- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह २८:१६सुमारे इ.स.पू. ७२५
म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी सीयोनमध्ये एक दगड ठेवतो, एक परीक्षा घेतलेला दगड, खात्रीपूर्वक पायासाठी मौल्यवान कोनशिला; त्यावर भिस्त ठेवणारा, कधीही भीतीने त्रस्त होत नाही.
- यशायाह २८:१७सुमारे इ.स.पू. ७२५
मी न्यायाला मापनदोरी आणि नीतिमत्वाला ओळंबा असे करेन. गारांनी तुमचा खोटेपणा, तुमचे आश्रयस्थान झाडून काढला जाईल, आणि पाणी तुमच्या लपण्याच्या जागेवर भरून वाहील.
- यशायाह २८:१८सुमारे इ.स.पू. ७२५
मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द केला जाईल; अधोलोकाशी केलेला तुमचा करार टिकणार नाही. जेव्हा दुःखदायक अरिष्ट झाडून काढते, तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून तुडविले जाईल.
- यशायाह २८:१९सुमारे इ.स.पू. ७२५
जितक्या वेळेस ते येईल तितक्या वेळेस ते तुम्हाला वाहवत घेऊन जाईल; रोज सकाळी, दिवसभर आणि रात्रभर, ते आरपार झाडत राहील.” हा संदेश समजून घेतल्याने अत्यंत भीती निर्माण होईल.
- यशायाह २८:२०सुमारे इ.स.पू. ७२५
तुमचे अंथरूण फारच आखूड आहे, तुमचे पांघरूण अगदी अरुंद आहे.
- यशायाह २८:२१सुमारे इ.स.पू. ७२५
त्यांचे कार्य करण्यासाठी, त्यांचे विक्षिप्त काम, आणि त्यांचे कठीण कार्य, होय, त्यांचे अद्भुत कार्य सिद्ध करण्यासाठी, जसे ते पेराझीम पर्वतावर राहिले होते, तसे याहवेह उभे राहतील, जसे गिबोनच्या खोऱ्यामध्ये केले होते, तसे स्वतःला उभारतील.
- यशायाह २८:२२सुमारे इ.स.पू. ७२५
आता तुमचे थट्टा करणे थांबवा, नाहीतर तुमच्या साखळ्या आणखीच जड होतील. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांनी मला सांगितले आहे, संपूर्ण भूमीचा नाश करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे.
- यशायाह २८:२३सुमारे इ.स.पू. ७२५
ऐका व माझ्या म्हणण्याकडे कान द्या; मी तुम्हाला जे सांगतो त्याकडे नीट लक्ष द्या.
- यशायाह २८:२४सुमारे इ.स.पू. ७२५
जेव्हा शेतकरी लागवडीसाठी नांगरतो तेव्हा तो सतत नांगरतो का? तो सतत ढेकळे मोडून मातीत काम करीत राहतो का?
- यशायाह २८:२५सुमारे इ.स.पू. ७२५
मग त्याने शेत नांगरून तयार केले, तर तो त्यात शहाजिरे व जिऱ्याची पेरणी करत नाही काय? तो गव्हाच्या ठिकाणी गहू आणि जव सरीने लावत नाही का? आणि ज्वारीच्या वाफ्यात ज्वारी पेरत नाही का?
- यशायाह २८:२६सुमारे इ.स.पू. ७२५
त्याचे परमेश्वर त्याला सूचना देतात आणि त्याला योग्य रीत शिकवितात.
- यशायाह २८:२७सुमारे इ.स.पू. ७२५
शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी जड वजनाचा सोटा वापरीत नाही, किंवा मळणीसाठी गाडीचे चाक जिऱ्यावर फिरविले जात नाही; शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी हलक्या वजनाची काठी वापरतो, आणि जिऱ्याची मळणी बारीक काठीने करतो.
- यशायाह २८:२८सुमारे इ.स.पू. ७२५
भाकरी करण्यासाठी धान्याचे पीठ करावे लागते; म्हणून त्याची सतत मळणी करत नाहीत. ते खळ्यात घालून त्यावर मळणीच्या गाडीची चाके फिरविली जातात, पण त्याची मळणी करण्यासाठी घोड्याचा वापर करत नाहीत.
