- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह २५:१२सुमारे इ.स.पू. ७१२
ते तुमच्या तटबंदीच्या उंच भिंती खाली पाडतील आणि त्या खाली येतील; ते त्यांना खाली जमिनीवर आणून, पूर्ण धुळीत मिळवतील.
- यशायाह २६:१सुमारे इ.स.पू. ७१२
त्या दिवशी सर्व यहूदीया देश हे गीत गाईल: आमच्याकडे एक भक्कम शहर आहे; परमेश्वर त्याचे तारण त्याच्या भिंती आणि तटबंदी करतात.
- यशायाह २६:२सुमारे इ.स.पू. ७१२
वेशी उघडा जेणेकरून नीतिमान राष्ट्र, जे राष्ट्र कायम विश्वास ठेवते, ते प्रवेश करेल.
- यशायाह २६:३सुमारे इ.स.पू. ७१२
ज्यांचे मन स्थिर आहे, त्या तुम्हाला परिपूर्ण शांती मिळेल, कारण ते तुमच्यावर भरवसा ठेवतात.
- यशायाह २६:४सुमारे इ.स.पू. ७१२
याहवेहवर कायम भरवसा ठेवा, कारण याहवेह, याहवेह स्वत: सनातन खडक आहेत.
- यशायाह २६:५सुमारे इ.स.पू. ७१२
जे उच्चस्थळी राहतात, त्यांना ते नम्र करतात वैभवशाली असलेले शहर ते खाली पाडतात; ते त्याला भुईसपाट करतात आणि त्याला धुळीत टाकून देतात.
- यशायाह २६:६सुमारे इ.स.पू. ७१२
पावलांनो ते तुडवा— पीडितांच्या पावलांनो, गरिबांच्या पावलांनो.
- यशायाह २६:७सुमारे इ.स.पू. ७१२
नीतिमानाचा मार्ग समतल असतो; तुम्ही जे परमनीतिमान आहात, नीतिमानांचा मार्ग सुकर करा.
- यशायाह २६:८सुमारे इ.स.पू. ७१२
होय, याहवेह, तुमच्या नियमांना अनुसरून चालत असताना, आम्ही तुमची वाट पाहतो; तुमचे नाव आणि किर्ती हीच आमच्या अंतःकरणाची इच्छा आहे.
- यशायाह २६:९सुमारे इ.स.पू. ७१२
रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो; सकाळी माझा आत्मा तुमच्यासाठी आसुसलेला असतो. जेव्हा तुमचे न्याय पृथ्वीवर येतात, तेव्हा जगातील लोक धार्मिकता शिकतात.
- यशायाह २६:१०सुमारे इ.स.पू. ७१२
परंतु जेव्हा दुष्टांवर कृपा दाखविली जाते, तेव्हा ते धार्मिकता शिकत नाहीत. प्रामाणिकपणा असलेल्या देशामध्येही ते दुष्कृत्ये करीत राहतात आणि याहवेहच्या प्रतिष्ठेची ते पर्वा करीत नाहीत.
- यशायाह २६:११सुमारे इ.स.पू. ७१२
याहवेह, तुमचा हात उगारलेला आहे, परंतु ते पाहात नाहीत. तुमच्या लोकांबद्दलचा तुमचा आवेश त्यांना पाहू द्या व लज्जित होऊ द्या; तुमच्या शत्रूंना भस्म करण्यासाठी अग्नी राखून ठेवा.
- यशायाह २६:१२सुमारे इ.स.पू. ७१२
याहवेह, तुम्ही आमच्यासाठी शांती प्रस्थापित करता; जे सर्वकाही आम्ही साध्य केले, ते तुम्ही आमच्यासाठी केले आहे.
- यशायाह २६:१३सुमारे इ.स.पू. ७१२
याहवेह, आमच्या परमेश्वरा, आम्ही केवळ तुमच्या नावाचा आदर करतो. तुमच्याशिवाय इतर प्रभूंनी आमच्यावर राज्य केले आहे,
- यशायाह २६:१४सुमारे इ.स.पू. ७१२
ते आता मरण पावले आहेत, ते आता जगणार नाहीत. त्यांचे मृतात्मे उठत नाहीत. तुम्ही त्यांना शिक्षा केली आणि त्यांचा नाश केला; तुम्ही त्यांच्या सर्व आठवणी पुसून टाकल्या.
- यशायाह २६:१५सुमारे इ.स.पू. ७१२
याहवेह, तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे; तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे. तुम्ही स्वतःसाठी गौरव प्राप्त केले आहे; तुम्ही देशाच्या सर्व सीमा वाढविल्या आहेत.
- यशायाह २६:१६सुमारे इ.स.पू. ७१२
हे याहवेह, ते त्यांच्या संकटात असताना तुमच्याकडे आले; जेव्हा तुम्ही त्यांना शिस्त लावली, तेव्हा ते कुजबुजत थोडीफार प्रार्थना करू शकत होते.
- यशायाह २६:१७सुमारे इ.स.पू. ७१२
जशी गर्भवती स्त्री प्रसूत होण्याच्या वेळेस तिच्या वेदनांनी गडाबडा लोळते आणि रडून ओरडते, याहवेह, तुमच्या उपस्थितीत आम्ही तसेच होतो.
- यशायाह २६:१८सुमारे इ.स.पू. ७१२
आम्ही गरोदर होतो, प्रसूतीच्या वेदनांनी लोळलो, परंतु आम्ही वार्याला जन्म दिला. आम्ही देशात तारण आणलेले नाही, आणि जगातील लोक जीवनाकडे आले नाहीत.
- यशायाह २६:१९सुमारे इ.स.पू. ७१२
याहवेह, परंतु तुमचे मेलेले जगतील; त्यांची शरीरे उठतील— जे धुळीमध्ये पडून राहतात त्यांना जागे होऊ द्या आणि हर्षनाद करू द्या— तुमचे दव प्रातःकाळच्या दवासारखे आहे; पृथ्वी तिच्या मृत लोकांना जन्म देईल.
- यशायाह २६:२०सुमारे इ.स.पू. ७१२
माझ्या लोकांनो, जा, तुमच्या खोल्यांध्ये जा आणि तुमच्यामागे दारे बंद करा; थोडा वेळ पर्यंत तुम्ही स्वतःला लपवून ठेवा जोपर्यंत त्यांचा राग निघून जात नाही.
- यशायाह २६:२१सुमारे इ.स.पू. ७१२
पाहा, पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा देण्याकरिता, याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर येत आहेत तिच्यावर झालेला रक्तपात पृथ्वी प्रगट करेल; तिच्यावर वधलेले यापुढे पृथ्वी लपवून ठेवणार नाही.
- यशायाह २७:१सुमारे इ.स.पू. ७१२
त्या दिवशी, याहवेह त्यांच्या तलवारीने शिक्षा करतील— त्यांची हिंसक, मोठी आणि शक्तिशाली तलवार— लिव्याथान सरपटणारा सर्प, गुंडाळून घेणारा सर्प लिव्हियाथान; ते समुद्रातील या राक्षसाचा वध करतील.
- यशायाह २७:२सुमारे इ.स.पू. ७१२
त्या दिवशी— “फलवंत द्राक्षमळ्याबद्दल गीत गा:
- यशायाह २७:३सुमारे इ.स.पू. ७१२
मी, याहवेह, त्यावर लक्ष ठेवतो; मी त्याला सतत पाणी देतो. मी रात्रंदिवस त्याचे रक्षण करतो जेणेकरून कोणीही त्याला इजा करणार नाही.