- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह २९:१२सुमारे इ.स.पू. ७१२
किंवा ज्याला वाचता येत नाही अशा कोणाला तुम्ही ही गुंडाळी दिली आणि म्हणाले, “कृपया हे वाचा,” ते उत्तर देतील, “मला कसे वाचायचे ते माहीत नाही.”
- यशायाह २९:१३सुमारे इ.स.पू. ७१२
प्रभू असे म्हणतात: “हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.
- यशायाह २९:१४सुमारे इ.स.पू. ७१२
म्हणून मी पुन्हा एकदा या लोकांना विस्मित करेन. चमत्कारानंतर चमत्कार करून; ज्ञानी लोकांचे ज्ञान नष्ट होईल, बुद्धिमानाची बुद्धी नाहीशी होईल.”
- यशायाह २९:१५सुमारे इ.स.पू. ७१२
धिक्कार असो, जे त्यांच्या योजना याहवेहपासून लपविण्यासाठी खूप खोलवर जातात, जे त्यांची कार्ये अंधारात करतात आणि असा विचार करतात, “आम्हाला कोण पाहतो? हे कोणाला माहीत होईल?”
- यशायाह २९:१६सुमारे इ.स.पू. ७१२
तुम्ही गोष्टी उलटवून टाकता, जणू कुंभार हा मातीसारखा असेल! ज्याला आकार दिला, तो आकार देणाऱ्याला असे म्हणेल का, “तू माझी रचना केली नाहीस?” मडके कुंभाराला म्हणू शकते का, “तुला काहीच माहीत नाही?”
- यशायाह २९:१७सुमारे इ.स.पू. ७१२
लबानोनचा थोड्याच वेळात सुपीक भूमीत बदल होणार नाही का, आणि सुपीक भूमी जंगलासारखी होणार नाही का?
- यशायाह २९:१८सुमारे इ.स.पू. ७१२
त्या दिवशी गुंडाळीतील शब्द बहिर्यांना ऐकू येतील आणि अंधकार व औदासिन्यतेतून अंधाचे नेत्र पाहू लागतील.
- यशायाह २९:१९सुमारे इ.स.पू. ७१२
नम्र लोक पुन्हा याहवेहच्या सानिध्यात हर्षोल्हास करतील; गरजवंत इस्राएलचे पवित्र परमेश्वराच्या सानिध्यात आनंद साजरा करतील.
- यशायाह २९:२०सुमारे इ.स.पू. ७१२
निर्दयी नाहीसे होतील, आणि उपहास करणारे दिसेनासे होतील, वाईट नजर ठेवणाऱ्याचा सर्वांचा नाश होईल—
- यशायाह २९:२१सुमारे इ.स.पू. ७१२
जे इतरांना त्यांच्या शब्दाद्वारे दोषी ठरवितात, जे रक्षकाला सापळ्यात अडकवितात, जे खोटी साक्ष देऊन निष्पाप लोकांना न्यायापासून वंचित करतात.
- यशायाह २९:२२सुमारे इ.स.पू. ७१२
म्हणूनच अब्राहामाचा उद्धार करणारे याहवेह, याकोबाच्या वंशजांना म्हणतात: “येथून पुढे याकोब लज्जित होणार नाही. येथून पुढे त्यांचे चेहरे पांढरेफटक पडणार नाहीत.
- यशायाह २९:२३सुमारे इ.स.पू. ७१२
जेव्हा ते त्यांच्यामध्ये त्यांची संतती, माझी हस्तकृती बघतील, तेव्हा ते माझे नाव पवित्र ठेवतील; ते याकोबच्या पवित्र परमेश्वराची पवित्रता स्वीकारतील आणि इस्राएलच्या परमेश्वराचा आदर करतील.
- यशायाह २९:२४सुमारे इ.स.पू. ७१२
मूर्ख आत्म्याचे लोक समंजसपणा शिकतील; आणि कुरकुरणारे शिक्षण ग्रहण करतील.”
