- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह ३४:२सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेह सर्व राष्ट्रांवर रागावले आहेत; त्यांचा क्रोध सर्व सैन्यांवर आला आहे. ते त्यांचा संपूर्णपणे नाश करतील, ते त्यांना वध करणाऱ्यांकडे सोपवून देतील.
- यशायाह ३४:३सुमारे इ.स.पू. ७१३
त्यांच्या वधलेल्यांना बाहेर फेकून देण्यात येईल, त्यांच्या मृतदेहांना दुर्गंधी येईल; पर्वत त्यांच्या रक्ताने भिजून जातील.
- यशायाह ३४:४सुमारे इ.स.पू. ७१३
आकाशातील सर्व तारे विरघळून जातील आणि आकाशे चर्मपत्राच्या गुंडाळीसारखे गुंडाळले जातील; द्राक्षवेलावरील कोमेजलेल्या पानांप्रमाणे, अंजिराच्या झाडावरील सुकून गेलेल्या अंजिरांप्रमाणे सर्व तारांगण गळून पडतील.
- यशायाह ३४:५सुमारे इ.स.पू. ७१३
माझी तलवार आकाशांमध्ये पिऊन तृप्त झाली आहे. पाहा, एदोमावर न्यायनिवाडा करण्यासाठी ती उतरत आहे, त्या लोकांचा मी संपूर्णपणे नाश केला आहे.
- यशायाह ३४:६सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेहच्या तलवारीने रक्तात आंघोळ केली आहे, ती चरबीने झाकलेली आहे— कोकरे आणि शेळ्यांचे रक्त, मेंढ्यांच्या मूत्रपिंडाच्या चरबीने ती झाकली आहे. कारण याहवेहसाठी बस्रा येथे अर्पणे आणि एदोम देशात मोठे यज्ञबली केले आहेत.
- यशायाह ३४:७सुमारे इ.स.पू. ७१३
आणि त्यांच्याबरोबर रानबैल आणि गोर्हे व मोठे बैल यज्ञात पडतील. त्यांची भूमी रक्ताने चिंब भिजून जाईल, आणि धूळ चरबीमध्ये पूर्ण भिजली जाईल.
- यशायाह ३४:८सुमारे इ.स.पू. ७१३
कारण याहवेहकडे सूड घेण्याचा एक दिवस आहे, सीयोनला पाठिंबा देण्यासाठी शिक्षा देणारे वर्ष.
- यशायाह ३४:९सुमारे इ.स.पू. ७१३
एदोम येथील प्रवाह मैदानासारखे होतील, तिची धूळ जळत्या गंधकात बदलली जाईल. तिची भूमी धगधगते मैदान होईल!
- यशायाह ३४:१०सुमारे इ.स.पू. ७१३
रात्री किंवा दिवसा ते विझविले जाणार नाही. त्याचा धूर कायमचा उठत राहील. पिढ्यान् पिढ्या ते ओसाड पडून राहील. यामधून पुन्हा कोणीही प्रवास करणार नाही.
- यशायाह ३४:११सुमारे इ.स.पू. ७१३
ससाणे आणि साळू त्याचा ताबा घेतील; मोठी घुबडे आणि डोमकावळे तिथे घरटी बांधतील. कारण परमेश्वराने एदोमच्या भूमीवर मापनदोरी ताणली आहे आणि नाशाचा ओळंबा लावला आहे.
- यशायाह ३४:१२सुमारे इ.स.पू. ७१३
तिच्या उच्चकुलीन लोकांना त्या ठिकाणी राज्य असे काहीही राहणार नाही, तिचे सर्व राजपुत्र नाहीसे होतील.
- यशायाह ३४:१३सुमारे इ.स.पू. ७१३
काट्यांनी तिचे किल्ले व्यापून टाकले जातील, जंगली झाडे आणि रानटी काटेरी झुडूपे तिचे गड ग्रासून टाकतील. कोल्ह्यांना संचार करण्याची ती जागा होईल, घुबडांचे घर होईल.
