मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह २७:४सुमारे इ.स.पू. ७१२

    मी रागावलेलो नाही. परंतु जर माझ्यासमोर काटेरी झुडपे आणि काटे आले तर! मी त्यांच्यावर हल्ला करून युद्ध केले असते; मी त्या सर्वांना आग लावली असती.

  2. यशायाह २७:५सुमारे इ.स.पू. ७१२

    नाहीतर त्यांना माझ्याकडे आश्रय घेण्यासाठी येऊ द्या; त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा, होय, त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा.”

  3. यशायाह २७:६सुमारे इ.स.पू. ७१२

    येणाऱ्या दिवसात याकोब मूळ धरेल, इस्राएलला अंकुर फुटेल आणि ती बहरेल आणि सर्व जगास फळांनी भरेल.

  4. यशायाह २७:७सुमारे इ.स.पू. ७१२

    याहवेहनी तिच्यावर हल्ला केला आहे का, ज्यांनी तिच्यावर हल्ला केला, तिच्यावर याहवेहने हल्ला केला होता का? तिला मारण्यात आले आहे का, ज्यांनी तिला मारले, त्यांना मारण्यात आले आहे का?

  5. यशायाह २७:८सुमारे इ.स.पू. ७१२

    रणनीती आणि बंदिवास करून तुम्ही तिच्याबरोबर वाद घालता— जसे एखाद्या दिवशी पूर्वेचा वारा वाहतो, तसे त्यांच्या हिंसक स्फोटाने ते तिला घालवून देतात.

  6. यशायाह २७:९सुमारे इ.स.पू. ७१२

    तेव्हा याप्रकारे याकोबाच्या अपराधाचे प्रायश्चित्त होईल, आणि त्याचे पाप काढून टाकल्याचे हे पूर्ण फळ असेल: जेव्हा ते वेदीच्या सर्व दगडाचे चुनखडीसारखे चूर्ण करतील. अशेरा दैवतेचे स्तंभ किंवा धूपवेद्या तशाच उभ्या सोडतील.

  7. यशायाह २७:१०सुमारे इ.स.पू. ७१२

    तटबंदीचे शहर उजाड झाले आहे, टाकून दिलेले आवास, टाकून दिलेल्या अरण्यासारखी आहे; तिथे वासरे चरतात, तिथे ती झोपतात, ते त्याच्या फांद्या खाऊन निष्पर्ण करतात.

  8. यशायाह २७:११सुमारे इ.स.पू. ७१२

    जेव्हा झाडाच्या फांद्या वाळून शुष्क होतात व मोडतात आणि स्त्रिया येतात व ते सरपण म्हणून जाळतात. तसे हे लोक असमंजस आहेत; म्हणून त्यांना घडविणाऱ्याला त्यांची दया येत नाही आणि त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.

  9. यशायाह २७:१२सुमारे इ.स.पू. ७१२

    त्या दिवशी याहवेह वाहत्या फरात नदीपासून इजिप्तच्या खोऱ्यापर्यंत मळणी करतील आणि तुम्ही, इस्राएल एकएक करून गोळा केले जाल.

  10. यशायाह २७:१३सुमारे इ.स.पू. ७१२

    आणि त्या दिवशी मोठा कर्णा वाजू लागेल. ज्यांचा अश्शूरमध्ये नाश होत होता आणि जे इजिप्तमध्ये बंदिवासात गेले होते, ते येतील आणि यरुशलेममधील पवित्र पर्वतावर याहवेहची उपासना करतील.

  11. यशायाह २८:१सुमारे इ.स.पू. ७२५

    त्या मुकुटाला धिक्कार असो, जो एफ्राईमच्या दारुड्यांचा अभिमान आहे, त्या फिके पडणार्‍या फुलाला, त्याच्या तेजस्वी सौंदर्याला, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेल्या— त्या नगराला, जो मद्याने क्षीण झालेल्यांचा अभिमान आहे!

  12. यशायाह २८:२सुमारे इ.स.पू. ७२५

    पाहा, प्रभूकडे असा एकजण आहे जो सामर्थ्यवान आणि बलवान आहे. तो गारपीट आणि विध्वंस करणाऱ्या वावटळीसारखा, वेगाने फटकारणारा पाऊस आणि पूरासारखा मुसळधार पाऊस, तो पूर्णशक्तीने त्याला जमिनीवर फेकून देईल.

