- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- होशेय २:९सुमारे इ.स.पू. ७८५
“म्हणून जेव्हा माझे धान्य पिकेल मी ते काढून घेईन, आणि माझा नवीन द्राक्षारस तयार होईल तेव्हा तो काढून घेईन. तिचे नग्न शरीर झाकण्यासाठी, मी माझी लोकर आणि माझी तागाची वस्त्रे दिली होती ती परत घेईन.
- होशेय २:१०सुमारे इ.स.पू. ७८५
म्हणून मी आता तिची अश्लीलता तिच्या प्रियकरांसमोर उघडी करेन; माझ्या हातून तिला कोणीही वाचवू शकणार नाही.
- होशेय २:११सुमारे इ.स.पू. ७८५
मी तिचे सर्व उत्सव: तिचे वार्षिक सण, तिचे नवीन चंद्रदर्शन, तिचे शब्बाथाचे दिवस—नेमून दिलेले तिचे सर्व सण बंद करेन.
- होशेय २:१२सुमारे इ.स.पू. ७८५
मी तिच्या द्राक्षमळ्यांचा व अंजिराच्या झाडांचा नाश करेन, जो तिच्या प्रियकरांनी तिला वेतन म्हणून दिला होता, असे तिचे म्हणणे आहे; मी त्यांचे गर्द झाडी करेन व वनपशू ते खाऊन टाकतील.
- होशेय २:१३सुमारे इ.स.पू. ७८५
जेव्हा तिने बआलसाठी धूप जाळला, तिला मी त्या दिवसांसाठी शिक्षा करेन; तिने स्वतःला अंगठ्यांनी आणि दागिन्यांनी सजविले, आणि तिच्या प्रियकरांच्या मागे गेली, परंतु मला मात्र ती विसरून गेली,” असे याहवेह घोषित करतात.
- होशेय २:१४सुमारे इ.स.पू. ७८५
“म्हणून तिला मी भुलविणार; तिला रानात घेऊन जाईन आणि तिच्याबरोबर कोमलतेने बोलेन.
- होशेय २:१५सुमारे इ.स.पू. ७८५
तिथे मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आणि अखोरचे खोरे तिला आशेचे द्वार असे देईन. जेव्हा ती इजिप्तमधून बाहेर आली, तिच्या तारुण्याच्या दिवसात जसे उत्तर देत होती तसेच उत्तर देईल.
- होशेय २:१६सुमारे इ.स.पू. ७८५
“त्या दिवशी, तुम्ही मला ‘माझा पती’ असे म्हणाल; यापुढे तुम्ही मला ‘माझे बआल’ असे म्हणणार नाही, याहवेह असे घोषित करतात.
- होशेय २:१७सुमारे इ.स.पू. ७८५
मी तिच्या मुखातून बआलची नावे काढून टाकीन; यापुढे त्यांची नावे कधीही घेतली जाणार नाही.
- होशेय २:१८सुमारे इ.स.पू. ७८५
त्या दिवशी मी त्यांच्यासाठी रानातील पशू, आकाशातील पक्षी आणि भूमीवर सरपटणारे यांच्यामध्ये मी करार घडवून आणेन. धनुष्य आणि तलवार आणि लढाया मी देशातून काढून टाकेन, म्हणजे तुम्ही सर्वजण सुरक्षितपणे विश्राम कराल.
- होशेय २:१९सुमारे इ.स.पू. ७८५
मी तुला माझ्याबरोबर कायमचे वाग्दत्त असे करेन; मी तुम्हाला नीतिमत्व आणि न्याय, प्रीती आणि करुणा यामध्ये वाग्दत्त करेन.
- होशेय २:२०सुमारे इ.स.पू. ७८५
विश्वासूपणाने तुला वाग्दत्त करून घेईन, आणि याहवेहची ओळख तुला होईल.
- होशेय २:२१सुमारे इ.स.पू. ७८५
“त्या दिवशी मी प्रतिसाद देईन; मी आकाशाला प्रतिसाद देईन आणि ते पृथ्वीला प्रतिसाद देतील;” याहवेह अशी घोषणा करतात.
