- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह २०:१सुमारे इ.स.पू. ७१४
ज्या वर्षी अश्शूरचा राजा सार्गोनने पाठविलेला सर्वोच्च सेनापती अश्दोदला आला आणि त्याने हल्ला केला आणि ते ताब्यात घेतले—
- यशायाह २०:२सुमारे इ.स.पू. ७१४
त्यावेळेस आमोजचा पुत्र यशायाहद्वारे याहवेह बोलले. ते त्याला म्हणाले, “तुझ्या अंगावरील गोणपाट आणि पायातील चपला काढून टाक.” आणि त्याने तसे केले, वस्त्रहीन आणि अनवाणी असा तो फिरत राहिला.
- यशायाह २०:३सुमारे इ.स.पू. ७१४
तेव्हा याहवेह म्हणाले, “जसा माझा सेवक यशायाह तीन वर्षे विवस्त्र आणि अनवाणी चालला, त्याचप्रमाणे इजिप्त व कूश यांच्याविरुद्ध हे चिन्ह आणि अरिष्टसूचक गोष्ट असेल,
- यशायाह २०:४सुमारे इ.स.पू. ७१४
म्हणून अश्शूरचा राजा इजिप्तच्या बंदिवानांना आणि कूशच्या बंदिवानांना, तरुणांना आणि वृद्धांना उघडे ठेवलेले नितंब आणि अनवाणी असे—इजिप्तला लज्जित म्हणून चालवेल.
- यशायाह २०:५सुमारे इ.स.पू. ७१४
ज्यांनी कूशवर विश्वास ठेवला आणि इजिप्तबद्दल बढाई मारली ते निराश होतील आणि लज्जित होतील.
- यशायाह २०:६सुमारे इ.स.पू. ७१४
त्या दिवशी या किनार्यावर राहणारे लोक असे म्हणतील की, ‘ज्यांच्यावर आम्ही विसंबून होतो, पहा हे त्यांचे काय झाले आहे. ज्यांच्याकडे आम्ही मदतीसाठी आणि अश्शूरच्या राजापासून आमची सुटका व्हावी यासाठी धाव घेतली होती, तर आता आमची सुटका कशी होईल?’ ”
- यशायाह २१:१सुमारे इ.स.पू. ७१४
समुद्राकाठी असलेल्या वाळवंटी प्रदेशाविरुद्ध भविष्यवाणी: ज्याप्रकारे वावटळ दक्षिणेकडील प्रदेशांना झाडून जाते, त्याच प्रकारे हल्ला करणारा वाळवंटी प्रदेशातून, दहशती भूमीमधून येतो.
- यशायाह २१:२सुमारे इ.स.पू. ७१४
एक भयानक दृष्टान्त मला दाखविण्यात आला आहे: देशद्रोही विश्वासघात करतो, लूट करणारा लूट घेतो. हे एलाम, आक्रमण करा! मेदिया, वेढा घाला! तिने दिलेले दुःखाचे सर्व विव्हळणे मी संपवून टाकेन.
- यशायाह २१:३सुमारे इ.स.पू. ७१४
यामुळे माझ्या शरीराला यातनेने दुखविले आहे, प्रसूत स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदनांनी घेरले आहे. जे काही मी ऐकतो, त्यामुळे मी लटपटून जातो, मी जे काही पाहतो, त्यामुळे मी भांबावून जातो.
- यशायाह २१:४सुमारे इ.स.पू. ७१४
माझे अंतःकरण अडखळते, भीती मला थरथर कापविते; ज्या संध्याकाळची मी आतुरतेने वाट पाहत असे ती माझ्यासाठी भयप्रद अशी झाली आहे.
- यशायाह २१:५सुमारे इ.स.पू. ७१४
ते मेजावर भोजनाची तयारी करतात, ते गालिचे पसरवितात, ते खातात, ते पितात! अहो, अधिकारी, तुम्ही आता उठा, ढालींना तेल लावा!
