मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह १९:१सुमारे इ.स.पू. ७१४

    इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी: पाहा, याहवेह वेगवान ढगावर स्वार होऊन इजिप्तला येत आहेत. इजिप्तच्या मूर्ती त्यांच्यापुढे थरथर कापतात, आणि इजिप्तच्या लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून जातात.

  2. यशायाह १९:२सुमारे इ.स.पू. ७१४

    “मी इजिप्तच्या लोकांना इजिप्तच्या लोकांविरुद्ध चिथावेन— भाऊ भावाविरुद्ध लढेल, शेजारी शेजार्‍याविरुद्ध, शहर शहराविरुद्ध, राज्य राज्याविरुद्ध.

  3. यशायाह १९:३सुमारे इ.स.पू. ७१४

    इजिप्तच्या लोकांचे हृदय खचून जाईल, आणि मी त्यांच्या योजना विफल करेन; मूर्तींबरोबर आणि मृतात्म्यांबरोबर, माध्यमांशी आणि भूतविद्या करणाऱ्यांशी ते सल्लामसलत करतील.

  4. यशायाह १९:४सुमारे इ.स.पू. ७१४

    मी इजिप्तच्या लोकांना क्रूर धन्याच्या सत्तेच्या स्वाधीन करेन, आणि एक भयंकर राजा त्यांच्यावर राज्य करेल,” असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.

  5. यशायाह १९:५सुमारे इ.स.पू. ७१४

    नदीचे पाणी वाळून जाईल, आणि नदीचे पात्र कोरडे आणि शुष्क होईल.

  6. यशायाह १९:६सुमारे इ.स.पू. ७१४

    कालव्यांना दुर्गंधी येईल; मिसरचे झरे ओसरतील आणि कोरडे होतील. लव्हाळे आणि वेळू सुकून जातील,

  7. यशायाह १९:७सुमारे इ.स.पू. ७१४

    तसेच नाईल नदीच्या काठावरील, नदिमुखावरील झाडेसुद्धा, नाईल नदीच्या काठावर पेरणी केलेले प्रत्येक शेत कोरडे होईल व उडून नाहीसे होईल.

  8. यशायाह १९:८सुमारे इ.स.पू. ७१४

    जे नाईल नदीत आकड्या टाकतात, ते सर्व कोळीसुद्धा रडतील आणि विलाप करतील; जे पाण्यावर जाळे टाकतात ते झुरणीस लागतील.

  9. यशायाह १९:९सुमारे इ.स.पू. ७१४

    जे तागाच्या सूतकताईचे काम करतात ते निराश होतील, विणकर आशा हरवतील.

  10. यशायाह १९:१०सुमारे इ.स.पू. ७१४

    कापडकामाचे कारागीर उदास होतील, आणि सर्व मजुरी करणाऱ्यांची अंतःकरणे रोगट होतील.

  11. यशायाह १९:११सुमारे इ.स.पू. ७१४

    सोअन येथील अधिकारी निरुपयोगीच नाहीत तर मूर्ख आहेत; फारोह राजाचे शहाणे सल्लागार निरर्थक सल्ला देतात. तुम्ही फारोहला कसे म्हणू शकता, “ज्ञानी लोकांपैकी एक मी आहे, प्राचीन राजांचा मी एक शिष्य आहे?”

  12. यशायाह १९:१२सुमारे इ.स.पू. ७१४

    आता तुमची ज्ञानी माणसे कुठे आहेत? त्यांनी तुम्हाला दाखवावे किंवा तुमच्यापुढे यावे आणि माहीत करून द्यावे, कि सर्वसमर्थ याहवेह यांनी इजिप्तविरुद्ध काय योजना केली आहे.

  13. यशायाह १९:१३सुमारे इ.स.पू. ७१४

    सोअनचे अधिकारी मूर्ख बनले आहेत, मेम्फीसच्या पुढाऱ्यांची फसवणूक झाली आहे; तिच्या लोकांच्या कोनशिलांनी इजिप्तला भरकटून टाकले आहे.

