मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह १६:११सुमारे इ.स.पू. ७२६

    माझे हृदय वीणेप्रमाणे मोआबसाठी विलाप करीत आहे, कीर-हरेसेथसाठी माझे अंतःकरण विलाप करीत आहे.

  2. यशायाह १६:१२सुमारे इ.स.पू. ७२६

    जेव्हा मोआब तिच्या उच्चस्थानी दर्शनास जाते, तेव्हा ती फक्त स्वतःला थकविते; जेव्हा ती तिच्या दैवतांची प्रार्थना करावयाला जाते, तेव्हा त्याचा काही उपयोग होत नाही.

  3. यशायाह १६:१३सुमारे इ.स.पू. ७२६

    याहवेह यांनी मोआबविरुद्ध आधीच हे वचन सांगितले आहे.

  4. यशायाह १६:१४सुमारे इ.स.पू. ७२६

    परंतु आता याहवेह असे म्हणतात: “तीन वर्षात, कराराने बांधलेला सेवक त्यांची मोजणी करेल, मोआबचे वैभव आणि तिच्या सर्व लोकांचा तिरस्कार केला जाईल आणि तिचे अवशिष्ट लोक फारच कमी आणि दुर्बल असतील.”

  5. यशायाह १७:१सुमारे इ.स.पू. ७४१

    दिमिष्का विरुद्ध भविष्यवाणी: “पहा, दिमिष्क आता शहर असे राहणार नाही परंतु ते नाशवंत वस्तूंचा ढिगारा असे होईल.

  6. यशायाह १७:२सुमारे इ.स.पू. ७४१

    अरोएरची शहरे ओसाड होतील आणि ते कळपांना विश्रांती घेण्यासाठी सोडले जाईल, तिथे त्यांना घाबरविणारा कोणीही नसेल.

  7. यशायाह १७:३सुमारे इ.स.पू. ७४१

    तटबंदी केलेले शहर एफ्राईमपासून नाहीसे होईल, आणि दिमिष्कमधून शाही सामर्थ्य नाहीसे होईल; अराम नगरातील अवशिष्ट इस्राएली लोकांच्या वैभवासारखे असतील,” असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.

  8. यशायाह १७:४सुमारे इ.स.पू. ७४१

    “त्या दिवशी याकोबाचे वैभव कमी होईल; त्याच्या शरीरातील चरबी व्यर्थ जाईल.

  9. यशायाह १७:५सुमारे इ.स.पू. ७४१

    जेव्हा कापणी करणारे उभे पीक कापतात, आणि धान्य त्यांच्या हातात गोळा करतात— जसे जेव्हा कोणी रेफाईमच्या खोऱ्यात धान्याची कणसे गोळा करतात तसे होईल.

  10. यशायाह १७:६सुमारे इ.स.पू. ७४१

    जसे जैतुनाच्या झाडाला झोडपतात तेव्हा उंचटोकाच्या फांद्यांवर दोन किंवा तीन जैतून, आणि फळ देणाऱ्या मोठ्या फांद्यांवर चार किंवा पाच जैतून राहून जातात, तसे जमा करण्याचे काही शिल्लक राहील,” असे इस्राएलचे परमेश्वर याहवेह घोषित करतात.

  11. यशायाह १७:७सुमारे इ.स.पू. ७४१

    त्या दिवशी लोक त्यांच्या निर्माणकर्त्याकडे पाहतील त्यांची दृष्टी इस्राएलच्या पवित्र परमेश्वराकडे वळवतील.

  12. यशायाह १७:८सुमारे इ.स.पू. ७४१

    ते वेद्यांकडे, त्यांच्या हस्तकृतींकडे पाहणार नाहीत, आणि अशेरा स्तंभांसाठी आणि त्यांच्या बोटांनी तयार केलेल्या धूप वेद्यांकडे आदराने पाहणार नाहीत.

  13. यशायाह १७:९सुमारे इ.स.पू. ७४१

    त्या दिवशी त्यांची आश्रयस्थान असलेली शहरे, जी त्यांनी इस्राएली लोकांमुळे सोडली होती, ती आता काटेरी झाडे आणि झुडपे वाढत असलेल्या ठिकाणांसारखी होतील. ती सर्व उजाड होतील.

