- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
सर्वसमर्थ याहवेहचा हा संकल्प आहे, तो कोण निष्फळ करू शकतो? त्यांचा हात उठला आहे, त्याला कोण आवर घालू शकतो?
- यशायाह १४:२८सुमारे इ.स.पू. ७२६
आहाज राजा मरण पावला त्या वर्षी हा संदेश मला प्राप्त झाला:
- यशायाह १४:२९सुमारे इ.स.पू. ७२६
अहो पलिष्टी लोकांनो, ज्या दांडक्याने तुम्हाला मारले तो मोडला आहे म्हणून आनंद करू नका. तरी त्या सापापासून फुरसे निपजेल त्याचे फळ तुमचा वेध घेणारे विषारी नाग असतील.
- यशायाह १४:३०सुमारे इ.स.पू. ७२६
गरिबांतील गरिबांना कुरण सापडेल, आणि गरजवंत सुरक्षितेत झोप घेतील. पण तुझे मूळ दुष्काळाने नष्ट होईल; ते तुझ्या अवशिष्टांचा तलवारीने नाश करतील.
- यशायाह १४:३१सुमारे इ.स.पू. ७२६
वेशींनो, आक्रोश करा! नगरांनो विलाप करा! पलिष्टी लोकांनो, भयाने वितळून जा! कारण उत्तरेकडून धुराचा लोट येत आहे, त्यांच्या पलटणींत कोणीही रेंगाळणारे नाहीत.
- यशायाह १४:३२सुमारे इ.स.पू. ७२६
आता राष्ट्रांच्या राजदूतांना काय उत्तर देण्यात यावे? “याहवेहने सीयोन स्थापिले आहे, आणि त्यांच्या पीडितांना तिच्यात आश्रय मिळेल.”
- यशायाह १५:१सुमारे इ.स.पू. ७२६
मोआब देशाविरुद्ध भविष्यवाणी: मोआब येथील आर शहर उद्ध्वस्त झाले आहे, एका रात्रीत ते नष्ट झाले आहे! मोआबातील कीर शहर उद्ध्वस्त झाले आहे, एका रात्रीत ते नष्ट झाले आहे!
- यशायाह १५:२सुमारे इ.स.पू. ७२६
दिबोन येथील लोक त्यांच्या उच्च स्थानावरील, मंदिरात विलाप करण्यासाठी जात आहेत; नबो आणि मेदबासाठी मोआब आक्रोश करीत आहे. प्रत्येकाच्या डोक्यावरील केस आणि दाढी काढलेली आहे.
- यशायाह १५:३सुमारे इ.स.पू. ७२६
रस्त्यांवर ते गोणपाट घालतात; छतावर आणि सार्वजनिक चौकांमध्ये ते सर्व आक्रोश करतात, विलाप करीत पालथे पडतात.
- यशायाह १५:४सुमारे इ.स.पू. ७२६
हेशबोन आणि एलिआलेह रडतात, त्यांचा आक्रोश दूरवर याहसपर्यंत ऐकू येतो. म्हणून मोआबचे सशस्त्र लोक आक्रोश करतात, आणि त्यांची अंतःकरणे दुर्बल झाली आहेत.
- यशायाह १५:५सुमारे इ.स.पू. ७२६
माझे मन मोआबसाठी रडते; तिचे पलायन केलेले लोक सोअरपर्यंत, एग्लाथ-शलीशियापर्यंत पळतात. ते लुहिथकडे टेकडीवर जातात, जाताना ते विलाप करतात; होरोनाईमच्या वाटेवर ते त्यांच्या नाशासाठी विलाप करतात.
- यशायाह १५:६सुमारे इ.स.पू. ७२६
निम्रीमचे सर्व पाणी आटून गेले आहे आणि गवत करपून गेले आहे; वनस्पती सुकून गेली आहे; आणि हिरवळीसारखे काहीही उरले नाही.
- यशायाह १५:७सुमारे इ.स.पू. ७२६
म्हणून त्यांनी मिळवलेली आणि साठविलेली संपत्ती ते वाळुंजाच्या खोऱ्यापलीकडे घेऊन जातात.
