मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह २३:३सुमारे इ.स.पू. ७१५

    प्रचंड जलाशयावरून शिहोरचे धान्य आले; नाईल नदीकाठापासून कापणी केलेले पीक हे सोरचे उत्पन्न होते, आणि ती राष्ट्रांची बाजारपेठ झाली.

  2. यशायाह २३:४सुमारे इ.स.पू. ७१५

    सीदोन आणि समुद्रातील किल्ल्यांनो, लज्जित व्हा, कारण समुद्र म्हणाला: “मला कधीही बाळंतपणाच्या वेदना झाल्या नाहीत आणि मी कधीही प्रसवलो नाही; मी कधीही मुलांचे संगोपन केले नाही किंवा मुलींचा सांभाळ केला नाही.”

  3. यशायाह २३:५सुमारे इ.स.पू. ७१५

    जेव्हा इजिप्तकडे निरोप येतो, तेव्हा सोरकडून आलेल्या वृत्ताने ते कासावीस होतील.

  4. यशायाह २३:६सुमारे इ.स.पू. ७१५

    तार्शीश ओलांडून पलीकडे जा; बेटावरील लोकहो, आक्रोश करा.

  5. यशायाह २३:७सुमारे इ.स.पू. ७१५

    ही तुमची रंगेलपणाची नगरी आहे काय, फार जुने, पुरातन नगर, जिच्या पायांनी तिला फार दूर असलेल्या प्रदेशात स्थायिक होण्यासाठी नेले आहे?

  6. यशायाह २३:८सुमारे इ.स.पू. ७१५

    सोरच्या विरोधात अशी योजना कोणी केली आहे, मुकुटाचा बहुमान प्रदान करणारे, ज्यांचे व्यापारी राजकुमार आहेत, ज्यांचे व्यापारी पृथ्वीवरील प्रसिद्ध लोक आहेत?

  7. यशायाह २३:९सुमारे इ.स.पू. ७१५

    सर्वसमर्थ याहवेहनी ती योजना केली आहे, तिच्या सर्व वैभवाचा गर्व कमी करण्यासाठी आणि पृथ्वीवर नामांकित असलेल्या सर्वांना नम्र करण्यासाठी.

  8. यशायाह २३:१०सुमारे इ.स.पू. ७१५

    तार्शीश मुली, नाईल नदीच्या काठाने तुमच्या जमिनीची मशागत करा, कारण आता तुमच्याकडे बंदर राहणार नाही.

  9. यशायाह २३:११सुमारे इ.स.पू. ७१५

    याहवेहनी त्यांचा हात समुद्रापलीकडे लांबविला आहे, आणि तिच्या राज्यांना थरकाप आणला आहे. त्यांनी कनानच्या संदर्भात आदेश दिले आहेत की, तिचे किल्ले नष्ट केले जावे.

  10. यशायाह २३:१२सुमारे इ.स.पू. ७१५

    ते म्हणाले, “कुमारिके सीदोन, यापुढे तुझी चैनबाजी चालणार नाही. आता तू चिरडली जावी! “वर कित्तीम पलीकडे गेलात; तर तिथेही तुम्हाला विश्रांती मिळणार नाही.”

  11. यशायाह २३:१३सुमारे इ.स.पू. ७१५

    खास्द्यांच्या भूमीकडे बघा या लोकांचे आता काहीही महत्त्व राहिले नाही! अश्शूर लोकांनी ते वाळवंटातील श्वापदांसाठी एक ठिकाण केले आहे; त्यांनी त्यांचे वेढा बुरूज उभारले, त्यांनी त्याचे मोठे किल्ले पाडले आणि त्याचे भग्नावशेष केले.

  12. यशायाह २३:१४सुमारे इ.स.पू. ७१५

    तार्शीशच्या जहाजांनो, विलाप करा; तुमचा किल्ला नष्ट झाला आहे!

