू. ६३०
याहवेह जाहीर करतात, “त्या दिवशी मत्स्य वेशीपासून एक मोठी आरोळी ऐकू जाईल, नगरातील नव्या विभागातून विलापाचा ध्वनी, आणि डोंगरातून मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू येईल;
- सफन्याह १:११सुमारे इ.स.पू. ६३०
विलाप करा, तुम्ही जे मक्तेशातील व्यापारी भागात राहता, तुमचे सर्व व्यापारी, सोन्याचांदीचा व्यवहार करणारे सर्वजण नष्ट होतील.
- सफन्याह १:१२सुमारे इ.स.पू. ६३०
त्या समयी मी दिवा घेऊन यरुशलेममध्ये शोधेन आणि जे बेफिकीर असतात, जे पखालीत सोडलेल्या द्राक्षारसाच्या गाळासारखे आहेत, जे विचार करतात की याहवेह आपले बरे किंवा वाईट असे काहीही करणार नाहीत, अशांना शिक्षा करेन.
- सफन्याह १:१३सुमारे इ.स.पू. ६३०
या लोकांची मालमत्ता लुटली जाईल, यांचीच घरे ढासाळून टाकली जातील, जरी त्यांनी घरे बांधली असतील, त्या घरात ते राहू शकणार नाहीत; जरी त्यांनी द्राक्षमळा लावला असेल, द्राक्षांचा रस ते पिणार नाहीत.”
- सफन्याह १:१४सुमारे इ.स.पू. ६३०
याहवेहचा तो भयावह दिवस जवळ— तो वेगाने अगदी जवळ येत आहे. याहवेहच्या दिवसाची गर्जना मर्मभेदक आहे; सामर्थ्यशाली योद्धे त्याची रणगर्जना करतील.
- सफन्याह १:१५सुमारे इ.स.पू. ६३०
तो दिवस क्रोधाग्नीचा दिवस असेल— तो दिवस दुःखाचा व क्लेशाचा, तो दिवस अरिष्ट व उजाडतेचा, तो दिवस अंधकाराचा व उदासीनतेचा, तो दिवस अभ्रांचा व निबिड काळोखाचा—
- सफन्याह १:१६सुमारे इ.स.पू. ६३०
तो दिवस तटबंदीच्या नगरांविरुद्ध आणि कोपऱ्यातील बुरुजा विरुद्ध रणशिंगाचा व रणगर्जनांच्या निनादांचा असेल.
- सफन्याह १:१७सुमारे इ.स.पू. ६३०
“मी सर्व लोकांवर अशा विपत्ती आणेन, ते मार्ग शोधणार्या एखाद्या आंधळ्या माणसाप्रमाणे चाचपडतील, कारण त्यांनी याहवेहविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल व त्यांच्या आतड्या शेणासारख्या विखुरतील.
- सफन्याह १:१८सुमारे इ.स.पू. ६३०
त्यांचे सोने किंवा त्यांची चांदी त्यांना याहवेहच्या क्रोधापासून वाचवू शकणार नाही.” त्यांच्या ईर्षेच्या अग्नीने संपूर्ण पृथ्वी भस्म होईल, कारण जे सर्व पृथ्वीवर रहिवास करतात त्यांचा ते अकस्मातपणे अंत करतील.
- सफन्याह २:१सुमारे इ.स.पू. ६३०
हे निर्लज्ज राष्ट्रा एकत्र ये, स्वतःला एकवटून घे,
- सफन्याह २:२सुमारे इ.स.पू. ६३०
फर्मानाचा प्रभाव सुरू होण्याआधी आणि तो दिवस वाऱ्याने उडालेल्या भुशासारखा उडून जाण्यापूर्वी, याहवेहचा भयंकर संताप तुझ्यावर कोसळण्यापूर्वी, याहवेहच्या भयानक क्रोधाचा दिवस, तुझ्यावर कोसळण्यापूर्वी एकत्र ये.
- सफन्याह २:३सुमारे इ.स.पू. ६३०
या देशातील नम्रजन हो, याहवेहचा ध्यास करा, तुम्ही जे त्यांच्या आज्ञा पाळता. धार्मिकतेचा ध्यास करा, नम्रतेचा ध्यास करा; याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी कदाचित तुम्हाला आश्रयस्थान मिळेल.
- सफन्याह २:४सुमारे इ.स.पू. ६३०
गाझाचा त्याग करण्यात येईल आणि अष्कलोन ओसाड पडेल. भर दुपारी अश्दोद नगर रिकामे होईल आणि एक्रोन समूळ उपटले जाईल.
- सफन्याह २:५सुमारे इ.स.पू. ६३०
हे करेथीयाच्या लोकांनो, समुद्र किनार्यावरील रहिवाशांनो तुम्हाला धिक्कार असो; कनान देशात राहणार्या पलिष्टी लोकांनो, याहवेहचे वचन तुमच्याविरुद्ध आहे. ते म्हणतात, “मी तुमचा असा नाश करेन, की तुमच्यातील कोणीही वाचणार नाही.”
- सफन्याह २:६सुमारे इ.स.पू. ६३०
समुद्रकिनाऱ्याची भूमी एक कुरण बनेल मेंढपाळांसाठी विहिरी असलेले स्थान व मेंढरांसाठी मेंढवाड्याचे ठिकाण होईल.
- सफन्याह २:७सुमारे इ.स.पू. ६३०
ती भूमी यहूदीयाच्या वंशातील अवशेषाचे वतन होईल; तिथे त्यांची कुरणे असतील. संध्याकाळी ते अष्कलोन येथील घरात विश्रांती घेतील. याहवेह, त्यांचे परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतील; त्यांचे पूर्वीचे वैभव त्यांना परत प्राप्त करून देतील.