- यशायाह १५:८सुमारे इ.स.पू. ७२६
त्यांच्या आक्रोशाचे प्रतिध्वनी मोआबच्या सीमेपर्यंत येतात. त्यांचे आक्रंदन एग्लाइमपर्यंत पोहोचते, त्यांचा विलाप बीर एलिमपर्यंत पोहोचतो.
- यशायाह १५:९सुमारे इ.स.पू. ७२६
दिमोनाचे पाणी रक्ताने भरलेले आहे, परंतु मी दिमोनवर आणखी विपत्ती आणेन— मोआबच्या पलायन केलेल्या लोकांवर आणि देशातील अवशिष्ट लोकांवर मी सिंह पाठवेन.
- यशायाह १६:१सुमारे इ.स.पू. ७२६
देशाच्या अधिपतीकडे सेलापासून वाळवंटाच्या पलीकडे सीयोन कन्येच्या पर्वतापर्यंत खंडणी म्हणून कोकरे पाठवा.
- यशायाह १६:२सुमारे इ.स.पू. ७२६
घरट्यातून ढकलून दिलेल्या फडफडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे, मोआबच्या स्त्रिया आर्णोनच्या घाटावर आहेत.
- यशायाह १६:३सुमारे इ.स.पू. ७२६
मोआब म्हणतो, “तुमच्या मनाची तयारी करा, निर्णय द्या. तुमची सावली रात्रीसारखी करा— भर दुपारच्या वेळेसारखी. पलायन केलेल्यांना लपवा, शरणार्थी लोकांचा विश्वासघात करू नका.
- यशायाह १६:४सुमारे इ.स.पू. ७२६
पलायन केलेल्या मोआबी लोकांना तुमच्याबरोबर राहू द्या; संहारकापासून त्यांचा आश्रय व्हा.” जुलूम करणाऱ्याचा शेवट होईल, आणि नाश थांबेल; आक्रमण करणारे नाहीसे होतील.
- यशायाह १६:५सुमारे इ.स.पू. ७२६
प्रीतीने सिंहासन स्थापित केले जाईल; दावीदाच्या घराण्यातील एकजण, विश्वासूपणाने त्यावर बसेल— जो न्यायनिवाडा करताना न्यायाची बाजू घेतो आणि धार्मिकतेची कामे जलदगतीने करतो.
- यशायाह १६:६सुमारे इ.स.पू. ७२६
मोआबाच्या अभिमानाबद्दल आम्ही ऐकले आहे— तिचा अहंकार किती मोठा आहे! तिची घमेंड, तिचा अभिमान आणि तिचा उर्मटपणा; परंतु तिच्या सर्व फुशारक्या पोकळ आहेत.
- यशायाह १६:७सुमारे इ.स.पू. ७२६
म्हणून मोआबी मोठ्याने रडतात, मोआबसाठी ते एकत्र मोठ्याने रडतात. कीर-हरेसेथचा बेदाणा किंवा मनुका मिश्रित पिठाच्या गोड ढेपांसाठी विलाप आणि शोक करतात.
- यशायाह १६:८सुमारे इ.स.पू. ७२६
हेशबोनची शेते सुकून गेली आहेत, सिबमाहच्या द्राक्षवेलीसुद्धा. ज्या एकवेळी याजेरपर्यंत पोहोचल्या होत्या आणि वाळवंटाकडे पसरत गेल्या होत्या, त्या खास निवडलेल्या द्राक्षवेली इतर देशांच्या राज्यकर्त्यांनी तुडवून टाकल्या आहेत. त्यांची कोंबे बाहेर पसरली आणि ती समुद्रापर्यंत गेली आहेत.
- यशायाह १६:९सुमारे इ.स.पू. ७२६
म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी याजेरसह मीही रडतो. हेशबोन आणि एलिआलेह, मी तुम्हाला अश्रूंनी भिजवितो! तुमच्या पिकलेल्या फळांसाठी आणि तुमच्या कापणीच्या आनंदाचा जयघोष शांत झाला आहे.
- यशायाह १६:१०सुमारे इ.स.पू. ७२६
फळबागेतून आनंद आणि हर्ष काढून घेतला आहे; द्राक्षमळ्यात कोणीही गाणे गात नाही किंवा हर्षनाद करत नाही; कोणीही द्राक्षकुंडातून द्राक्षारस काढीत नाही, कारण मी हर्षनाद करणे संपवून टाकले आहे.