  14. यशायाह १९:१४सुमारे इ.स.पू. ७१४

    याहवेहनी त्यांच्यामध्ये भोंवळ येण्याचा आत्मा ओतला आहे; त्यामुळे इजिप्तच्या सर्व कामात ती लटपटते, जसा मद्यपी, त्याने केलेल्या ओकारी भोवती फिरतो.

  15. यशायाह १९:१५सुमारे इ.स.पू. ७१४

    इजिप्त काहीही करू शकत नाही— मस्तक किंवा शेपूट, वर झावळ्याची शाखा किंवा खालील लव्हाळे.

  16. यशायाह १९:१६सुमारे इ.स.पू. ७१४

    त्या दिवशी इजिप्तचे लोक दुर्बल होतील. सर्वसमर्थ याहवेहनी त्यांच्याविरुद्ध उगारलेल्या हाताच्या धाकामुळे ते घाबरून थरकापतील.

  17. यशायाह १९:१७सुमारे इ.स.पू. ७१४

    यहूदीयाची भूमी इजिप्तच्या लोकांवर दहशत आणेल; आणि सर्वसमर्थ याहवेह जी योजना त्यांच्याविरुद्ध करीत आहेत, त्यामुळे कोणी यहूदीयाचा उल्लेख केलेला ऐकताच ते घाबरून जातील.

  18. यशायाह १९:१८सुमारे इ.स.पू. ७१४

    त्या दिवशी इजिप्तमधील पाच शहरे कनान देशाची भाषा बोलतील आणि सर्वसमर्थ याहवेह यांच्याबरोबर एकनिष्ठतेची शपथ घेतील. त्यापैकी एकाला सूर्याचे शहर म्हटले जाईल.

  19. यशायाह १९:१९सुमारे इ.स.पू. ७१४

    त्या दिवशी इजिप्तच्या मध्यभागी याहवेहसाठी वेदी असेल आणि त्यांच्या सीमेवर याहवेह यांचे स्मारक असेल.

  20. यशायाह १९:२०सुमारे इ.स.पू. ७१४

    इजिप्त देशामध्ये सर्वसमर्थ याहवेहसाठी ते एक चिन्ह आणि साक्ष असतील. जेव्हा ते त्यांच्या जुलमी लोकांमुळे याहवेहकडे धावा करतील, तेव्हा ते त्यांच्याकडे एक तारणारा आणि रक्षक पाठवतील आणि ते त्यांना सोडवतील.

  21. यशायाह १९:२१सुमारे इ.स.पू. ७१४

    तेव्हा याहवेह स्वतःला इजिप्तच्या लोकांस प्रगट करतील आणि त्या दिवशी ते याहवेह यांना स्वीकारतील. यज्ञार्पणे आणि धान्यार्पणे यांच्यासहित ते आराधना करतील; ते याहवेहकडे शपथ वाहतील आणि त्याचे पालन करतील.

  22. यशायाह १९:२२सुमारे इ.स.पू. ७१४

    याहवेह इजिप्तवर महामारीच्या साथीने हल्ला करतील; ते त्यांच्यावर हल्ला करतील आणि त्यांना बरे करतील. ते याहवेहकडे वळतील आणि ते त्यांच्या विनवणीला प्रतिसाद देतील आणि त्यांना बरे करतील.

  23. यशायाह १९:२३सुमारे इ.स.पू. ७१४

    त्या दिवशी इजिप्तपासून अश्शूराकडे जाणारा एक महामार्ग असेल. अश्शूरचे लोक इजिप्तकडे आणि इजिप्तचे लोक अश्शूरला जातील. इजिप्तचे आणि अश्शूरचे लोक एकत्र भक्ती करतील.

  24. यशायाह १९:२४सुमारे इ.स.पू. ७१४

    त्या दिवशी इजिप्त आणि अश्शूरबरोबर इस्राएल हे पृथ्वीवरील तिसरे आशीर्वादित राष्ट्र असेल.

  25. यशायाह १९:२५सुमारे इ.स.पू. ७१४

    सर्वसमर्थ याहवेह त्यांना आशीर्वाद देतील आणि म्हणतील, “इजिप्तमधील माझे लोक आशीर्वादित असावेत, अश्शूर माझी हस्तकला आणि इस्राएल माझे वतन असो!”