- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह २४:१०सुमारे इ.स.पू. ७१२
उद्ध्वस्त नगरी निर्जन झाली आहे; प्रत्येक घराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे.
- यशायाह २४:११सुमारे इ.स.पू. ७१२
रस्त्यावर ते मद्यासाठी आरडाओरडा करीत आहेत; सगळा आनंद दुःखात बदलला आहे, हर्षोल्हासाचे स्वर पृथ्वीवरून नाहीसे झाले आहेत!
- यशायाह २४:१२सुमारे इ.स.पू. ७१२
नगर उद्ध्वस्त झाले आहे, त्याच्या वेशी तोडून त्यांचे तुकडे करण्यात आले आहेत.
- यशायाह २४:१३सुमारे इ.स.पू. ७१२
जसे जैतून वृक्ष झाडल्यानंतर किंवा द्राक्ष गोळा करून द्राक्षाचा हंगाम संपल्यानंतर उरलले राहतात, तशी देशांची अवस्था होईल, तशी या पृथ्वीची अवस्था होईल.
- यशायाह २४:१४सुमारे इ.स.पू. ७१२
ते हर्षाने आरोळ्या मारतील; आनंदाने गजर करतील, पश्चिमेकडून ते याहवेहच्या ऐश्वर्याची स्तुती करतील.
- यशायाह २४:१५सुमारे इ.स.पू. ७१२
म्हणून पूर्वेकडे याहवेहचा गौरव करा; समुद्राच्या बेटांवर, इस्राएलचे परमेश्वर याहवेहच्या नावाचा गौरव करा.
- यशायाह २४:१६सुमारे इ.स.पू. ७१२
पृथ्वीच्या दिगंतापासून आपण हे गाणे ऐकतो: “नीतिमान परमेश्वराचा गौरव असो.” पण मी म्हणालो, “माझा नाश होत आहे, माझा नाश होत आहे! माझा धिक्कार असो! फसवणूक करणारा विश्वासघात करतो! फसवणूक करून तो विश्वासघात करतो!”
- यशायाह २४:१७सुमारे इ.स.पू. ७१२
पृथ्वीवरील सर्व लोकांनो, तुमच्या वाट्याला दहशत, खड्डा व सापळा येणार आहे!
- यशायाह २४:१८सुमारे इ.स.पू. ७१२
भीतीने तुम्ही पळ काढण्याचा प्रयत्न कराल, तर खड्ड्यात पडाल; खड्ड्यातून कसेबसे बाहेर पडाल, तर तुम्ही सापळ्यात अडकाल, कारण आकाशाचे धरणद्वार उघडण्यात आले आहे, पृथ्वीचा पाया हादरला आहे.
- यशायाह २४:१९सुमारे इ.स.पू. ७१२
पृथ्वीचे तुकडे झाले आहेत, पृथ्वी पूर्ण फाटून गेली आहे, पृथ्वीला जबरदस्त हादरा मिळाला आहे.
- यशायाह २४:२०सुमारे इ.स.पू. ७१२
पृथ्वी मद्यपीसारखी झोकांड्या खात आहे. वादळात झोपडी हेलकावे खाते, तशी ती हेलकावे खात आहे; कारण तिच्या बंडखोरपणाचे ओझे अत्यंत जड झाले आहे, ती अशी कोसळेल—कि पुन्हा उठणार नाही.
- यशायाह २४:२१सुमारे इ.स.पू. ७१२
त्या दिवशी याहवेह, वर आकाशातील अधिपतींना आणि खाली पृथ्वीवरील राजांना शिक्षा करतील.
- यशायाह २४:२२सुमारे इ.स.पू. ७१२
त्यांना एकत्र गोळा करण्यात येईल आणि कैद्यांसारखे त्यांना अंधारकोठडीत टाकण्यात येईल; त्यांना कारागृहात कोंडून ठेवण्यात येईल. आणि त्यांना अनेक दिवसांकरिता शिक्षा देण्यात येईल.
