- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- होशेय ५:१२सुमारे इ.स.पू. ७८०
एफ्राईमाला मी कसर, आणि यहूदाहसाठी सडीचा रोग आहे.
- होशेय ५:१३सुमारे इ.स.पू. ७८०
“ज्यावेळी एफ्राईमने त्याचा आजार पाहिला, आणि यहूदाहने त्याची जखम पाहिली, तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे वळला, आणि महान राजाकडे मदतीसाठी विनंती केली. परंतु तो तुला बरे करू शकत नाही, तुझ्या जखमाही बर्या करू शकत नाही.
- होशेय ५:१४सुमारे इ.स.पू. ७८०
कारण मी एफ्राईमला एखाद्या सिंहासारखा, व यहूदाहला मोठ्या सिंहासारखा होईन. मी त्यांना फाडून टाकीन आणि दूर निघून जाईन; मी त्यांना घेऊन जाईन आणि त्यांना सोडविणारा कोणीही नसेल.
- होशेय ५:१५सुमारे इ.स.पू. ७८०
ते आपला अपराध कबूल करेपर्यंत व साहाय्यासाठी माझे मुख पुन्हा शोधेपर्यंत मी आपल्या गुहेत परत जाईन— कारण संकट आल्याबरोबर, ते माझा शोध कळकळीने करतील.”
- होशेय ६:१सुमारे इ.स.पू. ७८०
“चला, आपण याहवेहकडे परत जाऊ. त्यांनी आम्हाला फाडले आहे, व तेच आम्हाला बरे करतील; त्यांनी आम्हाला जखम केली आहे, व आता तेच पट्टी बांधतील.
- होशेय ६:२सुमारे इ.स.पू. ७८०
ते आम्हाला दोन दिवसात पुनरुज्जीवन देतील; तिसर्या दिवशी ते आम्हाला पुनर्स्थापित करतील, जेणेकरून आपण त्यांच्या उपस्थितीत जिवंत राहू शकू.
- होशेय ६:३सुमारे इ.स.पू. ७८०
चला, याहवेहचा आपण स्वीकार करू या; चला, त्यांचा स्वीकार करण्यास आपण झटू या. सूर्याचे उगविणे जसे निश्चित आहे, तसेच त्यांचे प्रकट होणे निश्चित आहे; हिवाळ्यातील पावसाप्रमाणे, पृथ्वीला सिंचन घालणाऱ्या वसंतऋतूप्रमाणे ते आमच्याकडे येतील.”
- होशेय ६:४सुमारे इ.स.पू. ७८०
“एफ्राईमा मी तुमचे काय करू? यहूदाह मी तुमचे काय करू? कारण तुमची प्रीती सकाळच्या ढगांप्रमाणे, पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे नाहीशी होते.
- होशेय ६:५सुमारे इ.स.पू. ७८०
म्हणून माझ्या संदेष्ट्याद्वारे मी तुमचे तुकडे केले आहे, माझ्या मुखाच्या शब्दांनी तुम्हाला ठार केले— तेव्हा माझ्या न्याय सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे पुढे वाढत जातो.
- होशेय ६:६सुमारे इ.स.पू. ७८०
कारण मला तुमची अर्पणे नव्हे, तर दया हवी आहे, आणि होमार्पण पेक्षा परमेश्वराचे ज्ञान प्रिय आहे.
- होशेय ६:७सुमारे इ.स.पू. ७८०
आदामाप्रमाणे तुम्ही माझा करार मोडला आहे; तिथे ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले होते.
- होशेय ६:८सुमारे इ.स.पू. ७८०
गिलआद हे दुष्कर्म करणारे शहर आहे, त्यावर रक्ताची पावले उमटली आहेत.
- होशेय ६:९सुमारे इ.स.पू. ७८०
जसे लुटारू बळी पडणाऱ्याची वाट पाहत दबा धरून बसतात, तसेच याजकांच्या टोळ्या शेखेमाच्या वाटेवर वध करतात, ते आपल्या दुष्ट योजना पूर्ण करतात.
- होशेय ६:१०सुमारे इ.स.पू. ७८०
मी इस्राएलमध्ये एक भयानक गोष्ट पाहिली आहे: एफ्राईम वेश्याव्यवसाय करण्यास दिला आहे, इस्राएल अपवित्र झाला आहे.
- होशेय ६:११सुमारे इ.स.पू. ७८०
“हे यहूदाह, तुझ्यासाठी हंगामाची वेळ नेमलेली आहे. “जेव्हा मी माझ्या लोकांना जुन्या दिवसात पुनर्स्थापित करेन,
- होशेय ७:१सुमारे इ.स.पू. ७८०
जेव्हा मी इस्राएलला आरोग्य देतो, तेव्हा एफ्राईमचे पाप आणि शोमरोनचे अपराध प्रकट होतात. ते लबाडी करतात, चोर घरात चोरी करतात, लुटारू रस्त्यावर लूटमार करतात;
- होशेय ७:२सुमारे इ.स.पू. ७८०
परंतु त्यांना हे कळत नाही की त्यांची सर्व वाईट कृत्ये मला स्मरण आहेत. त्यांच्या पापकर्मांनी त्यांना घेरले आहे; ते नेहमी माझ्यासमोर असतात.
- होशेय ७:३सुमारे इ.स.पू. ७८०
“ते राजाला आपल्या दुष्टाईने, अधिपतीला आपल्या लबाड्यांनी हर्षित करतात.
- होशेय ७:४सुमारे इ.स.पू. ७८०
ते सर्वच व्यभिचारी आहेत; रोटी भाजणार्याच्या सतत पेटलेल्या भट्टीप्रमाणे ते आहेत. पीठ मळून ते फुगेपर्यंत तो विस्तव चाळविण्याचे थांबवितो.
- होशेय ७:५सुमारे इ.स.पू. ७८०
आमच्या राजाच्या उत्सवाच्या दिवशी अधिपती द्राक्षारसाने धुंद होतात, आणि त्याने आपला हात कुचेष्टा करणार्यांबरोबर मिळविला आहे.
- होशेय ७:६सुमारे इ.स.पू. ७८०
कारस्थाने करताना त्यांची हृदये तापलेल्या भट्टीसारखी होतात. त्यांची उत्कटता रात्रभर धुमसत असते; सकाळी तो प्रज्वलित अग्नीसारखा पेट घेतो.
- होशेय ७:७सुमारे इ.स.पू. ७८०
ते सर्व भट्टीसारखे तप्त आहेत; ते त्यांच्या अधिपतींना गिळून टाकतात. त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत, त्यातील कोणी मला हाक मारीत नाही.
- होशेय ७:८सुमारे इ.स.पू. ७८०
“एफ्राईम गैर यहूदीयांसोबत मिसळतो; एफ्राईम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे.
- होशेय ७:९सुमारे इ.स.पू. ७८०
परकीय लोक त्याच्या शक्तीचे शोषण करतात, पण त्याला हे कळत नाही त्याचे केस पांढरे होत चालले आहेत, पण तो त्याची नोंद घेत नाही.
- होशेय ७:१०सुमारे इ.स.पू. ७८०
इस्राएलचा उन्मत्तपणाच त्याच्याविरुद्ध साक्ष देतात, हे सर्व असूनही तो याहवेह त्याच्या परमेश्वराकडे वळत नाही, किंवा त्यांचा शोध घेत नाही.