  13. यशायाह २३:१५सुमारे इ.स.पू. ७१५

    त्यावेळी एका राजाच्या आयुष्याचा कालावधी, म्हणजे सत्तर वर्षे, सोर विसरला जाईल. परंतु या सत्तर वर्षांच्या शेवटी, वेश्येच्या गाण्याप्रमाणे सोरचे होईल:

  14. यशायाह २३:१६सुमारे इ.स.पू. ७१५

    “वीणा हाती घे, शहरामधून फीर, तू विसरून गेलेली वेश्या; वीणा चांगली वाजव, पुष्कळ गाणी गा, म्हणजे तुझी आठवण होत राहील.”

  15. यशायाह २३:१७सुमारे इ.स.पू. ७१५

    सत्तर वर्षांच्या शेवटी, याहवेह सोरबरोबर व्यवहार करतील. ती तिच्या फायदेशीर वेश्याव्यवसायाकडे परत येईल आणि पृथ्वीतलावरील सर्व राज्यांबरोबर तिचा व्यापार करेल.

  16. यशायाह २३:१८सुमारे इ.स.पू. ७१५

    तरीसुद्धा तिचा नफा आणि तिचे उत्पन्न याहवेहसाठी वेगळे ठेवले जाईल; ते साठविले जाणार नाही किंवा त्याचा गुप्तसंचय केला जाणार नाही. तिचा फायदा याहवेहसमोर जे राहतात त्यांना भरपूर अन्न आणि उत्तम कपडे मिळावे यासाठी त्यांच्याकडे जाईल.

  17. यशायाह २४:१सुमारे इ.स.पू. ७१२

    पाहा, याहवेह पृथ्वीचा नाश करणार आहेत आणि ती उद्ध्वस्त करणार आहेत; ते तिचा चेहरा बिघडवून टाकतील आणि तेथील रहिवाशांची पांगापांग करतील—

  18. यशायाह २४:२सुमारे इ.स.पू. ७१२

    ते प्रत्येकासाठी समान असेल, जसे लोकांसाठी तसेच याजकासाठी जसे सेवकासाठी तसेच त्याच्या मालकासाठी जसे सेविकेसाठी तसेच तिच्या मालकिणीसाठी, जसे खरेदी करणाऱ्यांसाठी तसेच विकत घेणाऱ्यांसाठी, जसे उसने देणाऱ्यासाठी तसेच उसने घेणाऱ्यासाठी, जसे कर्जदारांसाठी तसेच कर्जदात्यांसाठी.

  19. यशायाह २४:३सुमारे इ.स.पू. ७१२

    पृथ्वी पूर्णपणे पडीक जमीन होईल आणि संपूर्णपणे लुटली जाईल. हे शब्द याहवेह बोलले आहेत.

  20. यशायाह २४:४सुमारे इ.स.पू. ७१२

    पृथ्वी सुकते आणि कोमेजून जाते, जग खंगून जाते आणि सुकून जाते, आकाश पृथ्वीबरोबर झुरत राहते.

  21. यशायाह २४:५सुमारे इ.स.पू. ७१२

    पृथ्वीला तिच्या लोकांनी भ्रष्ट केले आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, कायदे भंग केले आहेत आणि अनंतकाळाचा करार मोडला आहे!

  22. यशायाह २४:६सुमारे इ.स.पू. ७१२

    म्हणून शाप पृथ्वीला भस्मसात करतो. तिच्या लोकांना त्यांच्या दोषाचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पृथ्वीचे रहिवासी जळून गेले आहेत, आणि फारच थोडे उरले आहेत.

  23. यशायाह २४:७सुमारे इ.स.पू. ७१२

    नवा द्राक्षारस सुकतो आणि द्राक्षवेल कोमेजून जाते. आनंद करणारे सर्वजण विव्हळतात.

  24. यशायाह २४:८सुमारे इ.स.पू. ७१२

    आनंददायक ढोलकी शांत झाली आहे, हर्षोल्हास करणार्‍यांचा आवाज थांबला आहे, आनंद करणारी वीणा शांत आहे.

  25. यशायाह २४:९सुमारे इ.स.पू. ७१२

    गाणी म्हणत मद्यपान करणे बंद पडले आहे! मद्याचा घोट मद्यपीला कडू लागतो!