- होशेय २:२२सुमारे इ.स.पू. ७८५
“आणि पृथ्वी धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतून तेल यांना प्रतिसाद देईल, आणि ते येज्रीलास प्रतिसाद देतील.
- होशेय २:२३सुमारे इ.स.पू. ७८५
मी तिची माझ्यासाठी देशात पेरणी करेन; ‘माझी प्रिया नाही’ असे मी ज्यांना म्हटले त्याला मी माझी प्रीती दाखवेन. जे ‘माझे लोक नाहीत,’ असे म्हटले त्यांना ‘तुम्ही माझे लोक आहात’ असे म्हणेन; आणि ते म्हणतील, ‘तुम्ही आमचे परमेश्वर आहात.’ ”
- होशेय ३:१सुमारे इ.स.पू. ७८५
मग याहवेह मला म्हणाले, “जा आणि आपल्या पत्नीस आपली प्रीती पुनः प्रकट कर, जरी तिला दुसरा कोणता पुरुष प्रीती करतो आणि ती एक व्यभिचारिणी आहे. जरी ते इतर दैवतांकडे वळले असून पवित्र मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी याहवेह इस्राएली लोकांवर प्रीती करतात.”
- होशेय ३:२सुमारे इ.स.पू. ७८५
तेव्हा मी तिच्या सुटकेसाठी चांदीची पंधरा शेकेल व एक होमेर व एक लेथेक जव देऊन तिला विकत घेतले.
- होशेय ३:३सुमारे इ.स.पू. ७८५
मग मी तिला म्हणालो, “तुला अनेक दिवस माझ्याबरोबर राहवयाचे आहे; जारकर्म करू नकोस अथवा इतर पुरुषांकडे जाऊ नकोस, आणि मीही तुझ्यासोबत तसाच वागेन.”
- होशेय ३:४सुमारे इ.स.पू. ७८५
कारण दीर्घकाळापर्यंत इस्राएली लोक राजा अथवा राजपुत्र, यज्ञ अथवा पवित्र दगड, एफोद अथवा कुलदैवतांशिवाय राहतील.
- होशेय ३:५सुमारे इ.स.पू. ७८५
त्यानंतर इस्राएली लोक परत येतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराला आणि त्यांचा राजा दावीदाचा शोध घेतील. अखेरच्या काळात याहवेहकडे ते थरथर कापत आणि त्यांच्या आशीर्वादासाठी येतील.
- होशेय ४:१सुमारे इ.स.पू. ७८०
इस्राएली लोकहो, याहवेहचे वचन ऐका. या देशात राहणार्यांवर याहवेहचा आरोप आहे: या देशात विश्वासूपणा नाही, प्रीती नाही, परमेश्वराप्रती ज्ञान नाही.
- होशेय ४:२सुमारे इ.स.पू. ७८०
या ठिकाणी फक्त शाप, खोटे बोलणे आणि खून, चोरी आणि व्यभिचार आहे; सर्व सीमाबंदी ते मोडून टाकतात, आणि रक्तपातानंतर रक्तपात होतो.
- होशेय ४:३सुमारे इ.स.पू. ७८०
म्हणूनच तुमची भूमी कोरडी पडत आहे, येथे राहणारे सर्व नाश पावत आहे; रान पशू, आकाशातील पक्षी आणि समुद्रातील मासे नाहीसे होत आहेत.
- होशेय ४:४सुमारे इ.स.पू. ७८०
परंतु कोणीही आरोप करू नका, तुम्ही इतरांवर आळ घेऊ नका, कारण तुमचे लोक असे आहेत जे याजकांवर दोष लावतात.
- होशेय ४:५सुमारे इ.स.पू. ७८०
तुम्ही दिवस व रात्र अडखळता, आणि संदेष्टेही तुमच्याबरोबर अडखळतात. म्हणून मी तुमच्या आईचा नाश करेन—