  14. यशायाह १७:१०सुमारे इ.स.पू. ७४१

    तुम्ही तुमचे तारणकर्ते परमेश्वरांना विसरले आहात; तुम्ही तुमचा दुर्ग, तुमच्या खडकाची आठवण केली नाही. जरी तुम्ही अत्युत्तम झाडांची लागवड केली आहे, आणि विदेशी द्राक्षवेलींची लागवड केली आहे,

  15. यशायाह १७:११सुमारे इ.स.पू. ७४१

    ज्या दिवशी तुम्ही त्यांना लावता, तुम्ही त्यांना वाढविता, आणि सकाळी तुम्ही त्यांची पेरणी करता, तेव्हा तुम्ही त्यांना अंकुर फुटू देता, तरीसुद्धा रोग आणि असाध्य वेदना होणाऱ्या दिवसामध्ये त्यांचे काहीच उत्पादन होणार नाही.

  16. यशायाह १७:१२सुमारे इ.स.पू. ७४१

    पुष्कळ राष्ट्रे जी संतापतात त्यांना धिक्कार असो— ते उफाळणाऱ्या समुद्राप्रमाणे रागावतात! गर्जना करणाऱ्या लोकांचा धिक्कार असो— पाण्याच्या प्रचंड लोंढ्याप्रमाणे ते गर्जना करतात!

  17. यशायाह १७:१३सुमारे इ.स.पू. ७४१

    जरी लोक उचंबळणाऱ्या पाण्याप्रमाणे गर्जना करतात, जेव्हा याहवेह त्यांना दटावतात, तेव्हा ते दूर पळून जातात, टेकड्यांवरील भुश्याप्रमाणे वार्‍याने पुढे ढकलून दिले जातात, जणू काही वावटळीची धूळ वादळी वाऱ्यासमोर जाते.

  18. यशायाह १७:१४सुमारे इ.स.पू. ७४१

    संध्याकाळी अचानक दहशत! सकाळ होण्याआधीच ते गेले असतात! जे आम्हाला लुटतात त्यांच्या वाट्याला हे येते, जे आमची लूटमार करतात त्यांचा हा वाटा आहे.

  19. यशायाह १८:१सुमारे इ.स.पू. ७१४

    कूशच्या नद्यांच्या काठावर असलेल्या देशांचा, जिथून पंखांचा फडफड आवाज येतो त्यास धिक्कार असो.

  20. यशायाह १८:२सुमारे इ.स.पू. ७१४

    जो समुद्रमार्गाने पाण्यावरून पापिरस नौकांमधून दूतांना पाठवितो. जा, जलदगतीने जाणाऱ्या दूतांनो, धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडे जा, त्यांची जबर असलेल्या दूरवरच्या लोकांकडे, विक्षिप्त भाषण करणारे आक्रमक राष्ट्र, ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे.

  21. यशायाह १८:३सुमारे इ.स.पू. ७१४

    अहो तुम्ही जगातील सर्व लोकहो, तुम्ही जे पृथ्वीवर राहता, जेव्हा पर्वतांवर झेंडा उभारला जाईल, तेव्हा तुम्हाला तो दिसेल, आणि जेव्हा तुतारी वाजेल तेव्हा तुम्ही ती ऐकाल.

  22. यशायाह १८:४सुमारे इ.स.पू. ७१४

    याहवेह मला असे म्हणतात: “मी शांत राहीन आणि माझ्या निवासस्थानातून पाहीन, सूर्यप्रकाशामध्ये चमकणाऱ्या उष्णतेसारखे, दव असलेले ढग कापणीच्या उन्हात असल्यासारखे.”

  23. यशायाह १८:५सुमारे इ.स.पू. ७१४

    कारण, कापणीच्या आधी, जेव्हा फुलोरा संपेल आणि फुले पिकलेले द्राक्ष होतात, ते छाटणीच्या सुऱ्यांनी फुटलेले कोंब कापून टाकतील, आणि पसरत असलेल्या फांद्या कापून टाकतील आणि काढून टाकतील.

  24. यशायाह १८:६सुमारे इ.स.पू. ७१४

    डोंगरावरील हिंस्र पक्ष्यांसाठी आणि वन्यप्राण्यांसाठी, भक्ष्य म्हणून त्या सर्वांना तिथेच सोडले जाईल; संपूर्ण उन्हाळ्यात पक्षी त्यांचे भक्षण करतील, आणि संपूर्ण हिवाळ्यात वन्यप्राणी त्यांचे भक्षण करतील.

  25. यशायाह १८:७सुमारे इ.स.पू. ७१४

    त्याकाळी सर्वसमर्थ याहवेहसाठी सीयोनातून भेटी आणल्या जातील धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडून, ज्यांचे भय आहे अशा दूरवरच्या लोकांकडून, विक्षिप्त भाषण करणाऱ्या आक्रमक राष्ट्राकडून, ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे. अशा लोकांकडून सर्वसमर्थ याहवेह यांच्यासाठी भेटी आणल्या जातील.