- यशायाह २१:६सुमारे इ.स.पू. ७१४
प्रभू मला असे म्हणत आहेत: “जा, टेहळणी करणारा उभा कर, आणि त्याला जे काही दिसते ते त्याने कळवावे.
- यशायाह २१:७सुमारे इ.स.पू. ७१४
जेव्हा तो रथांना घोड्यांच्या ताफ्यासहीत, आणि गाढवावर स्वार असलेले किंवा उंटावर स्वार असलेले पाहतो, तेव्हा त्याने सावध राहावे, पूर्णपणे सावध राहावे.”
- यशायाह २१:८सुमारे इ.स.पू. ७१४
त्याप्रमाणे तटावर ठेवलेला पहारेकरी सिंहगर्जना करीत ओरडला, “महाराज, मी दिवसेंदिवस, रात्रीच्या रात्री येथे पहारा करीत राहिलो.
- यशायाह २१:९सुमारे इ.स.पू. ७१४
पाहा, एक मनुष्य रथात स्वार होऊन घोड्याच्या ताफ्याबरोबर इकडे येत आहे. आणि तो प्रत्युत्तर देत आहे: ‘बाबेल पडले आहे, ते पडले आहे! तिथे असलेल्या तिच्या दैवतांच्या सर्व मूर्तींचे तुकडे होऊन जमिनीवर पडले आहेत!’ ”
- यशायाह २१:१०सुमारे इ.स.पू. ७१४
माझे लोक जे खळ्यावर चिरडले गेले आहेत, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह यांच्याकडून, मी जे ऐकले आहे ते मी तुम्हाला सांगतो.
- यशायाह २१:११सुमारे इ.स.पू. ७१४
दूमाह विरुद्ध एक भविष्यवाणी: सेईरमधून कोणीतरी मला हाक मारत आहे, “रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे? रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे?”
- यशायाह २१:१२सुमारे इ.स.पू. ७१४
पहारेकरी उत्तर देतो, “सकाळ होत आहे, पण रात्रही आली आहे. जर तुम्हाला विचारणा करावयाची आहे, तर मला विचारा; आणि मग पुन्हा या.”
- यशायाह २१:१३सुमारे इ.स.पू. ७१४
अरेबियाविरुद्ध भविष्यवाणी: ददानी काफिल्यांनो, तुम्ही जे अरेबियाच्या अरण्यात वसती करता,
- यशायाह २१:१४सुमारे इ.स.पू. ७१४
तुम्ही, तेमा येथे राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांसाठी पाणी घेऊन या; पलायन केलेल्यांसाठी अन्न घेऊन या.
- यशायाह २१:१५सुमारे इ.स.पू. ७१४
ते तलवारीपासून पळतात म्यानातून उपसलेल्या तलवारीपासून ते पळतात, वाकवून नेम धरलेल्या धनुष्यापासून आणि युद्धाच्या कठोरतेपासून पळतात.
- यशायाह २१:१६सुमारे इ.स.पू. ७१४
प्रभू मला असे म्हणतात: “एका वर्षाच्या आत, कराराने बांधलेला सेवक जसे एकएक दिवस मोजत असतो, तसे केदारचे सर्व वैभव नाहीसे होईल.
- यशायाह २१:१७सुमारे इ.स.पू. ७१४
केदारचे वाचलेले धनुर्धारी, योद्धे थोडेच असतील.” इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे बोलले आहेत.
- यशायाह २२:१सुमारे इ.स.पू. ७१२
दृष्टान्ताच्या खोऱ्याविरुद्ध एक भविष्यवाणी: आता तुम्हाला काय त्रास होत आहे, ज्यामुळे तुम्ही सर्वजण छप्परावर गेलेले आहात?
- यशायाह २२:२सुमारे इ.स.पू. ७१२
हे गोंधळाने भरलेल्या नगरा, हे दंगा व चंगळबाजीने भरलेल्या शहरा, तुमचे वधलेले लोक तलवारीने मारले गेले नव्हते, ते युद्धातही मरण पावले नव्हते.