- यशायाह २४:२३सुमारे इ.स.पू. ७१२
चंद्राची त्रेधा उडेल, सूर्य लज्जित होईल; कारण सर्वसमर्थ याहवेह वैभवाने सीयोन पर्वतावर आणि यरुशलेममध्ये, आणि आपल्या वडीलजनांसमोर—गौरवाने राज्य करतील.
- यशायाह २५:१सुमारे इ.स.पू. ७१२
याहवेह तुम्ही माझे परमेश्वर आहात; मी तुम्हाला उंचावेन आणि तुमच्या नावाची स्तुती करेन, कारण परिपूर्ण विश्वासूपणाने तुम्ही अद्भुत गोष्टी केल्या आहेत, ज्या फार पूर्वीपासून योजलेल्या होत्या.
- यशायाह २५:२सुमारे इ.स.पू. ७१२
तुम्ही शहराला दगडविटांच्या तुकड्यांचा ढीग बनविले, तटबंदी असलेले नगर उद्ध्वस्त केले, परकियांचे किल्ले आता नगर म्हणून अस्तित्वात नाहीत. ते परत कधीही बांधले जाणार नाही.
- यशायाह २५:३सुमारे इ.स.पू. ७१२
म्हणून बलवान लोक तुमचा सन्मान करतील; निर्दयी राष्ट्रांची नगरे तुमचा आदर करतील.
- यशायाह २५:४सुमारे इ.स.पू. ७१२
तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात, गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात, वादळामध्ये निवारा आहात आणि उष्णतेमध्ये सावली आहात. कारण निर्दयी लोकांचा श्वास हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे,
- यशायाह २५:५सुमारे इ.स.पू. ७१२
आणि वाळवंटातील उष्णतेसारखा. परदेश्यांची गर्जना तुम्ही शांत करता; जशी ढगाच्या सावलीने उष्णता कमी होते, तसे निर्दयी लोकांचे हर्षगीत शांत होते.
- यशायाह २५:६सुमारे इ.स.पू. ७१२
या डोंगरावर सर्वशक्तिमान याहवेह सर्व लोकांसाठी उत्तम अन्नाच्या मेजवानीची तयारी करतील, जुन्या द्राक्षारसाची मेजवानी— सर्वोत्तम मांस आणि सर्वोत्कृष्ट द्राक्षारस.
- यशायाह २५:७सुमारे इ.स.पू. ७१२
जे आच्छादन सर्व लोकांना आच्छादून टाकते, चादर जी सर्व राष्ट्रांना झाकते, या पर्वतावर याहवेह तिचा नाश करतील;
- यशायाह २५:८सुमारे इ.स.पू. ७१२
सर्वकाळासाठी ते मृत्यूला गिळून टाकतील. सार्वभौम याहवेह सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसून टाकतील; ते त्यांच्या लोकांची अप्रतिष्ठा सर्व पृथ्वीवरून काढून टाकतील. याहवेह असे बोलले आहेत.
- यशायाह २५:९सुमारे इ.स.पू. ७१२
त्या दिवशी लोक असे म्हणतील, “निश्चितच, हे आमचे परमेश्वर आहेत; आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आम्हाला वाचविले. हे याहवेह आहेत, आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला; चला आपण त्यांच्या तारणात आनंद आणि हर्षोल्हास करू या.”
- यशायाह २५:१०सुमारे इ.स.पू. ७१२
याहवेहचा हात या पर्वतावर राहील; परंतु जसे कडबा खतामध्ये तुडविला जातो, तसे मोआबी त्यांच्या भूमीत तुडविले जातील.
- यशायाह २५:११सुमारे इ.स.पू. ७१२
जसे पोहणारे पोहण्यासाठी त्यांचे हात लांब करतात तसे ते त्यांचे हात त्यांच्यावर लांब करतील. त्यांच्या हातात चतुराई असतानाही परमेश्वर त्यांचा अभिमान उतरवून टाकतील.