- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह २२:३सुमारे इ.स.पू. ७१२
तुमचे सर्व पुढारी एकत्र मिळून पळून गेले आहेत; धनुष्याचा वापर न करताच ते पकडले गेले आहेत. जेव्हा शत्रू अजून दूर आहे, तोपर्यंत तुम्ही पळून गेला होता, ते तुम्ही सर्व पकडले गेले व त्यांना कैदी करून नेले.
- यशायाह २२:४सुमारे इ.स.पू. ७१२
म्हणून मी म्हणालो, “माझ्यापासून दूर जा; मला आवेगाने रडू द्या. माझ्या लोकांच्या नाशामुळे माझे सांत्वन करण्याचा प्रयत्न करू नका.”
- यशायाह २२:५सुमारे इ.स.पू. ७१२
प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांचा एक दिवस आहे दृष्टान्ताच्या खोऱ्यामध्ये गोंधळाचा, तुडविण्याचा आणि दहशतीचा, भिंती तोडून पाडण्याचा दिवस आणि पर्वतातून ओरडण्याचा दिवस आहे.
- यशायाह २२:६सुमारे इ.स.पू. ७१२
एलाम मनुष्यांचे रथ, त्यांचा सारथी आणि घोडे व भाले यासहित बाण ठेवण्याचा भाता हाती घेते; कीर ढाल उघडी करते.
- यशायाह २२:७सुमारे इ.स.पू. ७१२
तुमची आवडती खोरी रथांनी भरून गेली आहेत, आणि घोडेस्वार नगराच्या फाटकांवर तैनात आहेत.
- यशायाह २२:८सुमारे इ.स.पू. ७१२
प्रभूने यहूदीयाचे संरक्षण काढून टाकले, आणि तुम्ही त्या दिवशी जंगलाच्या राजवाड्यामध्ये असलेल्या शस्त्रास्त्रांकडे पाहिले.
- यशायाह २२:९सुमारे इ.स.पू. ७१२
तुम्ही पाहिले की, दावीद नगराची तटबंदी पुष्कळ ठिकाणी तुटलेली होती; खालच्या जलाशयात तुम्ही पाणी साठविले होते.
- यशायाह २२:१०सुमारे इ.स.पू. ७१२
यरुशलेममधील इमारती तुम्ही मोजल्या आणि भिंती भक्कम करण्यासाठी घरे जमीनदोस्त करून टाकली.
- यशायाह २२:११सुमारे इ.स.पू. ७१२
जुन्या जलाशयाच्या पाण्यासाठी तुम्ही दोन भिंतींमध्ये हौद बांधला, परंतु ज्यांनी तो तयार केला, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही, किंवा ज्यांनी ते फार पूर्वीपासून योजले होते, त्यांना आदर दिला नाही.
- यशायाह २२:१२सुमारे इ.स.पू. ७१२
प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, रडण्यासाठी आणि आक्रोश करण्यासाठी, तुमचे केस मुंडविण्यासाठी आणि गोणपाट घालण्यासाठी, त्या दिवशी तुम्हाला बोलावतील.
- यशायाह २२:१३सुमारे इ.स.पू. ७१२
परंतु पाहा, तिथे आनंद आणि चंगळ आहे, गुरांची कत्तल आणि मेंढरांची हत्या, मांस खाणे आणि द्राक्षारस पिणे! तुम्ही म्हणता, “चला, आपण खाऊ आणि पिऊ, कारण उद्या आपण मरणार आहोत!”
- यशायाह २२:१४सुमारे इ.स.पू. ७१२
सर्वसमर्थ याहवेहनी माझ्या ऐकण्यात हे प्रकट केले आहे: “तुझ्या मरणाच्या दिवसापर्यंत या पापाचे प्रायश्चित्त केले जाणार नाही,” असे प्रभू सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
- यशायाह २२:१५सुमारे इ.स.पू. ७१२
प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जा, या कारभाऱ्याला सांग, राजवाड्याचा प्रशासक शेबनाला सांग:
- यशायाह २२:१६सुमारे इ.स.पू. ७१२
तुम्ही इथे काय करत आहात आणि या दगडातून स्वतःसाठी कबर कापण्याची उंचीवर तुमची कबर कोरण्याची, आणि या खडकात तुमची विश्रांतीची जागा तयार करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली आहे?
- यशायाह २२:१७सुमारे इ.स.पू. ७१२
“हे बलवान पुरुषा, याहवेहच तुला घट्ट पकडून ठेवणार आहेत आणि आता तुला झुगारून फेकणार आहेत.
- यशायाह २२:१८सुमारे इ.स.पू. ७१२
ते तुला हातामध्ये चुरगाळून, चेंडूसारखे, दूर ओसाड प्रदेशात भिरकावून देणार आहे आणि तिथेच तुझा अंत होईल. ज्या रथांचा तुला इतका अभिमान होता ते तुझ्या मालकाच्या घरास लज्जित करतील.
- यशायाह २२:१९सुमारे इ.स.पू. ७१२
मीच तुला तुझ्या पदावरून काढून टाकेन आणि या अधिकाराच्या स्थानावरून ढकलून देईन.
- यशायाह २२:२०सुमारे इ.स.पू. ७१२
“मग मी माझा सेवक, हिल्कियाहचा पुत्र एल्याकीमला पाचारण करेन.
- यशायाह २२:२१सुमारे इ.स.पू. ७१२
तुझा पोशाख, तुझी पदवी, तुझा अधिकार मी त्याला देईन. तो यहूदीयाच्या लोकांचा व यरुशलेममधील रहिवाशांचा पिता होईल.
- यशायाह २२:२२सुमारे इ.स.पू. ७१२
मी त्याच्या खांद्यावर दावीदाच्या घराण्याची चावी ठेवेन. तो जे उघडेल, ते कोणीही बंद करू शकणार नाही आणि तो जे काही बंद करेल, ते कधीही उघडू शकणार नाही.
- यशायाह २२:२३सुमारे इ.स.पू. ७१२
मी त्याला एखाद्या खुंटीसारखे मजबूत ठिकाणी रोवेन; त्याच्या पित्याच्या घराण्यासाठी सन्मानाचे आसन होईल.
- यशायाह २२:२४सुमारे इ.स.पू. ७१२
त्याच्या घराण्याचा लौकिक त्याच्यावर स्थिर करेन: त्याचे वंशज व त्याच्या शाखा—त्याचे सर्व लहान पात्र, कटोऱ्यापासून ते मोठ्या पात्रापर्यंत.”
- यशायाह २२:२५सुमारे इ.स.पू. ७१२
सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी मजबूतपणे ठोकलेली पाचर डळमळीत होईल; ती उचकटून जाईल व निखळून जमिनीवर पडेल, तिच्यावर आधारलेले सर्व ओझे खाली पडेल.” ही याहवेहची वाणी आहे.
- यशायाह २३:१सुमारे इ.स.पू. ७१५
सोरविरुद्ध भविष्यवाणी: तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा! कारण सोरचा नाश झाला आहे आणि तिथे घर किंवा बंदर असे काहीच राहिले नाही. कित्तीम देशाकडून हे वचन त्यांच्याकडे आले आहे.
- यशायाह २३:२सुमारे इ.स.पू. ७१५
तुम्ही बेटावरील रहिवाशांनो, आणि तुम्ही सीदोनचे व्यापारी, ज्यांना खलाश्यांनी श्रीमंत केले आहे, शांत राहा.