- यशायाह ३४:१४सुमारे इ.स.पू. ७१३
वाळवंटातील श्वापद तरसांना भेटतील, आणि रानबोकडे एकमेकांना साद घालतील; तिथे निशाचरही झोपतील आणि त्यांना विश्रांतीच्या जागा मिळतील.
- यशायाह ३४:१५सुमारे इ.स.पू. ७१३
तिथे घुबड घरटे बांधून अंडी घालेल, ती तिच्या पंखाच्या सावलीत त्यांना उबवेल आणि पिलांची काळजी घेईल; तिथे प्रत्येक बाज पक्षीही आपल्या जोडीदारासह जमतील.
- यशायाह ३४:१६सुमारे इ.स.पू. ७१३
याहवेहच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत पाहा आणि वाचा: यामधील कोणाचाही अभाव होणार नाही, एकालाही जोडीदाराची कमतरता पडणार नाही. कारण ही त्यांच्याच मुखाने दिलेली आज्ञा आहे, आणि त्यांचा आत्मा त्यांना एकत्र करेल.
- यशायाह ३४:१७सुमारे इ.स.पू. ७१३
ते त्यांच्या भागांचे वाटप करतात; त्यांच्या हाताने त्यांना मोजून वाटतात. तो भाग सर्वकाळासाठी त्यांच्याकडे राहील आणि ते पिढ्यान् पिढ्या तिथे निवास करतील.
- यशायाह ३५:१सुमारे इ.स.पू. ७१३
वाळवंट आणि शुष्क भूमी आनंदित होईल; अरण्य हर्षोल्हास करेल आणि बहरून येईल. केशराच्या फुलाप्रमाणे,
- यशायाह ३५:२सुमारे इ.स.पू. ७१३
त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल; तो मोठा आनंद करेल आणि उल्हासाने ओरडेल. लबानोनचे गौरव, कर्मेल आणि शारोन यांचे वैभव त्याला दिले जाईल; ते याहवेहचे गौरव, आमच्या परमेश्वराची भव्यता पाहतील.
- यशायाह ३५:३सुमारे इ.स.पू. ७१३
अशक्त हात बळकट करा, निर्बल झालेले गुडघे स्थिर करा;
- यशायाह ३५:४सुमारे इ.स.पू. ७१३
भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा, “बलवान व्हा, घाबरू नका; तुमचे परमेश्वर येतील, ते सूड घेण्यास येतील. दैवी प्रतिफळ देऊन तुम्हाला वाचवण्यासाठी येतील.”
- यशायाह ३५:५सुमारे इ.स.पू. ७१३
तेव्हा आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान उघडले जातील.
- यशायाह ३५:६सुमारे इ.स.पू. ७१३
तेव्हा पांगळे हरिणाप्रमाणे उड्या मारतील, आणि मुकी जीभ आनंदाने ओरडेल. अरण्यामध्ये पाणी आणि वाळवंटात झरे उफाळून वर येतील.
- यशायाह ३५:७सुमारे इ.स.पू. ७१३
तप्त झालेली वाळू एक जलाशय होईल, आणि तहानलेल्या जमिनीवर उफाळणारे झरे येतील. जिथे कधी कोल्हे निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल.
- यशायाह ३५:८सुमारे इ.स.पू. ७१३
आणि तिथे एक महामार्ग असेल; त्याला पवित्रतेचा मार्ग म्हटले जाईल; तो त्यांच्यासाठी असेल जे त्या पवित्र मार्गावरून चालतात. अशुद्ध असलेले त्यावरून प्रवास करणार नाहीत. दुष्ट मूर्ख लोक त्यावरून चालणार नाहीत.
- यशायाह ३५:९सुमारे इ.स.पू. ७१३
तिथे कोणताही सिंह नसेल, किंवा कोणताही वखवखलेला हिंस्र पशू नसेल. ते तिथे सापडणार नाहीत. फक्त तारण झालेलेच तिथे चालतील,