- यशायाह ३०:१सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेह असे घोषित करतात, “दुराग्रही संततीचा धिक्कार असो, ज्या योजना माझ्या नाहीत, त्या ते पूर्ण करतात, नाते जोडतात, परंतु माझ्या आत्म्याने नाही, पापावर पापाचा ढीग रचतात;
- यशायाह ३०:२सुमारे इ.स.पू. ७१३
जे माझा सल्ला न घेता इजिप्तकडे जातात; जे आश्रयासाठी इजिप्तच्या सावलीची फारोहच्या रक्षणासाठी मदतीची अपेक्षा करतात.
- यशायाह ३०:३सुमारे इ.स.पू. ७१३
परंतु फारोहचे रक्षण तुम्हाला लज्जित करेल, इजिप्तच्या सावलीने तुमची अप्रतिष्ठा होईल.
- यशायाह ३०:४सुमारे इ.स.पू. ७१३
जरी सोअनमध्ये त्यांचे अधिकारी आहेत आणि त्यांचे दूत हानेस येथे पोहोचले आहेत,
- यशायाह ३०:५सुमारे इ.स.पू. ७१३
तरी प्रत्येकाला लज्जित करण्यात येईल कारण त्यांच्यासाठी ते निरुपयोगी लोक आहेत, जे काहीही मदत किंवा लाभ आणत नाहीत. परंतु केवळ लज्जा आणि अपमान.”
- यशायाह ३०:६सुमारे इ.स.पू. ७१३
नेगेवच्या प्राण्यांबद्दलची भविष्यवाणी: कठीण परिश्रम आणि संकटाच्या भूमीतून, सिंह आणि सिंहीण, फुरसे आणि उडणारे साप, दूत आपली संपत्ती गाढवांच्या पाठीवर, त्यांचे खजिने उंटांच्या कुबड्यांवर लादून, त्या लाभहीन राष्ट्राकडे घेऊन जातात,
- यशायाह ३०:७सुमारे इ.स.पू. ७१३
इजिप्तकडे, ज्यांनी दिलेली अभिवचने निरुपयोगी आहेत. म्हणून मी इजिप्तला निरुपयोगी राहाब म्हणतो.
- यशायाह ३०:८सुमारे इ.स.पू. ७१३
आता जा, त्यांच्यासाठी ते एका पाटीवर लिहा, चर्मपत्राच्या गुंडाळीवर ते कोरून टाका, म्हणजे येणाऱ्या दिवसात ते सर्वकाळासाठी साक्षीदार असेल.
- यशायाह ३०:९सुमारे इ.स.पू. ७१३
कारण हे बंडखोर लोक आहेत, फसवणारी मुले आहेत, याहवेहची शिकवण ऐकायला तयार नसलेली मुले.
- यशायाह ३०:१०सुमारे इ.स.पू. ७१३
दृष्टान्त पाहणाऱ्यांना ते असे म्हणतात, “यापुढे दृष्टान्त पाहू नका!” आणि संदेष्ट्यांना म्हणतात, “यापुढे काय योग्य आहे, याबद्दल आम्हाला दर्शन देऊ नका! आनंद देणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगा, भ्रामक कल्पना असलेली भविष्यवाणी करा.
- यशायाह ३०:११सुमारे इ.स.पू. ७१३
हा मार्ग सोडा, या वाटेवरून दुसरीकडे जा, आणि इस्राएलचे जे पवित्र परमेश्वर आहेत त्यांच्याबरोबर आमची समोरासमोर भेट करणे थांबवा!”
- यशायाह ३०:१२सुमारे इ.स.पू. ७१३
त्यामुळे इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात: “कारण तुम्ही हा संदेश नाकारला, जुलूम करण्यावर भरवसा ठेवला आणि कपट करण्यावर अवलंबून राहिला,