- यशायाह २८:२९सुमारे इ.स.पू. ७२५
ही सर्व माहिती सर्वसमर्थ याहवेहकडून प्राप्त होते. त्यांच्या योजना चमत्कारिक असतात, त्यांचे ज्ञान अद्भुत आहे.
- यशायाह २९:१सुमारे इ.स.पू. ७१२
अरीएल, अरीएल, तुम्हाला धिक्कार असो ते नगर जिथे दावीदाने वास्तव्य केले! वर्षा पुढे वर्ष जोडा आणि तुमच्या सणांचे चक्र पुढे चालू द्या.
- यशायाह २९:२सुमारे इ.स.पू. ७१२
तरीसुद्धा मी अरीएलला वेढा घालेन; ती शोक करेल आणि विलाप करेल, ती माझ्यासाठी वेदीच्या अरीएलसारखे होईल.
- यशायाह २९:३सुमारे इ.स.पू. ७१२
मी तुमच्याविरुद्ध सर्व बाजूंनी छावणी टाकेन; मी तुमच्या भोवताली उंच बुरुजांचे रिंगण उभे करेन. आणि मी तुमच्याविरुद्ध वेढा घालण्याची कामे करेन.
- यशायाह २९:४सुमारे इ.स.पू. ७१२
तुम्हाला खाली टाकले आहे, तुम्ही भूमीवरून बोला. तुमचे बोलणे धुळीतून पुटपुटत येईल. पृथ्वीवरून तुमचा आवाज भुतासारखा येईल; धुळीमधून तुमचे बोलणे कुजबुज करेल.
- यशायाह २९:५सुमारे इ.स.पू. ७१२
परंतु तुमचे पुष्कळ शत्रू बारीक धुळीसारखे होतील, उडालेल्या भुशासारखे निर्दयी लोकांच्या झुंडी. अचानक, एका क्षणातच,
- यशायाह २९:६सुमारे इ.स.पू. ७१२
सर्वसमर्थ याहवेह येतील मेघगर्जना आणि भूकंप आणि प्रचंड गर्जनेसह, सोसाट्याच्या वाऱ्याची वावटळ, वादळ आणि गिळंकृत करणाऱ्या अग्निज्वालांसह येतील.
- यशायाह २९:७सुमारे इ.स.पू. ७१२
तेव्हा अरीएलविरुद्ध लढणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या झुंडी, जे तिच्यावर आणि तिच्या गडांवर हल्ला करतील आणि तिला वेढा घालतील, ते स्वप्नासारखेच होईल, ते रात्रीच्या दृष्टान्तासारखे—
- यशायाह २९:८सुमारे इ.स.पू. ७१२
जसे भूक लागलेला मनुष्य अन्न खात असल्याची स्वप्ने पाहतो, परंतु तो जागा होतो तेव्हा भुकेलाच असतो; जसे तहान लागलेला मनुष्य जेव्हा पाणी पिण्याची स्वप्ने पाहतो, परंतु तो जागृत होतो तेव्हा दुर्बल आणि तहानलेलाच असतो. तशाच प्रकारे सीयोन पर्वताविरुद्ध लढणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या झुंडींचे होईल.
- यशायाह २९:९सुमारे इ.स.पू. ७१२
सुन्न व्हा आणि आश्चर्याने थक्क व्हा, तुम्ही स्वतःला अंध करा आणि दृष्टीहीन व्हा. झिंगलेले व्हा, परंतु मद्याने नव्हे, लटपटणारे व्हा, परंतु मद्याने नव्हे.
- यशायाह २९:१०सुमारे इ.स.पू. ७१२
याहवेहनी तुम्हाला गाढ झोप आणली आहे: त्यांनी संदेष्टे, म्हणजे तुमचे डोळे बंद केले आहेत; त्यांनी दृष्टान्त पाहणारे, म्हणजे तुमच्या डोक्यावर आच्छादन घातले आहे.
- यशायाह २९:११सुमारे इ.स.पू. ७१२
तुमच्यासाठी हा संपूर्ण दृष्टान्त फक्त चर्मपत्राच्या गुंडाळीत मोहोरबंद केलेल्या शब्दांव्यतिरिक्त काहीच नाही, आणि जर तुम्ही वाचन करू शकणार्या एखाद्याला ही गुंडाळी द्याल आणि असे म्हणाल, “कृपया, हे वाचून दाखवा” ते उत्तर देतील, “मी हे करू शकत नाही; ते मोहोरबंद केलेले आहे.”