  13. यशायाह २८:३सुमारे इ.स.पू. ७२५

    तो मुकुट, एफ्राईमच्या मद्यपींचा अभिमान, पायाखाली तुडविला जाईल.

  14. यशायाह २८:४सुमारे इ.स.पू. ७२५

    ते सुकत जाणारे फूल, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेले, त्याचे तेजस्वी सौंदर्य, कापणीच्या आधी पिकलेल्या अंजिरांसारखे होईल— लोक त्यांना पाहताक्षणीच त्यांना हातात घेतात, व त्यांना गिळंकृत करतात.

  15. यशायाह २८:५सुमारे इ.स.पू. ७२५

    त्या दिवशी सर्वसमर्थ याहवेह त्यांच्या अवशिष्ट लोकांसाठी एक गौरवशाली मुकुट, सुंदर पुष्पचक्र असे होतील.

  16. यशायाह २८:६सुमारे इ.स.पू. ७२५

    जे न्याय करण्यासाठी बसतात त्यांच्यासाठी ते न्यायाचा आत्मा होतील, जे वेशीतूनच युद्धामधून मागे फिरतात त्यांच्यासाठी ते सामर्थ्याचा उगम असतील.

  17. यशायाह २८:७सुमारे इ.स.पू. ७२५

    आणि हे सुद्धा मद्य पिऊन लटपटतात आणि मद्यापासून झोकांड्या देतात: याजक आणि संदेष्टे मद्यामुळे डगमगतात आणि द्राक्षमद्याने अस्थिर होतात. आणि मद्यापासून झोकांड्या देतात ते दृष्टान्त पाहत असताना लटपटतात, निर्णय देताना ते अडखळतात.

  18. यशायाह २८:८सुमारे इ.स.पू. ७२५

    त्यांच्या भोजनांची सर्व मेजे वांतीने भरली आहेत! आणि तिथे घाण नाही अशी एकही जागा नाही.

  19. यशायाह २८:९सुमारे इ.स.पू. ७२५

    “तो कोणाला शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे? त्याचा संदेश तो कोणाला समजावून सांगत आहे? त्यांच्या दूध तुटलेल्या बालकांना, नुकतेच स्तनपान झालेल्या तान्ह्या बाळांना?

  20. यशायाह २८:१०सुमारे इ.स.पू. ७२५

    कारण हे आहे: हे करा, ते करा, यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम; थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे.”

  21. यशायाह २८:११सुमारे इ.स.पू. ७२५

    ठीक आहे, तर परदेशी ओठांनी आणि अपरिचित वाणीने परमेश्वर या लोकांशी बोलतील,

  22. यशायाह २८:१२सुमारे इ.स.पू. ७२५

    ज्यांना ते असे म्हणाले, “हे विश्रांती घेण्याचे ठिकाण आहे, थकलेल्यांना विश्रांती घेऊ द्या;” आणि, “ही विश्राम करण्याची जागा आहे;” परंतु ते ऐकणार नाहीत.

  23. यशायाह २८:१३सुमारे इ.स.पू. ७२५

    म्हणून याहवेहचे वचन त्यांच्याकरिता असे होईल: हे करा, ते करा, यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम; थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे— जेणेकरून ते मागे पडतील; ते जखमी होतील, सापळ्यात अडकतील व पकडले जातील.

  24. यशायाह २८:१४सुमारे इ.स.पू. ७२५

    म्हणून, जे यरुशलेमच्या लोकांवर राज्य करतात, त्या उपहास करणार्‍या अधिकार्‍यांनो, याहवेहचे वचन ऐका:

  25. यशायाह २८:१५सुमारे इ.स.पू. ७२५

    तुम्ही बढाई मारता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाशी आम्ही करार केला आहे. जेव्हा दुःखदायक अरिष्टांचा फटकारा येतो, तो आम्हाला स्पर्श करू शकत नाही, कारण आम्ही खोट्या गोष्टींना आमचे आश्रयस्थान केले आहे आणि असत्यपणाच्या आड स्वतःला लपविले आहे.”